Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी
Reading Time: 2 minutesशेअर मार्केट म्हणजे ‘इन्स्टंट मनी’ किंवा ‘झटपट पैसा’ असा रूढ समज आपल्याकडे आहे. “शेअर बाजारात पैसे गुंतवले की तुमचं उखळ पांढरं झालंच म्हणून समजा” असे सल्ले तुम्हाला शेअर मार्केट एजंट किंवा तत्सम इतर कोणा व्यक्तींकडून मिळत असतील. हे समज अगदीच खोटे नाहीयेत. तुम्ही शेअर बाजारात केलेल्या थोड्याशा गुंतवणूकीतून पुष्कळ कमवू शकता, तसेच गमवू ही शकता. थोडक्यात, जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर, तुम्हाला काही प्राथमिक बाबींची माहिती हवीच.