Reading Time: 3 minutes

टेलिव्हिजनवर नुकतीच करोडपती मालिका चालू झाली आणि अनेकांनी मालिकेत सहभागी होण्यासाठी आपले नशीब आजमवायला सुरवात केली. मालिकेतून काही मोजके लोक करोडपती होतील मात्र इतरांसाठी मालिका फक्त करमणुकीचा भाग राहील.

आपण करोडपती व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र झटपट श्रीमंत होण्याचा नादात आपण फसवणुकीला बळी पडतो व पोंजी योजनांमध्ये आपले मुद्दलही गमावून बसतो.

  • आपल्या संपत्ती निर्माणासाठी आपल्याला शिस्त आणि संयम ह्या दोन महत्वाच्या बाबी अंगिकाराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंड मदत करतात. म्युच्युअल फंड हे सेबी द्वारा नियंत्रित असतात त्यामुळे आपले पैसे कोणी पळवून घेऊन जाईल ही भीती अजिबात नसते. मात्र म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखिमेच्या अधीन असते.
  • शेयर बाजार हा कायम चंचल व अस्थिर असतो. त्यामुळे आपण जर शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर नक्कीच आपण ह्या अस्थिर बाजारावर मात करू शकतो व दीर्घकाळामध्ये चांगली संपत्ती निर्माण करू शकतो. यासाठी म्युच्युअल फंड आपल्याला ‘एसआयपी’ची (SIP) सुविधा देतात. या सुविधेद्वारे एक ठराविक रक्कम दरमहा आपण म्युच्युअल फंडाकडे परस्पर आपल्या बँकेच्या खात्यातून वळती करू शकतो.
  • ‘एसआयपी’चा मागील इतिहास पहिला तर इक्विटी म्युच्युअल फंडांनी ‘एसआयपी’ मधून खूप चांगला म्हणजे अगदी १५ ते १८ % किंवा कधी त्याहून जास्त परतावा दिला आहे. आपले करोडपती होण्याचे स्वप्न म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’मधून कसे साकारत येईल ते आपण पाहू.
  • यासाठी आपण म्युच्युअल फंडाचा कंजर्वेटिव्ह १२% परतावा गृहीत धरू. बरेच आर्थिक सल्लागार आपल्या संकेत स्थळावर आपली गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’चे कॅल्क्युलेटर उपलब्ध करतात ज्यातून आपण आपल्या गुंतवणुकीतील पुढील काळातील वाढीचा अंदाज बांधू शकतो. असाच कॅल्क्युलेटर आमच्या www.nileshtawde.com ह्या संकेत स्थळावर सुद्धा आहे.

एसआयपी कॅल्क्युलेटर:

  • आपण जर रु ३००० ची ‘एसआयपी’चालू केली तर आपले १ कोटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती ३० वर्षे चालू ठेवावी लागेल.
  • आपण जर रु ५००० ची ‘एसआयपी’चालू केली तर आपले १ कोटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती २६-२७  वर्षे चालू ठेवावी लागेल.
  • आपण जर रु १०००० ची एसआयपी चालू केली तर आपले १ कोटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती २० वर्षे चालू ठेवावी लागेल.
  • आपण जर रु १५००० ची एसआयपी चालू केली तर आपले १ कोटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती १६-१७ वर्षे चालू ठेवावी लागेल.
  • येणाऱ्या काळात म्युच्युअल फंडांनी १२% पेक्षा जास्त परतावा दिला तर आपले करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कमी कालावधी लागेल.

आता आपण अजून चांगला ‘सायंटिफिक अप्रोच’ पाहू-

  • दर वर्षी आपले उत्पन्न हे वाढत असते, अशावेळी आपण आपली ‘एसआयपी’ची रक्कम वाढविली तर म्युच्युअल फंड आपल्याला स्टेप अप ‘एसआयपी’ची सुविधा देतात. म्हणजेच दरवर्षी आपण ठराविक रकमेने आपली ‘एसआयपी’ची रक्कम वाढवू शकतो. त्या साठी फक्त एकदाच आपल्याला सूचना द्यायच्या असतात.
  • आपली रु ३००० ची एसआयपी जर आपण दरवर्षी रु ५०० ने वाढविली तर २४ वर्षात आपले रु  १ कोटीचे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप ‘एसआयपी’ने आपले उद्दिष्ट ६ वर्षे अगोदर पूर्ण होईल.
  • आपली रु ३००० ची एसआयपी जर आपण दरवर्षी रु १००० ने वाढविली तर २१ वर्षात आपले रु १ कोटीचे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप ‘एसआयपी’ने आपले उद्दिष्ट ९ वर्षे अगोदर पूर्ण होईल.
  • आपली रु १०००० ची एसआयपी जर आपण दरवर्षी रु २००० ने वाढविली तर १५ वर्षात आपले रु  १ कोटीचे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप ‘एसआयपी’ने आपले उद्दिष्ट ५ वर्षे अगोदर पूर्ण होईल.

आता हाच कॅल्क्युलेटर आपण दुसऱ्या पद्धतीने पाहू-

  • जर माझे वय ४० आहे व मी आता रु २०००० ची एसआयपी करून दरवर्षी  रु २००० वाढविली तर माझ्या निवृत्तीच्यावेळी साधारणत: रु ३ करोड १७ लाख जमा होतील.
  • आपल्या एसआयपी चालू करण्याच्या क्षमतेनुसार आपण ‘एसआयपी’ची रक्कम तसेच स्टेप अप ‘एसआयपी’ची रक्कम ठरवू शकतो व आपल्या स्वतःसाठी निश्चित असे संपत्ती निर्माणाचे उद्दिष्ट ठरवू शकतो. ‘

एसआयपी’करताना लार्ज कॅप फंड/ मिडकॅप फंड/ स्मॉल कॅप फंड  की या कॅटेगरीचे कॉम्बिनेशन करावे यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक सल्लागारांना भेटा.

आजकाल देशाच्या कानाकोपऱ्यातून घरी बसल्या ऑनलाईन आपल्या मोबाईल फोन वरून अगदी १५-२० मिनिटात एसआयपी चालू करू शकतो व नंतर मोबाइलला ऍपद्वारे आपल्या गुंतवणुकीतील वाढ नियमितपणे पाहू शकतो.   

लक्षात असुद्या कि आपण हे जे कॅल्क्युलेटर पहिले ते आपल्याला आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी अंदाज देतात. बाजारातील उतार चढावामुळे आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.

आपल्या करोडपती होणाच्या स्वप्नपूर्तीसाठी आमच्या शुभेच्छा .

धन्यवाद!

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखिमेचा अधीन असते, कृपया योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

– निलेश तावडे

९३२४५४३८३२

[email protected]

(लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते सध्या ते गुंतवणूक सल्लागार आहेत.)

म्युच्युअल फंडाचा करमुक्त परतावा,

म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती,

उत्तम परतावा आणि करबचतीचा पर्याय – ईएलएसएस,

डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला [email protected] वर संपर्क करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…