करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे?
https://bit.ly/2RxJtEA
Reading Time: 3 minutes

करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे?

करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच हो असे असणार. करिअरमध्ये यशस्वी होणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही साध्या गोष्टी आचरणात आणल्यास हे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. या गोष्टी कोणत्या हे आजच्या लेखामधून समजून घेऊ. 

ऋतू आज एकदम खट्टू होती. तिचा प्रमोशन थोडक्यात हातच गेलं होत. कामाच्या बाबतीत एकदम बरोबरीने निष्णात असलेले ऋतू आणि नितिन मध्ये, नवीन आलेल्या नितिनला प्रमोशन मिळेल असे तिलाच काय कोणालाच वाटले नव्हते, मात्र नेमके तेच झाले. आपण इतक्या दिवसांपासून काम करत असताना आपल्याला का डावलले जावे हे काही तिला समजेना. हार मानणार्‍यांमधली ती नव्हती तिने लगेच कारणे शोधायला सुरुवात केली. तितक्यात तिथे वंदना मॅडम आल्या. वंदना मॅम म्हणजे ऑफिस मधला खळखळता झरा! त्यांना प्रमोशनचे समजलेच होते आणि म्हणूनच त्या ऋतू जवळ आल्या होत्या. त्यांना पाहताच विचारात गढलेली ऋतू म्हणाली मॅम, अहो कुठे कमी पडले तेच समजेना. तिला शांत करत मॅम बोलायला लागल्या, हे बघ, आम्ही जेव्हा ट्रेनिंग देत असतो ना तेव्हा नेमके हेच सर्व सांगत असतो. आता मी तुला काही टिप्स देते. मात्र असे नाही की या सगळ्याच चुका तुझ्याकडून झाल्या आहेत. मी तुला जनरल टिप्स देते मग यातून तुला तुझ्या चुका आणि त्यासोबतच तुझे चांगले गुण देखील समजतील. ऋतू आणि तिच्या आणखी काही सहकारी लगेच सावरून बसल्या.

हे नक्की वाचा: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे 

मॅम बोलायला लागल्या ,

खरे पाहता करिअरच्या बाबतीत आपण जिथे काम करतो/ जे काम करतो त्यात नेहमीच ऊंची गाठावी असे सर्वांनाच वाटते. करियर छान चालू आहे म्हणजेच चांगला पगार असणे, चांगल्या पदावर असणे आणि सतत हे दोन्ही सतत वाढत राहावे हेच अपेक्षित असते. अर्थात ही जी करिअरची शिडी असते ती अशीच वर चढत नसते, त्यासाठी कठोर परिश्रम, संभाषण कौशल्य, उत्तम नेटवर्किंग आणि थोडेसे नशीब या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर यासाठी सर्वप्रथम,

करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे? लक्षात ठेवा या ८ गोष्टी

१.ध्येय निश्चित करायचे – 

  • ध्येय निश्चित करायचे म्हणजे काय तर, आपल्याला नेमके काय करण्यात रस आहे, टीम मॅनेज करायला आवडते, सिनीयर लेवलला काम करायचे अथवा एखाद्या विभागात/ विभागासाठी काम करायला आवडते, हे एकदा समजले की मग आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला सोपे जाते. 
  • एकदा का ध्येय ठरले की मग टप्प्या टप्प्याने ते गाठण्यासाठी प्रयत्न सुरू करता येतात जसे की, आपले स्किल्स वाढवायचे, नवीन शिकायचे, गरज पडल्यास नोकरी बदलायची इ.

२. दृढ हितसंबंध बनवायचे – 

  • काम वेळेत पूर्ण करणे हे जितके महत्वाचे तितकेच, काही कामे सहकार्‍यांसोबत करणे देखील गरजेचे आहे. यामुळे हितसंबंध जपायला मदत होते. 
  • कामाच्या ठिकाणी प्रत्येकासोबत मैत्रीपूर्ण वागणूक ठेवणे, कोणाला मार्गदर्शन करणे तसेच, योग्य लोकांकडून मार्गदर्शन घेणे हे नक्कीच फायद्याचे राहते.

संबधित लेख: या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

३. आपल्या कामा व्यतिरिक्त कामे करणे – 

  • आपल्याला नेमुन दिलेले काम हे आपले नियमित काम असते. त्याशिवाय आपल्या सहकार्‍यांचे अथवा काही अन्य काम करून आपण आपल्यामधील वेगळेपणा दाखवून देऊ शकता.
  • अर्थातच ही कामे आपल्या कामाच्या आलेखामध्ये, आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याला वेळोवेळी समजली पाहिजेत, जेणेकरून पदोन्नती च्या वेळेस ह्या गोष्टी विचारात आणल्या जातील.

४. वेळेचे सुयोग्य नियोजन – 

  • कामा व्यतिरिक्त काम केले की नक्कीच आपल्याला प्रशंसा मिळेल, मात्र यामध्ये आपली कामे देखील वेळेत पूर्ण झालेली असणे तितकेच महत्वाचे. 
  • कामाचा प्राधान्यक्रम ठरवून वेळेत काम संपवणे उत्तम!

५. नेतृत्व कौशल्य आत्मसात करा – 

  • यामध्ये उत्तम प्रेझेंटेशन देणे, एखाद्या प्रोजेक्टची जबाबदारी घेणे ही कामे तर आहेतच, याशिवाय मिटिंग्स मध्ये बोलणे, नवनवीन कल्पना मांडणे, त्या अमलात आणणे याकडे देखील लक्ष द्यावे.
  • हे सर्व करताना देखील आपल्या हे लक्षात असायला हवे की आपल्याला आहे तिथेच नाही राहायचे तर शिडीने वर जायचे आहे, तर त्यासाठी कामगिरी दाखवावी लागणार.

हे नक्की वाचा: कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)? 

६. आपण केलेली उत्तम कामे अधोरेखित करणे  – 

  • याचा अर्थ असा मुळीच नाही की आपल्या कामाबद्दल, होणाऱ्या कौतुकाबद्दल नेहमी बढाई मारत राहणे, मात्र आपण जे उत्तम करतो ते समजायलाच हवे. 
  • आपण केलेलय कामांचे चीज व्हावे व त्याचे क्रेडिट कोणी दुसर्याने घेऊ नये यासाठी सतर्क असणे आवश्यक आहे. 
  • अशी कामे नक्कीच आपल्या रोजच्या कामात नोंदवायची अथवा अधिकार्‍याला पाठवल्या जाणार्‍या संदेशांमध्ये नोंदवायची.

७. योग्य पोशाख (ड्रेस कोड) – 

  • प्रत्येक ठिकाणाचा एक ठराविक असा पोशाख असतो. कामाच्या ठिकाणी शक्यतो फॉर्मल कपडे वापरणे योग्य असते. आपण योग्य तो पोशाख घालतो म्हणजेच आपण आपल्या कामाबद्दल, सहकारी आणि वरिष्ठांबद्दल, आदर दर्शवतो. 
  • योग्य ठिकाणी योग्य कपडे घातल्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप चांगली पडते.

८. आपल्या सहकार्‍यांचे/ वरिष्ठांचे गुण आत्मसात करणे – 

  • बरेच यशस्वी कर्मचारी हे उत्तम निरीक्षक असतात. जे वरच्या पदावर पोहोचलेत त्यांचे चांगले गुण, कौशल्ये, अनुभव, काम करण्याची आणि करून घेण्याची पद्धत ते आत्मसात करतात.

अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्यास ना तर बघ प्रमोशन हातचे नाही जाणार ऋतू. ऋतू तर ऐकण्यात गुंतून गेली होती. मॅमचे बोलणे संपले, तसा तिच्या चेहर्‍यावरचा खट्टूपणा पळून गेला होता. अगदी उत्साहाने ती म्हणाली, हो मॅम बर्‍याच ठिकाणी मी कमी पडलेली असणार. तेव्हाच प्रमोशन नाही मिळू शकले. पण आता पासूनच मी चांगली तयारी करेन म्हणजे पुढच्या वर्षी प्रमोशन पक्क!

मॅडमनी आठवण करून दिली तसे सगळे जण अगदी मोकळ्या मनाने नितिनला अभिनंदन करायला गेले.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –