Browsing Tag
सरकारी योजना
10 posts
सरकारी अल्प बचत योजनांचे दर १% पेक्षा अधिक खाली
Reading Time: 5 minutesकोविड-१९ आपत्तीचा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४०% पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच की बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआयने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉजिटचे दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज ही कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँकेच्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करीत आले त्यांना आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय पाहावे लागतील.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाचावा रु. २,६७,२८० रुपये
Reading Time: 2 minutesघर! सर्वसामान्य माणसाचं आयुष्यातलं एक महत्वाचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस जीवापाड प्रयत्न करत असतो. पण घरांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, महागाई, आर्थिक मंदी अशा आवासून उभ्या राहिलेल्या समस्यांमुळे स्वतःच घर विकत घेण्याचं स्वप्न स्वप्नच राहील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वतःचं घर हे केवळ स्वप्न नाही, तर ती एक मूलभूत गरज आहे, हे ओळखून सरकारने मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारी एक योजना सुरू केली. ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री आवास योजना’.
‘विशेष’ मुलांच्या भविष्याची तरतूद
Reading Time: 3 minutesआयकर कायद्यानुसार विशेष व्यक्तींना व्यक्तिगत, तर ते ज्यांच्यावर अवलंबित आहेत त्यांना आयकरात काही सूट देण्यात आली आहे. अनेक राज्य सरकारांनी व्यवसाय करातून त्यांना वगळले आहे. त्यांच्या कल्याणासाठी काही सोई सवलती देण्यात आल्या आहेत जसे नोकरी, शिक्षण यात राखीव जागा, परीक्षेसाठी लेखनिक घेण्याची परवानगी, काही विषयात सूट, परीक्षेसाठी जास्त वेळ, कर्ज मिळण्यात प्राधान्य, व्याजात सवलत, प्रवासखर्चात सवलत इत्यादी.
या सर्व कल्याणकारी योजना असून यासर्वाचा अशा व्यक्तिंना लाभ घेता येऊ शकतो. अशा विशेष मुलांचे बरेच प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत.
सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना
Reading Time: 4 minutesवित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्यानेच झाली पाहिजे. कमवित्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे शुद्ध विमा खरेदी करणे.शुद्ध विम्याच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाइतकी (Sum Insured) रक्कम विमा पॉलीसीत नामनिर्देशन असलेल्या वारसास (Nominee) देय असते. विमा पॉलीसीची मुदत संपल्यानंतर विमा धारक हयात राहिल्यास विमा कवच बंद होते. परिणामी कुठलीही रक्कम देय राहत नाही. शुद्ध विमा ही गुंतवणूक नसून एक खर्च आहे. विमा पॉलीसीची मुदत संपल्यावर कुठलाही दावा करता येत नाही, या कारणामुळे विमा खरेदी इच्छुक या प्रकारचा विमा खरेदी करण्यास उत्सुक नसतात.
प्रधान मंत्री जन-धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडाल?
Reading Time: 2 minutesजन-धन बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे ज्यांना या योजनेची खरी आवश्यकता आहेत त्यांना त्याचे फायदे मिळतील याची खात्री होते. प्रधानमंत्री जन धन योजनेतून लाभ मिळविण्यासाठी पुढील पात्रता निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री जन-धन योजनेची माहिती
Reading Time: 3 minutesआर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना बँकांशी आणि डेबिट कार्ड व तत्सम बँकिंग संस्थेशी जोडणे हे जन-धन योजनेचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. तसेच, कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पाया आणि डिजिटल इंडिया योजनेला पूरक प्रोत्साहन देण्याचे काम ही योजना करते .प्रत्येक घरात दोन बँक खाते या हिशोबाने देशात एकूण, १५ कोटीहून अधिक बँक खाती उघडणे, तसेच बँक क्षेत्रापासून वंचित असलेल्या ७.५ कोटी कुटुंबांना भारताच्या बँकिंग व्यवस्थेत आणण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवून ही योजना तयार करण्यात आली.