Reading Time: 3 minutes

 मार्केट कधी पडणार? हा लेख लिहून 15/20 दिवस होतात न होतात तोच आज काही दिवसानंतर मार्केट बऱ्यापैकी खाली आलंय. 3 डिसेंबरला ते सर्वोच्च शिखरावर होतं. जेव्हा सेन्सेक्स 63500 हून अधिक होता तेव्हा तो 70000 कधी जाईल याची चर्चा चालू होती तर आज तो 50000 पर्यंत खाली येऊ शकेल असे विचार अनेकजण व्यक्त करीत आहेत वाढयाला सुरुवात झाल्यावर 45 दिवसांत तो सर्वोच्च स्थानी पोहोचला पण थोडा खाली राहून तो 4,5 दिवसात सर्वोच्च स्थानापासून घसरून तीव्रतेने खाली आला. 23 डिसेंबर 2022 रोजी याची तीव्रता सर्वात अधिक होती

हेही वाचा- शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय ? योग्य मार्गदर्शनासाठी हा लेख नक्की वाचा

            खरं तर यात विशेष काहीच नाही गेली अनेक वर्षे वर्षातून दोनचार वेळा मार्केटमध्ये अशी तीव्र घट आणि वाढ होण्याचे प्रसंग येत असतात मग ते कशामुळे झालं याची लेबल आता लावली जातील. 26, 27 डिसेंबर 2022 रोजी बरोबर उलटं घडलं याचं कारण काय? त्यावर अनेक वाद संवाद होतील. जी कारणे दिली जातात त्याचा शुक्रवारी मार्केट पडण्याशी आणि लगेच सोमवार मंगळवारी वाढण्याशी जो काही संबंध जोडला जाईल, तो तकलादू आहे. याबाबत कोणीही अस काही होईल असं निश्चित भाकीत केलेलं नव्हतं आणि करूही शकत नाही. इंडेक्स हा एक सर्वसामान्य मार्गदर्शक आहे, तो वाढला किंवा कमी झाला तर आपल्याकडील सर्व शेअर्स वाढतील किंवा कमी होतील असे नाही.

हेही वाचा- म्युच्युअल फंडातून उत्कृष्ट परताव्यासाठी ‘ही’ काळजी घ्या !

           खरं तर अशा पडझडीची ज्यांना भीती वाटते त्यांनी बाजारात थेट गुंतवणूक करूच नये जरी म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक असेल तर त्याची एनएव्ही कमी अधिक होत राहील. ज्यांना फक्त सुरक्षितता हवीय त्यामी फिक्स डिपॉजीट किंवा डेट फंड योजनाकडे जावे आता हे दर वाजवी झाले असून ते 7 ते 8 % च्या आसपास आहेत. पारंपरिक विचारसरणीच्या लोकांना या वाढीचा फायदा उठवून अधिक दराने अधिक कालावधीच्या मुदतीच्या ठेवी ठेवता येतील. लवकरच हे दर कमी होतील अशी शक्यता वाटते रिजर्व बँकेने त्याच्या प्राईम लेंडिंग रेट कमी केला की बँका कर्जदर कमी करण्याऐवजी फिक्स डिपॉझिटचे दर ताबडतोब कमी करतात. आपल्याकडे महागाई कमी होत चालल्याचे संकेत मिळत असल्याने इतर देशांमध्ये वाढलेली महागाई आणि आपल्या इथे वाढलेली महागाई यात फरक आहे तेथे गेल्या 40 वर्षात झाली नव्हती एवढी महागाईवाढ झाली असल्याचे तेथील मागणी प्रचंड घटली आहे. आपल्याकडे मागणीत सातत्याने वाढ होत आहे यात आपल्या सणासुदीनी मोठा हातभार लावला आहे. यावर्षी प्रथमच कोणत्याही वाहननिर्माण कंपनीने वर्षाअखेर कोणतीही सवलत जाहीर केलेली नाही. कदाचित या कंपन्या पुढील वर्षी किमती वाढवणार असतील तर  त्या तुलनेत ‘वर्तमान भाव हीच सवलत’ अशी त्यांची धारणा असेल.

हेही वाचा- बँकेतील ठेवींना सुरक्षित पर्याय 

            जे शेअरबाजारात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांतून अप्रत्यक्ष गुंतवणूक करीत आहेत त्यानी आपले चित्त विचलित न होता आपली एसआयपी चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण 5% पडझड झाल्यास शक्य असल्यास एकरकमी गुंतवणूक वाढवावी. जे लोक एसआयपी करू शकत नाहीत त्यांनीही आपली गुंतवणूक अशी तीनचार टप्यात करावी. बरेचदा गुंतवणूकदार बाजार वर असताना एकरकमी गुंतवणूक करतात आणि खाली आल्यावर काढून घेतात त्यामुळे अपेक्षित परतावा मिळत नाही. मात्र हा नियम एसआयपीसाठी नाही ती तुम्ही कधीही करू शकता. तेथे आपोआपच सरासरी गुंतवणूकभाव साधला जातो. त्यातही  बाजार खाली आल्यावर युनिट टॉप अप करू शकता. आपले गुंतवणूक उद्दिष्ट नजीक आले असल्यास म्हणजे समजा –

मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करीत असाल तर त्याला लागणारे पैसे हे त्याची बारावी पूर्ण होईल तेव्हा लागतील परंतु त्यावेळी बाजार कुठे असेल हे आपण सांगू शकत नाही तेव्हा सुरक्षितता म्हणून आपल्या गरजेच्या दोनतीन वर्ष आधी म्हणजे त्याची 9 वी किंवा 10 पूर्ण होत असेल त्यावेळी आपल्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीकडून मिळणाऱ्या स्टेटमेंटवर लक्ष ठेवावे यात आपल्याला किती परतावा मिळाला ते समजते. हा परतावा अपेक्षित असलेल्या परातव्याहून अधीक असेल / अनपेक्षित असेल कारण बाजारात अशा संधी कायम येत असतात तर –

*जरुरी नसली तरी जमा युनिटमधील एक वर्ष मागे जाऊन असलेले सर्व युनिट रिडीम करून घ्यावेत. कदाचित 1 लाख रुपयांहून अधिक दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला तर त्यावर 10% या सवलतीच्या दराने कर आकारणी होईल.

*हे पैसे आधीच चालू असलेल्या पीपीएफ /एनपीएस खात्यात किंवा डेट फंड योजना फिक्स डिपॉजीट यात पूर्ण किंवा विभागून टाकता येतील त्यातून ते जरुरीनुसार काढून घेता येतील, त्यामुळे जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा हमखास पैसे मिळतील याची निश्चिती राहील.

हे करीत असताना एसआयपी चालूच ठेवावी ती बंद करू नये.

हेही वाचा – शेअर बाजारात गुंतवणूक करताना गोष्टींचा आपल्या गुंतवणुकीवर होऊ शकतो परिणाम

           जे थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतात, त्यांना हे नक्की माहिती आहे की  बाजार वरखाली होत असताना एकदम सर्व शेअर्स पडतही नाहीत आणि वाढतही नाहीत. याचा फायदा घेऊन आपण योजलेले शेअर्स खरेदी करावेत अथवा विकावेत. अगदी संधीसाधू व्हावे. (संधीसाधू शब्द थोडा खटकत असेल तर संधीशोधू व्हावे.) डे ट्रेडर्सच्या दृष्टीने बाजार असा वरखाली होत राहणे ही पर्वणीच आहे, यात अनेक संधी आहेत. साधारण 9 जानेवारीपासून कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षित असून ते उत्तम असल्यास,  31 जानेवारी 2023 पर्यंत नेहमीप्रमाणे बजेटपूर्व तेजी अपेक्षित आहे. तेव्हा यातील संधीचा शोध घ्या आणि समृद्ध व्हा.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

( लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहे )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…