Browsing Tag
शेअर्स
36 posts
Demat: डिमॅट अकाउंट कसे काम करते?
Reading Time: 2 minutesडिमॅट हा ‘Dematerialisation’ या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. डिमॅट खाते म्हणजे शेअर्स, बाँड्स, डिबेंचर्स, इत्यादीचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवणारे खाते. शेअर मार्केटचे व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते उघडले जाते. डिमॅट खात्याचा वापर ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. यासाठी इंटरनेट पासवर्ड आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड तयार करावे लागतात.
Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?
Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.
शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २
Reading Time: 3 minutesमागील भागात आपण शेअर बाजाराच्या इतिहासाची माहिती घेतली. या भागात आपण स्टॉक एक्सचेंज आणि ट्रेडिंग व शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. शेअर बाजाराचा गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार होत नाही. स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ट्रेडिंगचा परवाना असलेल्या व्यक्तीला स्टॉकचे शेअर्स खरेदी किंवा करण्याची परवानगी दिली जाते. आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करावयाचे असतील, तर आपल्या ब्रोकरशी संपर्क साधावा लागतो.
शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १
Reading Time: 3 minutesसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्व देशांच्या शेअर बाजाराची अवस्था बिकट झाली आहे. गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. बाजाराची पडझड सातत्याने चालू आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अगोदरपासूनच नकारात्मक विचारसरणी असणाऱ्या आपल्या समाजात याबद्दल गैरसमज वाढत चालले आहेत. पण परिस्थिती समजून घेऊन, पूर्वग्रहदूषित विचारांना बाजूला सारून, शांत राहून बाजार वर येण्याची वाट बघत राहणे एवढेच गुंतवणूकरांच्या हातात असते. लक्षात ठेवा परिस्थिती सतत बदलत असते. उंच शिखरावर गेल्यावर खाली येण्याशिवाय पर्याय नसतो. बाजाराचेही तसेच असते. त्यामुळे घाबरून न जाता बाजार वर येण्याची वाट बघा.
शेअर बाजार : किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?
Reading Time: 3 minutesकोणत्याही प्रकारचा गुंतवणूकदार असो, कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा- त्याच्या मूल्याचा अभ्यास करणे गरजेचं असतं. याच अभ्यासाचा एक महत्वाचा निकष म्हणजे प्राईज-अर्निंग रेश्यो, ज्याला थोडक्यात “किंमत-उत्पन्न प्रमाण” म्हणतात. बेंजामिन ग्रॅहम यांच्या मते, हा किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणजे एखादा समभाग निव्वळ गुंतवणूकीवर आधारित आहे की सट्टेबाजीच्या आधारावर व्यापार करीत आहे, हे निर्धारित करण्याचा अतिशय वेगवान आणि सोपा मार्ग आहे.