Bank Rate Increased : तीन वर्षांनी झालेल्या व्याज दरवाढीचे अर्थ
Reading Time: 4 minutesमहागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक बसते. ती झळ कमी करण्यासाठी विकासदरावर परिणाम झाला तरी चालेल, अशी भूमिका रिझर्व बँक आणि सरकारने तूर्तास घेतलेली दिसते. बँक दर वाढवून व्यवस्थेतील पैशांची तरलता कमी करणे, हा महागाई कमी करण्याचा एक मार्ग मानला जातो.