Bitcoin FAQ:
बिटकॉईनवरील तीन भागातील लेखमाला प्रसिद्ध झाल्यावर यासंबंधात आपण विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे (Bitcoin FAQ) देण्याचा माझा प्रयत्न आहे. बिटकॉइन लेखमाला आपण वाचलीत अनेकांनी ती आवडल्याचे वेळोवेळी कळवले त्यामुळे माझा उत्साह वाढायला मदत झाली. लेखमाला लिहिण्याच्या निमित्ताने मी बिटकॉईनमध्ये थोडीशी गुंतवणूक केली. या लेखनाच्या निमित्ताने यासंबंधात अनेक गोष्टींची मी माहिती करून घेतली यासाठी अनेक जाणकार व्यक्तींशी चर्चा केली.
लेखमाला लेख क्र १: Bitcoin currency: बिटकॉइन चलन की मालमता?
बिटकॉईन लेखमालेच्या निमित्ताने…काही प्रश्न त्यांची उत्तरे ही माझी वैयक्तिक मते आहेत ती सर्वाना मान्य असती पाहिजेत असे नाही.
Bitcoin FAQ: बिटकॉईन संदर्भात महत्वाची प्रश्नोत्तरे
१. आपण कुठे गुंतवणूक केली आहे का?
– मी सध्या अगदी किरकोळ रकमेचे बिटकॉईन केवळ व्यवहार कसे होतात ते माहिती करून घेण्यासाठी आणि गुंतवणूक म्हणूनच केली आहे.
२. आपल्या गुंतवणुकीतील किती टक्के रक्कम यात असावी?
-आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे, २% बिनधास्त पण परतावा मिळण्याचे प्रमाण समाधानकारक असल्यास 10% पर्यंत वाढवता येईल.
३. कोणत्या प्लँटफॉर्मवरून ही गुंतवणूक करावी?
-अनेक प्लँटफॉर्म उपलब्ध आहेत. आपले पॅन आणि आधार याचा उपयोग करून खाते उघडता येईल. pocketbit.in खूपच युजर फ्रेंडली आहे किमान ₹५००/- गुंतवणूक करता येते, १५० हून अधिक कॉईन्सचे व्यवहार तेथे होतात. त्याचे ॲपही आहे त्यातील वॉलेटचा वापर करावा.
४. यासाठी अनेक खाती उघडावी लागतील का?
-आपण कुठे गुंतवणूक करणार त्यावर ते अवलंबून आहे. १८००० हून अधिक कॉईन उपलब्ध आहेत. नवीन कॉईन्सचे पब्लिक इश्यू येत आहेत. अनेक ट्रेंडिंग प्लॅटफॉर्म निर्माण होत आहेत.
५. याच्या खरेदीविक्री वर बंधने आहेत का?
-कोणतीही बंधने नाहीत, खरेदीविक्री करणे कोणत्याही कायद्यान्वये बेकायदेशीर नाही.
लेखमाला लेख क्र २ : ब्लॉकचेन तंत्रज्ञान नक्की काय आहे?
६. सरकार यावर बंदी आणेल का?
-सरकार यावर बंदी आणू शकेल किंवा नाहीही, नक्की काय करणार याबद्दल निश्चित असे सरकारी धोरण नाही.
७. यातून मिळणारा फायदा कसा दाखवावा त्यावर कर भरावा लागेल का?
-याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही, जाणकार व्यक्तींच्या मते हे अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न म्हणून जाहीर करून याप्रमाणे आवश्यक असा अल्प आणि दीर्घ मुदतीचा भांडवली नफा आहे असे समजून कर भरावा याबाबत आपल्या करसल्लागाराचा सल्ला घ्यावा हे उत्तम.
८. गुंतवणूक योग्य कॉइन कोणते?
-नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी खालील कॉइन्समध्ये आपली गुंतवणूक एसआयपी पद्धतीने करावी हे जाणकारांचे मत.
- BTC
- ETH
- ADA
- Matic
- Dot
मी नवीन असल्याने सध्या याबाबत अधिक काही सांगू शकत नाही.
९. व्यवहार कधी करता येतात? सुटी कधी असते?
-लेखात सांगितल्याप्रमाणे २४×७ असे व्यवहार होतात, सुटी नाही.
१०. यात ट्रेंडिंग शक्य आहे का?
– यामध्ये भावात पडणारा फरक म्हणजेच अस्थिरता (कधीकधी दिवसात ४०%,५०% किंवा त्याहून अधिक असल्याने) ट्रेडर्सना आकर्षक करणारी आहे. ट्रेंडिंग शक्य असून त्याचे एफएनओ मध्ये सौदेही चालू आहेत.
११. हे धोकादायक नाही का?
-निश्चितच कखूप धोकादायक आहे, म्हणूनच त्यातून होऊ शकणाऱ्या नफा तोटा याचे प्रमाणही अधिक आहे. आपली काय तयारी आहे त्याप्रमाणे यात किती गुंतायचे आणि किती गुंतवायचे ते ठरवावे.
१२.अनेकांचा याला विरोध आहे मग काय करावे?
-विरोध असणारच, सध्यातरी तुम्ही काय करा काय करू नका अशी सक्ती तुमच्यावर नाही. तेव्हा काय करायचं तेही आपल्यावरच नाही का, अधिकाधिक माहिती मिळवून ज्ञानी व्हावे हे उत्तम. यातून येणाऱ्या अनुभवांची देवाणघेवाण करावी.
१३. अशी चर्चा नक्की कुठे करता येईल?
– यासाठी व्यासपीठ निर्माण करायची गरज आहे जाणकार आणि नवोदित एकत्र येत असतील तर याबाबत काहीतरी निश्चित मार्ग काढता येईल. या विषयातील जाणकार श्री आदित्य लेले यांनी आपल्याला यासंबंधात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे मान्य केले आहेत. आपले प्रश्न आणि काही शंका असल्यास त्या कमेंटमध्ये टाकाव्यात किंवा मला कळवाव्यात, त्याच्या सोयीनुसार एक फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आपण लवकरच करूयात. ज्याची पूर्वसूचना आपणास दिली जाईल त्यामुळे या सर्व शंकांचे निरसन होण्यास मदत होईल.
लेखमाला लेख क्र ३: बिटकॉईन आणि भविष्यात होऊ शकणारे बदल
या लेखमालेसाठी मी तज्ज्ञांनी लिहिलेल्या विविध लेखमालांचा अभ्यास केला. त्यांच्याशी चर्चा केली –
- ब्लॉकचेन या विषयावर विस्तृतपणे माहिती देणारी लेखमाला गौरव सूर्यवंशी यांनी सन 2020 मध्ये लोकसत्ता मध्ये लिहिली होती ती लेखमाला,
- श्री अरुणजी गोगटे यांनी वेळोवेळी पुरवलेले या विषयाच्या संदर्भातील विशेष अंक
- मी माहिती घेण्यासाठी वेळोवेळी फोन करून, मेसेज केल्यावर तत्परतेने उत्तरे देणारे माझे समाज माध्यमावरील मित्र आदित्य लेले, सागर शिंदे, अजिंक्य सुर्वे, शरद गोडांबे यांच्याशी केलेल्या चर्चेतून अनेक महत्वाचे मुद्दे मिळाले. यासर्वांचेच मनःपूर्वक आभार!
- या सर्व लेखांवर प्रत्येकवेळी विशेष टिप्पणी म्हणून माधव भोळे यांनी काही संदर्भ लेख पाठवले,पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या याबाबत मी यातील तज्ज्ञांशी चर्चा केली.
- त्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे चलन आणि स्टॉक मार्केट यांची तुलना केल्याने, सेन्टरलाईज बँकींग, गोल्ड स्टॅंडर्ड या संकल्पना याबाबत झालेल्या गोंधळामुळे आहेत असे त्यांचे मत आहे.
हे नक्की वाचा: Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका !
भविष्यात यात काही घोटाळे होऊ शकतील का? अशा शंका दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत त्यांची समाधानकारक उत्तरे मिळायला हवीत. त्यामुळे क्रेप्टोचे काहीतरी नियमन असायला हवे अशा मताच्या सध्यातरी मी बाजूने आहे. मूळ योजना म्हणून जरी ब्लॉकचेन तंत्रज्ञान कितीही चागले असले तरीही यातून काही गुंतवणूकदारांचे ट्रेंडिंग किंवा भावातील तीव्र अस्थिरता, यामुळे होऊ शकणारे नुकसान सोडून, काही गैरव्यवहार होऊन कदाचित नुकसान झालंच तर तेवढी तपास यंत्रणा सक्षम असायला हवी कारण गैरव्यवहार करणारे लोक नेहमीच एक पाऊल पुढे असतात.
– उदय पिंगळे
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Bitcoin FAQ in Marathi, Bitcoin FAQ Marathi mahiti, Bitcoin FAQ Marathi, Bitcoin Marathi Mahiti, Bitcoin in Marathi, Bitcoin FAQ