Share Market Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesशेअर मार्केट म्हणजे ‘इन्स्टंट मनी’ किंवा ‘झटपट पैसा’ असा रूढ समज आपल्याकडे आहे. “शेअर बाजारात पैसे गुंतवले की तुमचं उखळ पांढरं झालंच म्हणून समजा” असे सल्ले तुम्हाला शेअर मार्केट एजंट किंवा तत्सम इतर कोणा व्यक्तींकडून मिळत असतील. हे समज अगदीच खोटे नाहीयेत. तुम्ही शेअर बाजारात केलेल्या थोड्याशा गुंतवणूकीतून पुष्कळ कमवू शकता, तसेच गमवू ही शकता. थोडक्यात, जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर, तुम्हाला काही प्राथमिक बाबींची माहिती हवीच. 

म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutesशेअरबाजार नवनवीन उच्चांकी विक्रम करीत असताना आपण गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड योजना अपेक्षित परतावा देत नाहीत, असं आढळून आल्याने आपण यातील गुंतवणूक काढून घ्यायचा विचार करताय का? असं असेल, तर तडकाफडकी असा काही निर्णय घेण्यापूर्वी थोडं थांबा. फक्त म्युच्युअल फंड युनिट नव्हे, तर अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांचे मूल्य अनेक कारणांनी कमी अधिक झाले आहे. तेव्हा प्रथम खालील चार प्रश्नांची उत्तरे मिळावा आणि मगच यासंबंधी विचार करा.

म्युच्युअल फंडाचे “साईड पॉकेटिंग” म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesनजीकच्या काळात ही संज्ञा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना परिचित झाली असेल, मात्र बऱ्याच जणांना ही संज्ञा कुठे वापरली जाते किंवा साईड पॉकेटिंगने गुंतवणूकदारांचे हीत जपले जाते का, याची माहिती नसते. आज आपण ‘साईड पॉकेटिंग’बद्दलअधिक माहिती मिळवू. 

गुंतवणुकीचे ४ ‘P’लर

Reading Time: 3 minutesगुंतवणूक करतांना किमान ४ Pलर अनुकरणीय असतात.Participation – सहभाग, Provision – तरतूद, Protection – जोखमीचे सरंक्षण, Profit – परतावा आता वरील मुद्द्यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ६

Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंडांची निर्मिती मोठया समूहाच्या विखुरलेल्या छोटया-छोटया रकमेची गुंतवणूक करण्यासठी झाली. काळानुसार त्यात पारदर्शकता आणण्यासाठी बदल होत गेले, होत आहेत आणि होत राहतील. तरीदेखील दोन प्रकारची जोखीम ही कायम असणार आहेच. पहिली अर्थचक्राची आणि दुसरी कंपनीच्या दोषात्मक व्यवस्थापनाची. कारण या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या बचतीवर परिणाम करू शकतात. हे टाळण्यासाठी तुमची जोखीम क्षमता माहिती असायलाच हवी. 

बँक एफडीच्या जोडीला म्युच्युअल फंडचा “बँकिंग अँड पीएसयू डेट फंड” 

Reading Time: 3 minutesसेबीच्या कडक नियंत्रणाखाली असलेल्या म्युच्युअल फंडाची एक कॅटेगरी आहे जी शेअर बाजाराशी अजिबात संबंधित नाही आणि आपली गुंतवणूक ही फक्त चांगल्या बॅंका आणि सरकारी कंपन्यांच्या व्यवसायात कर्जरोखे स्वरूपात गुंतवून आपल्याला त्यातून मिळणारा परतावा देतात.  त्या कॅटेगरीचे नाव आहे ” बँकिंग अँड पीएसयू डेट फंड ” (PSU म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा सरकारी कंपन्या). गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे हे फक्त नामांकित बँका तसेच, फक्त सरकारी कंपन्या यांच्या कर्जरोखे या मध्ये गुंतविल्यामुळे जोखीम नगण्य होऊन जाते. 

गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

Reading Time: 3 minutesसध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. “दोन-तीन वर्षे चालू ठेवलेल्या सिपमध्ये (SIP) नुकसान कसे काय दिसतेय?” असा जाबदेखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना, याची शंका येतेय. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदारांचा हा सगळा सार्वजनिक गोंधळ उडालेला आहे तो या खेळाचे नियम त्यांनी समजून घेतले नाहीत म्हणून.

चलती का नाम … गुंतवणूक!

Reading Time: 4 minutesबाजारातील जोखीम आणि आपल्या आयुष्यातील इतर व्यवहारातील जोखीम यांच्यात अनेक साम्य आहे. आपले स्वतःचे वाहन जसं रस्त्यावर चालवायला बाहेर काढलं की त्यावर कधी ना कधी लहान सहान ओरखडे हे पडणारच असतात. त्यापायी आपले लक्ष विचलित होऊ देण्यापेक्षा ज्या गोष्टींवर आपला पूर्ण ताबा आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं, तिथं चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे योग्य आहे. याच उदाहरणाचा आपण थोडा खोलात जाऊन विचार केला, तर असं लक्षात येईल की ड्रायव्हिंगचा अनुभव आपल्याला गुंतवणुकीविषयक योग्य दृष्टिकोन तयार करण्यास मदत करू शकतो. 

शेअर बाजार जोखीम:  काही गैरसमज

Reading Time: 4 minutesशेअर बाजार म्हटलं की जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ ‘सुखाचे सोबती’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या तोंडी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे शब्द असतात. पण दुःखाच्या काळात, म्हणजेच बाजारातील पडझडीच्या काळात, तेच ‘हम आपके है कौन?’ असं विचारायला लागतात. अशा चढउतारांना एक समस्या म्हणून नव्हे तर शेअर बाजाराचा गुणधर्म म्हणून स्वीकारले पाहिजे. हीच मार्केट मधील रिस्क किंवा जोखीम आहे आणि तिला तोंड देण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असणे गरजेचे असते. 

शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

Reading Time: 3 minutesशेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते. बाजारात पडझड सुरु झाली की या लोकांची चुळबुळ सुरु होते. मार्केट पुन्हा कधी वर जाणार, पुन्हा जागतिक मंदी येणार का? अमक्या चॅनेल वर पुढील दोन वर्षे खराब जातील सांगितलं मग गुंतवणूक थांबवूया का? अशा विचारणा सुरु होतात.