blockchain
Reading Time: 4 minutes

Blockchain: बिटकॉईन चलन की मालमता

बिटकॉईन चलन की मालमता या लेखाच्या पहिल्या भागात आपण बिटकॉइन विषयी मूलभूत माहिती घेतली. आज आपण ब्लॉकचेन (blockchain) या संकल्पनेबद्दल माहिती घेऊया. या आधीच्या लेखात सेन्ट्रललाईज बँकिंगचा दुरुपयोग होऊन होत असलेली अनिर्बंध नोटांची छपाई त्यामुळे वाढती महागाई यावर उपाय शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करतात हे आपण पाहिले. ज्यांना काहीच समजत नाही किंवा समजूनही ते डोळेझाक करतात ते अधिक व्याजदाराच्या सापळ्यात अडकतात त्यांना अडकवणाऱ्या अनेक योजना वेगवेगळ्या नावाने येत असतात. काही व्यक्तींना भांडवल बाजार योग्य वाटतो, काहींना सोने हा अधिक चांगला पर्याय वाटतो. आज शेअरबाजारात आलेली तेजी व सोन्याचे वाढलेले भाव याच कारणामुळे आहेत. 

हे नक्की वाचा: Bitcoin currency: बिटकॉइन चलन की मालमता?

क्रेप्टोकरन्सी (Cryptocurrency)

  • कोणत्याही व्यवहारातील मध्यस्थ दूर होऊन विकेंद्रित (Decentralized) पद्धतीने व्यवहार सुलभ, तत्पर, खात्रीलायक होऊ लागावेत, त्यात कोणतेही अडथळे असू नयेत अशा शोधात साऱ्या जगाचा प्रयत्न सुरू होता. 
  • यातील अनेक शोध उपयुक्त ठरले नाहीत. सन 2009 मध्ये त्यास बिटकॉईनच्या रूपाने बँकिंग व्यवहार चुटकीसरशी करता येणे शक्य झाले. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या क्रेप्टोकरन्सीज निर्माण झाल्या.  
  • प्रमुख क्रेप्टोकरन्सीज म्हणजे – Ethereum, Tether, Cardano, Binance Coin, Dogecoin, Ripple (Cryptocurrencies)  या नावाने प्रचलित आहेत. अशा प्रकारच्या नवीन चलनाच्या व्यवहाराचे मार्केट निर्माण झाले असून नव्या शेअर्सप्रमाने त्याचे आयपीओ ही येत आहेत. 
  • जगातील महत्वाची Cryptocurrencies Exchanges अशी –  Binance US, Coinbase, Kracen, Geminy, Gate.IO ई. 
  • येथे व्यवहार होऊ शकणारी 18000 हून अधिक वेगवेगळी चलने असली तरी ती ज्या तंत्रज्ञानावर बेतली आहेत ते तंत्रज्ञान एकच आहे त्याचे नाव आहे ‘ब्लॉकचेन’ (Block chain). 

ब्लॉकचेन (Blockchain)

  • गौरव सोमवंशी या तरुणाने गेल्यावर्षी पूर्ण वर्षभर  ब्लॉकचेन या विषयावर या ‘साखळीचे स्वातंत्र्य’ या  नावाची  लेखमाला लोकसत्तेत लिहिली होती त्यात त्यांनी या तंत्रज्ञानाला काचेच्या इंजिनाची उपमा दिली होती. जे पारदर्शक असल्याने सर्वाना पाहता येते पण ही साधीसुधी काच नसून टणक सुरक्षा कवच असलेली काच आहे पण त्यात कुणा एकाला हस्तक्षेप करता येत नाही. 
  • आता हे इंजिन म्हणजे शक्ती प्रतीक, त्याचा वापर कसा करता येईल?  जर त्याचा त्याचा वापर आपल्या कल्याणासाठी करता आला, तर ते  नुसतेच तंत्रज्ञान न राहता ती एक विचारसरणी किंवा तत्वज्ञान  होईल अशा आशयाचा सुंदर विचार मांडला होता.

संबंधित लेख: Bitcoin mining: बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय?

ब्लॉकचेन आणि आउटिंग 

  • या तंत्रज्ञानाचा अकाउंटिंगशी संबंध कसा ते थोडक्यात पाहू –
  • पूर्वी हिशोब लिहिताना एकच नोंद (Single entry) केली जाई. तेथून ते दूहेरी नोंदणी (Double Entry) करण्याची पद्धत अमलात आली आणि आज साऱ्या जगाने ती स्विकारली आहे.  
  • अर्थात त्यातही काही त्रुटी आहेत त्याचा वापर करून अनेक घोटाळेही झाले आहेत. आठवा एमएस शूज, सत्यम, किंवा अलीकडील आयआयएफएल  डीएचएफएल घोटाळे. 
  • यासारख्या समस्यांवर उपाय म्हणून युरी इजिरी या प्रसिद्ध जपानी लेखापरिक्षकाने सन 1989 मध्ये, प्रत्येक व्यावसायिकाचे  एका व्यवहाराचा दुसऱ्या व्यवहारावर होणारा परिणाम नोंदवणारे एक वेगळे  जागतिक खाते (Global Distributed Ledger) असावे अशी ट्रिपल एन्ट्री अकौंटींग पद्धत सुचवली होती. 
  • यातील जी अधिकची नोंद आहे त्यातील हवी असलेली माहिती कधीही पाहता येईल व त्यात बदल करता येणार नाही, यास त्यांनी त्यास क्रिप्टोग्राफी असे म्हटले होते, परंतू तेव्हा इतकी तांत्रिक प्रगती झालेली नसल्याने ही सूचना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञान याच तत्वावर अवलंबून आहे. 
  • ब्लॉकचेन ही एक डिजिटल नोंदवही (Ledger) आहे. यात व्यवहार नोंदवले जातात व ते समजतात त्यात बदल करता येत नाही. 
  • हे तंत्रज्ञान हा संगणकशास्त्र या विषयाचा भाग असून त्यात क्रेप्टोग्राफीचा वापर केला गेला आहे. यात फरक एवढाच पूर्वी तो वेगळ्या कार्यासाठी केला जात असे आता तो वेगळ्या कामासाठी केला जात आहे. 
  • थोडक्यात आधीच विकसित असलेल्या पद्धतीचा नाविन्यपूर्ण वापर यात केला जात आहे. याचे महत्वाचे गुणधर्म म्हणजे- विकेंद्रीकरण, विश्वासार्हता, अपरिवर्तनीय क्रिया, स्वयंस्पष्टता, पारदर्शकता.
  • याबाबत अधिक माहिती घेण्यापूर्वी इंटरनेटचा वापर करीत असताना तेथे असलेल्या प्रचंड माहितीतून योग्य माहिती आपल्याला हॅशिंग या तंत्रातून मिळते.  
  • याचे अनेक प्रकार आहेत त्यामुळे आपल्याला माहितीच्या कितीही मोठ्या साठ्यास मर्यादित करता येऊ शकते. त्यातून आपल्याला एक मर्यादित अंक व अक्षरांचा संच मिळतो. 
  • मूळ माहितीत थोडा जरी बदल केला तरी आपल्याला मिळालेला अंक अक्षरांचा संच म्हणजेच आऊट पूट बदलतो. ही कार्यपद्धती एकमार्गी आहे यात बदल होत नाही आणि हा आउटपुट मी कुणाला दिला तरी जोपर्यंत मी मूळ माहिती जाहीर करीत नाही तोपर्यंत फक्त आऊटपूट वरून  मूळ माहिती काय होती ते समजत नाही. या गुणधर्मामुळे अनेक कामे सोपी होतात. 
  • आपण आपली ओळख म्हणून पासवर्ड तयार करतो. त्याचा संकेतस्थळाकडे हॅश बनतो हा हॅश व आपण टाकलेल्या पासवर्डमुळे तयार झालेला हॅश एकमेकांना जुळले की आपली ओळख सिद्ध होते. यामुळे हॅश जुळले तरी पासवर्ड आपल्याशिवाय कुणालाच माहिती नसतो. ब्लॉकचेन तंत्रज्ञानात हॅशिंगचे काम तसेच राहिले असून त्यामुळे आपली अनेक कामे सोपी होतात.

महत्वाचा लेख:बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान

इनस्क्रिप्टशनचा वापर 

  • या तंत्रात डिजिटल इनस्क्रिप्टशनचाही वापर होतो. एक माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ती तिसऱ्या कुणाला कळू नये याची काळजी घेतली जाते. हे करण्याच्या अनेक पद्धती आहेत 
  • एक कुलूप लावून त्याची किल्ली ज्यांच्याकडे असेल त्यालाच ही माहिती वाचता येतील. 
  • कुलूपबंद माहिती बरोबर कुलुपाची चावी पाठवणे म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला आयती माहिती पुरवल्यासारखे होणार. 
  • यासाठी दोन प्रकारच्या चाव्या असतात त्याचा एकमेकांशी गणिती संबंध असतो. पब्लिक की आणि प्रायव्हेट की यामध्ये यातील पब्लिक की ने माहिती पाठवता येईल आणि त्याची प्रायव्हेट की ज्याच्याकडे त्यालाच ती पहाता येईल. 
  • ज्या दोन व्यक्तींमध्ये व्यवहार झाला त्यांना व्यवहार योग्य व्यक्तींमध्ये होत असल्याची खात्री या प्रायव्हेट की ने मिळेल. 
  • डिजिटल सिग्नेचर प्रमाणेच झालेल्या व्यवहाराची वेळेसह नोंद होते. त्याचा ब्लॉक बनतो तो आधीच्या ब्लॉकला जोडला जाऊन अशा व्यवहारांची साखळी म्हणजे चेन बनते.

विशेष लेख: Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका !

ब्लॉक म्हणजे काय? 

  • बिटकॉईनमध्ये ठराविक काळात झालेले व्यवहारांची वेळेसह होणारी नोंद म्हणजे ब्लॉक. 
  • याची डिजिटल नोंद प्रत्येकाकडे असते. म्हणजेच ती वितरित आहे कुणा एकाकडे तिचे नियंत्रण नाही म्हणजेच विकेंद्रितही आहे. त्यामुळे त्यास जागतिक वितरित विकेंद्रित नोंदवही (Global decentralized distributed ledger) असे म्हणता येईल. 
  • यात नोंद करण्यासाठी HSA 256 ही कार्यप्रणाली वापरली असून ती अतिशय सुरक्षित आहे. हॅशिंगमधील आउटपुट वरून माहिती शोधायची असल्यास सुपर कंप्युटर्सनासुद्धा अशक्य आहे. झालेला व्यवहार योग्य व्यक्तीकडूनच झाला आहे याची सत्यता पूर्ण नेटवर्कला व्हावी लागते. 
  • असे काम करणाऱ्या व्यक्तीला ट्रांजक्शन फी शिवाय त्याला मर्यादित साठ्यातील बिटकॉईन बक्षीस म्हणून मिळतात हे अत्यंत कष्टाचे काम असल्याने  त्याला मायनींग असे म्हणतात. त्यामुळेच पूर्ण नेटवर्कची त्रयस्थता(neutrality) राहायला मदत होते. 
  • बिटकॉईनची रचनाच अशी आहे की जसजशी असलेल्या झालेल्या कोईन्सची संख्या कमी होईल तसतशी ती मिळवणे अधिकाधिक कठीण होत जाईल.

सध्या सर्वच क्षेत्रे कोणतीतरी व्यक्ती आणि संस्था यांच्या नियंत्रणात आहेत आपल्यामुळे निर्माण झालेल्या माहितीचा म्हणजेच डेटाचा उपयोग करून समाजमाध्यमे त्याचा मार्केटींगकरिता कसा वापर करून घेतात ते  आपल्याला माहिती झाले आहे. याच तंत्राचा वापर करून आपल्याला अनेक क्षेत्रात निर्माण झालेल्या मक्तेदाऱ्या मोडून भविष्यातील वेगवेगळ्या संधी आपल्याला ब्लॉकचेन तंत्राचा वापर करून शोधता येतील यातील अनेक गोष्टींवर सध्या प्रयोग चालू असून त्यामुळे सर्वच क्षेत्रातील प्रस्तावित मध्यस्थांचे उच्चाटन होणार आहे. त्याचे परिणाम सकारात्मक आहेत. 30 वर्षांपूर्वी इंटरनेटला ज्यांनी विरोध केला ते मागे पडले. ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांनी आपली प्रगती करून घेतली याहून कित्येक पट अधिक क्षमता ब्लॉकचेन या तंत्रज्ञानात आहे यामुळे आपण समजतो त्यापेक्षा येण्याऱ्या 20 वर्षात मोठे बदल अपेक्षित आहेत. 

(क्रमश)

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Blockchain in Marathi, Blockchain Marathi Mahiti, Blockchain Marathi, Blockchain mhnaje kay? 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…