Future of Bitcoin
Reading Time: 4 minutes

Future of Bitcoin

आजच्या लेखात आपण बिटकॉईन आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या बदलांबद्दल (Future of Bitcoin) माहिती घेऊया. या आधीच्या लेखातून बिटकॉईन निर्मितीची गरज त्याचप्रमाणे ते ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाविषयी माहिती आपण करून घेतली. हे चलन विकेंद्रित, विश्वासार्ह, स्वयंस्पष्टता, व्यवहारात फेरफार न करता येणारे व पारदर्शक असल्याचे जगभरात लोकांनी त्याला मान्यता दिली. त्याची रचनाच अशी आहे की तुम्ही नाही म्हणालात तरी त्यात व्यवहार करता येणे शक्य आहे. मोठ्या प्रमाणात त्यास लोकमान्यता मिळत असल्याने त्याद्वारे थेट खरेदी विक्री व्यवहार करता येणे त्याचप्रमाणे आपल्याला मान्य असलेल्या चलनातून त्याचे व्यवहार करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळेच हे चलन कमी आणि एक पैशाच्या व्यवहारांची डिजिटल पद्धत झाली आहे. 

हे नक्की वाचा: Bitcoin: बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका !

बिटकॉइन-

 • या चलनाच्या निर्मात्यांनी त्याची रचना कशी असेल याविषयी आपला शोधनिबंध सन 2008 मध्ये प्रकाशित केला. 
 • यात व्यक्ती व्यक्तीत कोणत्याही मध्यस्थाशिवाय व्यवहार होऊ शकतील. ते त्याच्या खास रचनेमुळे मान्य केले गेल्याने त्याच्या सत्यतेसाठी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता नसेल. 
 • विविध ठिकाणी विभागले गेलेले त्याचे सर्व्हर नोड हे त्याच्या रचनेचा भाग असतील जे बिटकॉईनच्या मूळ तत्वाशी काम करतील विभाजन नोंद ठेवून त्याचे जतन करतील. यासाठी तयार नियमांचे ते पालन करतील. 
 • विविध ठिकाणी असलेल्या या व्यवहार नोंदी सगळीकडे सारख्याच असून त्यात बदल करता येणार नाही. 
 • यातील अन्य घटक ज्यास नोड असे म्हणतात ते विशेष प्रकारचे प्रोसेसर वापरून झालेले व्यवहार प्रमाणित करतील याशिवाय काही मायनर असतात कारण त्याच्याकडे पूर्ण डेटा असेल परंतू सर्व नोड मायनर असतीलच असे नाही ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नेटवरील डेटा साठवण्याची सोय असेल तो नोड म्हणून काम करू शकेल. नोडच्या कार्यपद्धती वरून त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. 
 • मायनर आणि नोड यांना काही अत्यल्प प्रमाणात मोबदला मिळतो याशिवाय मायनारना बिटकॉईन बक्षीसरूपात मिळू शकतात.

 संबंधित लेख: बिटकॉइन चलन की मालमता?

Blockchain: ब्लॉकचेन तंत्रज्ञान नक्की काय आहे?

बिटकॉईन रचना

 • बिटकॉईन रचना कशी असेल ती कशी कार्य करेल यासंबंधी नेटवर त्याचे निर्माते म्हणून संतोषी नाकामोटो यांच्या नावावर एक श्वेतपत्र (White paper) उपलब्ध आहे. 
 • ही व्यक्ती नक्की कोण?  एक आहे की व्यक्तींचा समूह यासंबंधी कोणतीही माहिती अजूनपर्यंत उपलब्ध नाही बिटकॉईन निर्माता म्हणून रचनेत त्यांना कोणतेही विशेष स्थान नाही. यात त्याने बिटकॉईनचा उल्लेख मालमत्तेशी केला आहे. 
 • आपल्याला त्याचा वापर चलनासारखा किंवा पैसे पाठवण्याची पद्धत म्हणून करता येतो.आपल्याकडे बिटकॉईन व्यवहार करण्यास कोणतीही बंदी नसून त्यासाठी उपलब्ध असलेल्या एक्सचेंजवरून ते करता येतात. 
 • त्यासाठी केवायसी करून आपली ओळख व राहण्याचे ठिकाण यांची माहिती द्यावी लागते. बिटकॉईन सुरू झाल्यापासून अनेक भारतीयांनी त्यात पैसे गुंतवले असूनअनेक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म येथे उपलब्ध असून अत्यंत छोट्या रकमेचे व्यवहार तेथे करता येतात त्याचबरोबर इतर कोईन्स व नव्याने बाजारात येणाऱ्या कोईन्सचे व्यवहार त्यांच्यामार्फत करता येतात याठिकाणीचे सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीनेच होतात. 
 • बिटकॉईनची किंमत सन 2017 पासून खूप मोठ्या प्रमाणात वरखाली होत आहे. सन 2016 पर्यंत बिटकॉईनमध्ये झालेल्या वाढीच्या पाच पट वाढ सन 2017 मध्ये झाली. त्यामुळेच अनेकजण त्याकडे आकर्षित होत आहेत. याशिवाय त्यात वायद्याचे व्यवहार चालू झाले असल्याने त्यातील उलाढाल बरीच वाढली आहे. 
 • या कोईन्सची संख्या मर्यादित आणि मागणी अधिक त्यामुळेच खरेदी विक्री किमतीवर याचा परिणाम होत असून रोजच्या भावताही खूप मोठा फरक दिसून येतो. 
 • जपानने आपल्या देशात या पेमेंट पद्धतीला मान्यता दिली आहे. शिकागो बोर्ड ऑप्शन एक्सचेंजने त्याचे फ्युचर व ऑप्शन मधील सौदे सुरू केले आहेत. यासर्वांमुळेच मालमत्ता स्वरूपातील एक नवीन प्रकार म्हणून त्याची नव्याने ओळख प्रस्थापित होत आहे. आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करताना काही प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करता येईल. 
 • याबाबत कोणतेही पूर्वग्रह न बाळगता यासंबंधात विचार करणाऱ्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर चर्चा करून यातील फायदे तोटे यांचे मूल्यमापन करावे. 
 • बिटकॉईन चालू झाल्यापासून त्यात व अन्य क्रेप्टो करन्सीजमध्ये गेल्या वर्ष अखेरीस 50000 कोटी एवढी गुंतवणूक झाली असून यात रोज 1500 कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत.
 • मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजारातील सर्व प्रकारातील दैनिक उलाढाल 2 लाख कोटी आहे म्हणजेच तुलनेत ती 1% ही नाही. तरीही भारतातील शेअरमार्केटमद्धे  गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारातील 16% लोक या गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत यात 25 ते 35 या वयोगटातील लोक प्रामुख्याने आहेत. 

विशेष लेख: Bitcoin mining: बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय?

युवा वर्गामध्ये आकर्षण –

 • तरुण याकडे आकर्षित होण्याची मुख्य कारणे अशी-
  • या वयोगटातील लोक अधिक जोखीम घेऊ शकतात.
  • मागील 10 वर्षात यातून सर्वाधिक परतावा मिळाला आहे.
  • भावामधील चढ उतार यामुळे ट्रेंडिंग शक्य.
  • एफएनओ व्यवहारामुळे उलाढालीत वाढ.
  • 24×7 व्यवहार होऊ शकत असल्याने वेळेचे बंधन नाही.
  • सहज, सुलभ, जलद, सुरक्षित,पारदर्शक व्यवहार शक्य.
  • अनेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, एक्सचेंज स्टार्टअप उपलब्ध.
  • किमान गुंतवणूक ₹ 10 ते ₹ 500/- यातून.
  • दलाली अत्यंत कमी.
 • यासाठी लागणारी ऊर्जा हाच चिंतेचा विषय असून त्याचा वातावरणावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय होऊ शकतो. यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. 
 • यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे क्रेप्टोकरन्सी संबंधीत सरकारी घोरणात कोणतीही स्पष्टता नाही, तसेच त्यावर बंदीही नाही. सध्या जे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्यावर थोडे नियमन व नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे. 
 • यावर बंदी घालून ते थांबवता येणार नाहीत तसेच सध्या चालू स्टार्टअप बंद पडतील आणि छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान होईल या सर्वाचा नीट विचार करावा लागेल.

क्रेप्टोकरन्सीमुळे होऊ शकणारे फायदे

 • बँकिंग, फायनान्स इन्शुरन्स या क्षेत्रात महत्वपूर्ण बदल
 • सुरक्षित आर्थिक व्यवहार शक्य
 • व्यवहाराच्या अचूक नोंदी
 • जलद आंतरराष्ट्रीय व्यवहार

महत्वाचा लेख: बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान

यात गुंतवणूक किंवा ट्रेंडिंग करताना सावध तो सुखी या दृष्टीने-

 • सर्व गुंतवणूक एका क्षेत्रात नको त्यामुळेच तसेच हा अलीकडील प्रकार असल्याने सध्या यात 2% हुन अधिक गुंतवणूक नको.
 • यात होणारे चढ उतार खूप तीव्र असल्याने यासाठी आपले मनोबल अधिक वाढवावे लागेल.
 • खरेदी विक्री करणाऱ्या प्लँटफॉर्मची माहिती जाणकारांकडून करून घ्यावी.
 • कोणत्याही टिप्स किंवा ऐकीव माहितीच्या आधारे व्यवहार करू नयेत.
 • यातील ब्लू चिप करन्सीज मधेच व्यवहार करावेत.
 • जगभरात 24×7 याचे व्यवहार होत असल्याने जगातील घडामोडीवर लक्ष ठेवावे. सातत्याने याचे भाव कोणत्याही वेळी पाहून अनेकांचे मानसिक शारीरिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
 • यावर लागणारा कर मोजून त्याचा रीतसर भरणा करावा. तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार यावर मालमत्ता समजून भांडवली नफा आकारणी होईल. यापासून होणारा अल्पमुदतीचा फायदा
 • हा अन्य मार्गाने मिळवलेले उत्पन्न समजून त्यावर नियमानुसार कर आकारणी होईल. तर तीन वर्षांनंतर दीर्घमुदतीच्या नफ्यावर 20% दराने करआकारणी होईल यावर इंडेक्सएशन बेनिफिट घेता येईल.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर-

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अनेक प्रकारे वापर करता येईल त्यादृष्टीने प्रयत्न चालू असून काही त्यावर विविध प्रयोग चालू असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्यातील काही शक्यता अशा-

 • मेडिकल डेटा सुरक्षितपणे शेअर करण्यासाठी. 
 • ज्यात कोणालाही बदल करता येणार नाही अशा पद्धतीने फोटो, ऑडिओ, व्हिडीओ सर्व प्रकारच्या डिजिटल फाईल साठवून ठेवण्यासाठी.
 • संगीताचे स्वामित्व हक्क जपून त्याचे मानधन मिळवण्यासाठी.
 • दोन देशातील आर्थिक व्यवहार सुलभतेने आणि त्वरित होण्यासाठी.
 • कृत्रिम बुद्धिमत्तेचा ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये रियल टाईम वापर करण्यासाठी.
 • वैयक्तिक गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी.
 • मनी लॉड्रींग वर नियंत्रण ठेवण्यासाठी. 
 • सार्वजनिक वितरण व्यवस्था, सप्लाय चेन मॅनेजमेंट अधिक चांगलीकरण्यास, वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी.
 • मतदानपद्धतीत सुधारणा. 
 • जाहिरात क्षेत्र आणि मार्केटिंग मधील सुधारणा.
 • लेखनाचे कॉपीराईट सुरक्षित राहण्यासाठी.
 • रियल इस्टेट व्यवहार, जमिनीच्या मालकीच्या अचूक नोंदी.

या विषयांशी संबंधित अनेक मध्यस्थांचे येत्या काळात उच्चाटन होऊन मध्यस्थांशीवाय यातील सर्व व्यवहार सहज, सुलभ, जलद आणि अत्यल्प खर्चात किंवा मोफतही होऊ शकतील. या विषयाशी संबंधित अधिकाधिक माहिती थोडक्यात देण्याचा हा प्रयत्न असून हे तिन्ही लेख वाचून पुढील 10 दिवसात आपल्या काही शंका असल्यास जाणकाराकडून त्याचे उत्तर मिळवून त्यावर वेगळा लेख मी लिहिन. 

माझी बिटकॉईनमध्ये किरकोळ गुंतवणूक असून याबाबत मला  जागृत झालेल्या कुतुहलतेने एक खाते काढून मी गुंतवणूक केली आहे. केवळ आपल्याला माहिती व्हावी एवढाच या लेखमालेचा उद्देश असून यातील माहिती अचूक देण्याचा हा प्रयत्न आहे काही त्रुटी राहिली असल्यास ती निदर्शनास आणून द्यावी. त्याप्रमाणे दुरुस्ती करण्यात येईल, म्हणजे अचूक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Future of Bitcoin in Marathi, Future of Bitcoin Marathi Mahiti, Future of Bitcoin Marathi, Future of Bitcoin kay asel?

Share this article on :
1 comment
 1. सर नमस्कार, मी आपले लेख एक वर्षा पासुन वाचत आहे. आपले लेख वाचल्यावर भरपूर ऊर्जा प्राप्त झाल्यासारखं वाटत. मी पण माझ्या पत्नीचे wazirax वर cryptocurrency che account open केले आहे. आपले पण cryptocurrency che लेख वाचले छान माहिती आहे. सर अजून cryptocurrency बाबत माहिती आपल्याकडे असेल तर जरूर पाठवा. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…