RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा

Reading Time: 2 minutes रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा : रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात. बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.  ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.

दिवस असे की कोणी माझा नाही….

Reading Time: 4 minutes कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंपदा टिकली पाहिजे याला प्राथमिकता देऊन सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. परंतु कोरोना नावाचा इंडिकेटर बाजारात गुंतवणूकदारांची धनसंपदा अस्थिर करत आहे. खरंतर समभाग गुंतवणूक म्हणजे अस्थिरता आलीच. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी धास्तावून जाण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी आपत्कालीन निधीची तरतूद न करता दीर्घ मुदतीची गुंतवणूक सुरु केली असेल, त्यांना दोनच पर्याय उपलब्ध होऊ शकतात. पहिला पैशांची तरलता हवी असल्यास भांडवली तोटा सहन करणे किंवा आहे ती गुंतवणूक थांबवून पैसे न काढणे.

कोरोना – रिझर्व बँकेकडून अर्थव्यवस्थेस दुसरा बूस्टर डोस

Reading Time: 2 minutes आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २७ मार्च नंतर लगेचच २० दिवसांनी भारतीय अर्थव्यवस्थेस दुसरा बूस्टर डोस पाजला आहे. कोविड -१९ संकटाशी सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येतील असे यापूर्वीच आरबीआय कडून जाहीर करण्यात आले होते. यामुळे होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ९० तज्ञाची कमिटी (war room) स्थापन करण्यात आली आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय व त्याचे परिणाम-

सरकारी अल्प बचत योजनांचे दर १% पेक्षा अधिक खाली

Reading Time: 5 minutes कोविड-१९ आपत्तीचा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४०% पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच की बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआयने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉजिटचे दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज ही कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँकेच्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करीत आले त्यांना आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय पाहावे लागतील. 

कर्जाच्या हप्त्याला स्थगिती दयावी का?

Reading Time: 3 minutes कोरोनाने महामंदी सोबतच महामारीचा यक्ष प्रश्न उभा केला. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक हातात हात घालून काम करण्यास सज्ज झाले आहेत. लोकांच्या हाती अडचणीच्या काळात खर्च करण्यासाठी पैसे राहावेत म्हणून ३ महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या मुदतीच्या कर्जांचे हप्ते स्थगित करण्याचा पर्याय कर्जदारांना उपलब्ध करून देण्याची मुभा बँकांना देण्यात आली. आर्थिक भाषेत मॉरेटोरीअम म्हणजे कर्जाची परतफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार. परंतु त्यावरून सामान्य कर्जदारांचे बरेच गैरसमज झाले आहेत. आपण हा मुद्दा उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू.

कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !

Reading Time: 2 minutes रिझर्व बँकेचे अलीकडील ‘अर्थव्यवस्थेस गती देणारे निर्णय व त्याचे परिणाम’ यातील कर्ज परतफेड निर्णयाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून याबाबत पत्रकात असलेली असंधिग्ध वाक्यरचना, त्याचे वेगवेगळ्या लोकांनी काढलेले अर्थ आणि समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या उलटसुलट बातम्या यामुळे यातील घोळ अजून वाढत असल्याने यासंबंधी योग्य ती माहिती नक्की काय आहे व त्याचा नेमका काय परिमाण होतो ते पाहुयात.

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutes रिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

कोरोना – रिझर्व्ह बँकेचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचे परिणाम

Reading Time: 3 minutes रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिनांक २७ मार्च २०२० रोजी पत्रकार परिषद घेऊन कोविड १९ मुळे उद्भवलेल्या सध्याच्या कठीण परिस्थितीत अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत हे निर्णय कोणते व  त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल विचार करूयात.

येस बँकेवर निर्बंध – खातेदारांनी काय करावे?

Reading Time: 3 minutes सप्टेंबर महिन्यात “आरबीआय” ने पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याची बातमी आली आणि बँकेच्या खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काल उशिरा आलेल्या येस बँकेसंदर्भातील (yes bank) बातमीमुळे केवळ खातेदारच नाही, तर अनेक गुंतवणूकदारही भांबावून गेले आहेत. पीएमसी बँक सहकारी बँक असल्यामुळे तुलनेने छोटी बँक होती. परंतु “येस बँक” ही खाजगी  बँक असून, वैयक्तिक बचत खात्यांव्यतिरिक्त अनेक कंपन्यांची कॉर्पोरेट अकाउंट्स बँकेमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांची “सॅलरी अकाउंट्स” देखील येस बँकेमध्ये आहेत. कालच्या निर्णयानंतर येस बँकेच्या एटीएम समोर पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीही खातेदारांनी गर्दी केली होती.

सार्वभौम सुवर्ण बाँड १७ जानेवारीपर्यंत विक्रीस उपलब्ध

Reading Time: 3 minutes सार्वभौम सोन्याचे रोखेची (२०१९ -२०२० मालिका आठ) विक्री सध्या सुरु आहे. ही विक्री १७ जानेवारी रोजी बंद होईल. सरकार सोन्याला  प्रति ग्रॅम, रु. ४,०१६/- वर सोन्याचे बंधपत्र जारी करीत आहे. ऑनलाइन अर्ज करणारे आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम रु ५०/- ची सूट मिळते. तर अशा गुंतवणूकदारांना सोन्याच्या बाँडची किंमत  रु. ३,९६६/- प्रति ग्रॅम असेल. कराच्या बाबतीत, परिपक्वतावर भांडवली नफा करमुक्त असतो. सोन्याच्या बाँडवर हा एक विशेष फायदा आहे.