Infosys: इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?

Reading Time: 3 minutes दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर सात कोटी रूपयांचा परतावा मिळाल्याचं जर तुम्हाला कोण सांगितलं, तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? पण हे सत्य आहे! शेअर बाजारातील गुंतवणुकीतून हे शक्य आहे. आपण बोलत आहोत इन्फोसिस (INFOSYS) या दिग्गज आयटी कपंनीबद्दल! या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना २५ वर्षांत करोडपती बनवलं आहे. काही मित्रांनी एका फ्लॅटमध्ये सुरू केलेली ही कंपनी. इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायणमूर्ती यांच्याबद्दल आपण सर्वजण जाणतोच. 

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

Reading Time: 3 minutes महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.

शेअर मार्केट- लिस्टेड (सुचिबद्ध) कंपनी म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes सर्व सामान्यपणे किंवा ढोबळ मानाने लिस्टेड कंपनीची व्याख्या, “ज्या कंपनीचे शेअर अधिकृतरित्या शेअर बाजारात विकले जातात, ती कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनी.” लिस्टेड कंपनी म्हणजे सुचिबद्ध कंपनी! ज्या कंपनी विशिष्ट प्रकारच्या शेअर बाजारात समाविष्ट असतात, व्यापार करतात त्या म्हणजे लिस्टेड कंपनी. 

भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअर बाजार – इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX)

Reading Time: 2 minutes इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज हा मुंबई शेअरबाजारांने आपल्या उपकंपनीमार्फत स्थापन केलेला आणि भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहे. ९ जानेवारी २०१७ रोजी या बाजाराचे उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी केले आणि १६ जानेवारी २०१७ पासून नियमित सौदे होण्यास सुरुवात झाली. गांधीनगर अहमदाबाद येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या गुजरात इंटरनॅशनल फायनान्स अँड टेक सिटीमध्ये याचे मुख्यालय आहे. या आंतरराष्ट्रीय शेअरबाजारासंबंधित महत्वाच्या गोष्टी-

कशी आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (Gift City)?

Reading Time: 3 minutes साबरमती नदीच्या काठावर गांधीनगर येथे ‘गिफ्ट सिटी’ हा गुजरात सरकारने सहकार्यातून निर्मिती केलेला व्यापारी जिल्हा आहे. अशा प्रकारे अस्तित्वात आलेले आणि अद्यायावत शहर (Smart City) योजनेअंतर्गत ८८६ एकर जमिनीवर विकसित करण्यात आलेले, भविष्यातील मोठे होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र आहे. 

शेअर बाजारातील सध्याची उसळी टिकणार का?

Reading Time: 2 minutes शेअर बाजार – मंदीची  कक्षा भेदून बाजाराचीही  चांद्रयान मोहिम? या लेखानंतर ही उसळी टिकणार का? हा प्रश्न ‘ट्रेंडिंग’ होता. आता जर मला ह्या प्रश्नाचे नक्की उत्तर माहित असते, तर मी कीबोर्डवर बडवून बोटे झीजवण्यापेक्षा नोटा मोजून ती झीजवणे पसंत नसते का केले?? तरीपण आपल्याला लोक विचारतायत म्हटल्यावर उत्तर ठोकायलाच हवे, ही नशा पण काही कमी नाही.

अर्थमंत्र्यांचा निर्णय: शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सर्वसामान्यांचाही फायदा

Reading Time: 2 minutes नेहमीच बेधडक, धक्कादायक पण सकारात्मक निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारने कॉर्पोरेट क्षेत्रात धमाका करणारा निर्णय घेतला आहे. गोव्यामध्ये जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सीतारमन यांनी, देशांतर्गत कंपन्या आणि नव्या देशांतर्गत उत्पादन कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा अध्यादेश मंजूर झाल्याचं सांगितलं आहे. या निर्णयामुळे केवळ कॉर्पोरेट क्षेत्रच नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. 

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

Reading Time: 4 minutes शेअर बाजार म्हटलं की जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ ‘सुखाचे सोबती’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या तोंडी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे शब्द असतात. पण दुःखाच्या काळात, म्हणजेच बाजारातील पडझडीच्या काळात, तेच ‘हम आपके है कौन?’ असं विचारायला लागतात. अशा चढउतारांना एक समस्या म्हणून नव्हे तर शेअर बाजाराचा गुणधर्म म्हणून स्वीकारले पाहिजे. हीच मार्केट मधील रिस्क किंवा जोखीम आहे आणि तिला तोंड देण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे असते. 

शेअर बाजारातील दूरगामी निर्णय

Reading Time: 3 minutes निर्देशांकाचा विचार करताना आजपर्यंत फक्त त्या बाजारात नोंदणी केलेल्या कंपनीचा विचार केला जात होता. ही प्रथा मोडीत काढून राष्ट्रीय शेअरबाजाराच्या NSE Indicies ltd  या उपकंपनीच्या इंडेक्स मेंटेनन्स सब कमिटीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत यावेळी प्रथमच बाजारात नोंदणी ऐवजी व्यवहारास परवानगी असलेल्या नेस्ले इंडिया लिमिटेड (Nestle India ltd) या कंपनीचा निर्देशांकात समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.