दिवस असे की कोणी माझा नाही….
Reading Time: 4 minutesकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंपदा टिकली पाहिजे याला प्राथमिकता देऊन सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. परंतु कोरोना नावाचा इंडिकेटर बाजारात गुंतवणूकदारांची धनसंपदा अस्थिर करत आहे. खरंतर समभाग गुंतवणूक म्हणजे अस्थिरता आलीच. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी धास्तावून जाण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी आपत्कालीन निधीची तरतूद न करता दीर्घ मुदतीची गुंतवणूक सुरु केली असेल, त्यांना दोनच पर्याय उपलब्ध होऊ शकतात. पहिला पैशांची तरलता हवी असल्यास भांडवली तोटा सहन करणे किंवा आहे ती गुंतवणूक थांबवून पैसे न काढणे.