म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग ३
Reading Time: 2 minutesसेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सेबी सर्व रोखे-समभाग बाजाराची नियंत्रक आहे. ३० जानेवारी १९९२ रोजी सेबी कायद्याद्वारे वैधानिक अधिकार प्राप्त झाले जेणेकरून ते नियंत्रक म्हणून चांगले काम करू शकतील. १९९३ साली सेबीने म्युच्युअल फंडासाठी पहिली नियमावली आणली. मात्र १९९६ साली सेबीने सर्व विषय समावेशक अशी (Comprehensive) नियमावली आणली.