शेअर मार्केट- लिस्टेड (सुचिबद्ध) कंपनी म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesसर्व सामान्यपणे किंवा ढोबळ मानाने लिस्टेड कंपनीची व्याख्या, “ज्या कंपनीचे शेअर अधिकृतरित्या शेअर बाजारात विकले जातात, ती कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनी.” लिस्टेड कंपनी म्हणजे सुचिबद्ध कंपनी! ज्या कंपनी विशिष्ट प्रकारच्या शेअर बाजारात समाविष्ट असतात, व्यापार करतात त्या म्हणजे लिस्टेड कंपनी. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आयपीओला जबरदस्त प्रतिसाद- आयपीओ १६६ पट सब्सक्राइब्ड

Reading Time: 2 minutesउज्जीवने १२. ३९ कोटी शेअर्स आयपीओ द्वारे भांडवल उभारणीसाठी बाजारात आणले होते.  कंपनीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून  इतर समव्यवसायिक स्मॉल फायनान्स बँकेच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या उज्जीवन शेअर्सला प्रचंड मागणी नोंदवण्यात आली. ही  मागणी थोडी थोडकी नसून तब्बल २०५३. ८ कोटी शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी नोंदली गेली. 

आयपीओ अलर्ट – “उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक”

Reading Time: 5 minutesउज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) या कंपनीची प्राथमिक भागविक्री (IPO = Initial Public Offering)  दि. २,३ व ४ डिसेंबर या ३ दिवशी खुली असणार आहे. आयपीओ द्वारे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. कंपनीचे जवळपास रु. १००० कोटी भांडवल म्हणून जमा करण्याचे लक्ष ठेवले होते. यापैकी २ आठवड्यांपूर्वी प्री- आयपीओ भाग विक्रीद्वारे रु. २५० कोटी जमा केले आहेत. आयपीओद्वारे रु.७५० कोटी उभे केले जाणार आहेत. त्याचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे. 

शेअर बाजार: रिलायन्सचे वाढते बाजारमूल्य

Reading Time: 2 minutesरिलायन्स कंपनीच्या बाजारमुल्याने ( Market Capitalisation) आज दहा लाख कोटी (एकावर तेरा शुन्ये.. उगीच घोळ नको) रुपयांचा टप्पा पार करत एक नवा मैलाचा दगड गाठला. नऊ लाख ते दहा लाख हा टप्पा गाठायला फक्त ४० दिवसांचा आणि  २५ सत्रांचा अवधी लागला. म्हणजेच गेल्या महिनाभरांत कंपनीच्या शेअरने १०% च्या आसपास वाढ नोंदविली.

Titan – टायटन कंपनीची यशोगाथा (भाग २)

Reading Time: 4 minutesआशियाई व युरोपियन बाजारपेठेत ‘टायटन’ला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भारतीय तरुणाईला भुरळ घालणाऱ्या डिझाइन्सना तिकडच्या बाजारपेठेत मात्र, पसंतीची दाद मिळत नव्हती. अपेक्षांची गणितं चुकली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी, ‘टायटन’ने तिथल्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या अपेक्षा विचारात घेतल्या. त्यावर पुनर्विचार केला. त्या बाजपेठेच्या स्ट्रॅटेजी बदलून, संबंधित धोरणे बदलून त्यांच्यासाठी खास वेगळे डिझाइन्स बनवून घेतले. यामुळे ‘टायटन’ च्या यशोगाथेत आणखी एक सुवर्ण पान लिहिले गेले, यात शंकाच नाही.

Success Story Of Titan – टायटन कंपनीची यशोगाथा

Reading Time: 4 minutesतुम्ही जर  नोव्हेंबर २००९ मध्ये रु. १ लाख टायटनच्या  शेअर्स मध्ये गुंतवले असते, तर आज त्यांचे एकूण बाजारमूल्य जवळपास रु. २१ लाख असते. याव्यतिरिक्त  कंपनीने वेळोवेळी दिलेले डिव्हिडंड तर बाजारमूल्यात आपण मोजलेले नाही. १ नोव्हेंबर २००१ रोजी रु.६२ मध्ये मिळणारा टायटनचा शेअर या १ नोव्हेंबर २०१९ ला तब्बल रु. १३०१ पर्यंत वाढलेला होता. टायटनने गेल्या १० वर्षांत जवळपास २०००% परतावा दिला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की टाटा समूहाचा एक भाग असलेली  ‘टायटन कंपनी’ केवळ घड्याळेच बनवत नाही तर ज्वेलरी, अक्ससेसरीज, साड्या या इतर विविध ग्राहक उपयोगी वस्तू विकते. संपूर्ण जगात टायटन पाचवी सर्वात मोठी घड्याळ उत्पादक कंपनी आहे. 

थेट इक्विटी की म्युच्युअल फंड?

Reading Time: 3 minutesआम्हाला अनेक लोक विचारत असतात शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, कुठले शेअर्स घेऊ? अनेकदा कोणाच्या तरी सल्ल्याने सुरुवात केलेली असते. बाजारात तेजी असते, सगळेच शेअर्स वर जात असतात तेव्हा हे लोक खुश असतात. पण आपल्याला झालेल्या फायद्यात स्वतःच्या कौशल्याचा भाग किती आणि निव्वळ नशिबाचा भाग किती याचा बहुतेकांनी विचार केलेला नसतो.

सध्या शेअर्स खरेदी करावी का?

Reading Time: < 1 minuteकाही विकत घेताय?? मग जरा नव्हे भरपूर सावधगिरी बाळगा. हे वाक्य यापूर्वी मी अनेकदा बोललोय. लोक थोड्याश्या जास्त व्याजाच्या आमिषाने आपले मुद्दलच धोक्यात घालतात

वॉरेन बफेट यांचे यशस्वी गुंतवणुकीचे सूत्र

Reading Time: 3 minutesशेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलेलं असतं. आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूकविश्वाने ‘ओरॅकल ऑफ ओमाहा‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे. एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेननी मिळवलेलं यश अद्वितीय असेच आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या वॉरेननी नुकताच ३० ऑगस्ट २०१९ रोजी आपला ८९व्वा वाढदिवस साजरा केला. या त्यांच्या तब्बल ७८ वर्षांच्या प्रदीर्घ गुंतवणूक प्रवासात त्यांनी स्वानुभवातून मिळवलेले ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा सतत प्रयत्न केला. अशा या जगद्विख्यात, सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदाराचे विचार या लेखात समजून घेऊ.

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

Reading Time: 4 minutesशेअर बाजार म्हटलं की जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ ‘सुखाचे सोबती’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या तोंडी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे शब्द असतात. पण दुःखाच्या काळात, म्हणजेच बाजारातील पडझडीच्या काळात, तेच ‘हम आपके है कौन?’ असं विचारायला लागतात. अशा चढउतारांना एक समस्या म्हणून नव्हे तर शेअर बाजाराचा गुणधर्म म्हणून स्वीकारले पाहिजे. हीच मार्केट मधील रिस्क किंवा जोखीम आहे आणि तिला तोंड देण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे असते.