रिअल ईस्टेटचे नववर्ष ; आशादायी पण आव्हानात्मक! भाग २

Reading Time: 3 minutesबांधकाम व्यवसायामध्ये आलेली मंदी, त्याचे परिणाम, कारणे, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि एकूणच या व्यवसायाचे भवितव्य यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप –

रिअल ईस्टेटचे नववर्ष ; आशादायी पण आव्हानात्मक! भाग १

Reading Time: 3 minutes‘अच्छे दिन’  विषयी पूर्णपणे आदर राखत सांगावसं वाटतं, आगामी वर्षात राज्यात व केंद्रात निवडणुका आहेत. या सरकारनं (मोदी सरकार) चाडेचार वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यावर काही धोरणे राबविलीत्यामुळे रिअल इस्टेटचे दर स्थिरच नाही तर कमीच झाले आहेत. मात्र या सरकारनं रिअल इस्टेटसाठी एक इंडस्ट्री म्हणून काय केलं? याकडे मला लक्ष वेधून घ्यायचं आहे.

सुकन्या समृद्धी योजना वि. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी

Reading Time: 3 minutesएसएसवाय ही दीर्घ मुदतीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली चांगली योजना आहे.  ही योजना विशेषतः आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने लाभदायक योजना आहे. परंतु, इतक्या दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज वाटत नसल्यास पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. वेळेची लवचिकता देणारा पीपीएफ योजना उपयुक्त असून यामध्ये कोणीही गुंतवणूक  करू शकते. दोन्ही योजना कर बचतीच्या उत्तम मार्गांपैकी आहेत. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा, हे मात्र प्रत्येकाने आपआपल्या गरजांचा विचार करून ठरवावे. संभ्रमाच्या वेळी अर्थाताज्ञाचा सल्ला घ्यायला हरकत नाही.

नववर्षाचे आर्थिक संकल्प – व्हिडीओ : सीए श्रुती शहा

Reading Time: < 1 minuteनववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या व्हिडीओामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती देणार आहेत सीए श्रुती शहा!

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग २

Reading Time: 3 minutesमागील भागामध्ये आपण गुंतवणुकीचे प्राथमिक पर्याय पहिले. या भागात गुंतवणुकीच्या अजून काही पर्यायांची माहिती घेऊया.

गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutesगुंतवणूक हा शब्द वरवर जरी खूप सोपा वाटत असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या भावी गरजांनुसार योग्य त्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदार सहसा योग्य नियोजन न करता काहीवेळा झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासापोटी फसवणुकीच्या योजनांना बळी पडतात व आपले मुद्दलही गमावून बसतात. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा ह्या हेतूने आपल्याला उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय पाहूया.

चक्रवाढ व्याजाची जादू – भाग २

Reading Time: 2 minutesआपल्याकडे वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे. “Time is money” हे ऐकत आपण मोठे झालो आहोत. खरच वेळ इतका महत्वाचा आहे का? केवळ शिक्षण, साधना, अध्ययन, मेहनत याच बाबतीत नाही तर पैशाच्या बाबतीत देखील वेळ महत्वाचा असतो का? तर होय! पैशाच्या बाबतीत आणि त्यातही पैशाची गुंतवणूक करताना वेळेला खूप महत्व आहे. तुम्ही कोणत्या वेळी गुंतवणूक करता या पेक्षा तुम्ही किती वेळ गुंतवणूक करत आहात हे फार महत्वाचे आहे. दीर्घकाळ गुंतवणूक तुमच्या सर्वचिंता निरसनाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच, जाणून घ्या चक्रवाढ गुंतवणुकीत वेळेचे काय महत्व आहे.      

Compound Interest: चक्रवाढ व्याजाची जादू

Reading Time: 3 minutesअनेकदा गुंतवणुकीचे साधे सोपे पण जास्त फायदा मिळवून देणारे पर्याय आपल्या समोर असतात पण निव्वळ पुरेशा माहितीअभावी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती करून घेतल्यास जास्त फायदा होऊ शकतो.

करबचतीचे सोपे मार्ग

Reading Time: 4 minutesआपले खरे उत्पन्न न दाखवता बनावट नोंदीतून करापासून सुटका मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असे कराच्या चोरीचे गुन्हे शिक्षेस पात्र असतात. मग करबचत म्हणजेही कराची चोरीच आहे का? तर नाही. करबचत ही कराची चोरी नसून सामान्य माणसाचा कर वाचावा, त्याला कमीतकमी कर भरावा लागावा यासाठीचा एक कायदेशीर मार्ग आहे. व्यक्तीच्या वाढणाऱ्या गरजा आणि त्यांवर होणारा खर्च पाहता, सरकारकडे भरावा लागणारा कर सामान्य माणसाच्या आर्थिक नियोजनावर ताण निर्माण करतो. मोठ्या शहरांमध्ये वाढणाऱ्या गरजा आणि त्यावर होणारा खर्च, भविष्याच्या नियोजनासाठी पैशांची गुंतवणूक, शिक्षणासारख्या गरजांवर होणारा मोठा खर्च, हे सारे खर्च अपरिहार्य असतात. सर्व कर वगळून हातात खर्चासाठी येणारं उत्पन्न (Disposable Income) या सर्वांपुढे अपुरं वाटू लागतं. यातून लोकांनी कर चोरी किंवा इतर बेकायदेशीर मार्गांकडे जाऊ नये. कर वाचावा म्हणून विचारी आणि कायदेशीर मार्गाने करबचत करता येणे सहज शक्य आहे.

Types of Life Insurance: जीवनविमा योजनेचे विविध प्रकार

Reading Time: 3 minutesभारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमा व्यवसाय हा खाजगी क्षेत्राकडे होता. त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात येऊन तो भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे एकवटला. नंतर खाजगी क्षेत्राला परवानगी देण्यात आली आणि एक वर्तुळ पूर्ण झाले. यापूर्वी ‘आयुर्विम्याला पर्याय नाही’ असे भारतीय आयुर्विमा महामंडाळाचे घोषवाक्य होते. अधिकाधिक लोकांनी स्वतःहून जीवनविमा घेऊन आपल्या आयुष्याच्या अशाश्वततेवर मात मिळवल्याचे समाधान मिळवावे, असा त्यामागील हेतू होता. लोकांची क्रयशक्ती एवढी कमी होती की आपल्या आयुष्याचा जोखमीकरिता काही रक्कम खर्च करावी, हे त्यांच्या गळी उतरवणे खूप कठीण होते. अनेक योजनांना बचतीची जोड देऊन विमा देण्यात एल आय सी (LIC) ला यश मिळाले.