Bank Rate Increased : तीन वर्षांनी झालेल्या व्याज दरवाढीचे अर्थ

Reading Time: 4 minutesमहागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक बसते. ती झळ कमी करण्यासाठी विकासदरावर परिणाम झाला तरी चालेल, अशी भूमिका रिझर्व बँक आणि सरकारने तूर्तास घेतलेली दिसते. बँक दर वाढवून व्यवस्थेतील पैशांची तरलता कमी करणे, हा महागाई कमी करण्याचा एक मार्ग मानला जातो.

उद्योगपती आता बँक सुरू करणार?

Reading Time: 4 minutesबँकांचे उद्योगपती आणि उद्योगपतींच्या बँका उद्योगपती आता बँक सुरू करणार? हे शीर्षक…

ठेवी व कर्ज : कोणते व्याजदर कमी हवेत?

Reading Time: 3 minutesव्याजदर कोणते कमी हवेत? ठेवींचे की कर्जाचे ?  बँक ठेवींचे व्याजदर कमी…

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

सरकारी अल्प बचत योजनांचे दर १% पेक्षा अधिक खाली

Reading Time: 5 minutesकोविड-१९ आपत्तीचा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४०% पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच की बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआयने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉजिटचे दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज ही कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँकेच्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करीत आले त्यांना आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय पाहावे लागतील. 

कर्जाच्या हप्त्याला स्थगिती दयावी का?

Reading Time: 3 minutesकोरोनाने महामंदी सोबतच महामारीचा यक्ष प्रश्न उभा केला. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक हातात हात घालून काम करण्यास सज्ज झाले आहेत. लोकांच्या हाती अडचणीच्या काळात खर्च करण्यासाठी पैसे राहावेत म्हणून ३ महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या मुदतीच्या कर्जांचे हप्ते स्थगित करण्याचा पर्याय कर्जदारांना उपलब्ध करून देण्याची मुभा बँकांना देण्यात आली. आर्थिक भाषेत मॉरेटोरीअम म्हणजे कर्जाची परतफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार. परंतु त्यावरून सामान्य कर्जदारांचे बरेच गैरसमज झाले आहेत. आपण हा मुद्दा उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू.

बुडणाऱ्या बँकांपासून गुंतवणूकदारांनी घ्यायचा बोध

Reading Time: 3 minutesव्यक्ती, संस्था यांच्याकडून व्याज देऊन ठेवी स्वीकारून गरजू व्यक्ती, संस्था यांना जास्त दराने व्याज घेऊन पैसे देणे हे बँकांचे मुख्य काम. याशिवाय इतर अनेक छोटे मोठे उद्योग करून बँका आपले उत्पन्न वाढवतात. पैसे पाठवण्याची सोय करणे, लॉकर पुरवणे, क्रेडिट कार्ड सुविधा देणे, व्यावसायिकांना कॅश क्रेडिटची सुविधा देणे, गुंतवणूक, विमा सुविधा पुरवणे इ. रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करून सर्व बँका आपला व्यवसाय करतात. यामध्ये सहकारी व सरकारी बँकांचे योगदान मोठे आहे. कर्जदारांना दिलेले कर्ज व त्यावरील येत असलेले व्याज ही बँकांची मालमत्ता असते तर ठेवीदारांच्या ठेवी व त्यावरील द्यावयाचे व्याज ही बँकांची देयता असते. 

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

कोरोना – रिझर्व्ह बँकेचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचे परिणाम

Reading Time: 3 minutesरिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिनांक २७ मार्च २०२० रोजी पत्रकार परिषद घेऊन कोविड १९ मुळे उद्भवलेल्या सध्याच्या कठीण परिस्थितीत अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत हे निर्णय कोणते व  त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल विचार करूयात.