Reading Time: 3 minutes
- ऑफर म्हटलं की आपसूक तिथे भेट देणं हा मानवी गुणधर्म आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सध्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी मार्केटमध्ये विविध ऑफर देण्याची चढाओढ पहायला मिळते. बॅंकिंग क्षेत्रही याला अपवाद ठरलेलं ऩाही.
- आपल्या खातेदारांना आकर्षित करण्यासाठी विविध बॅंकांकडून विविध फंडे वापरले जातात. कधी कमी व्याजदराचे प्रलोभन दाखवले जाते तर कधी विविध ठेविंवर आकर्षक व्याजदर दिले जाते आणि अशा ऑफरमुळे अनेक जणांचे विविध बॅंकेत एका पेक्षा अनेक खाते असल्याचे आढळून येते.
- मुळात सध्या ऑनलाईन, डिजिटलायझेशनच्या जमान्यामध्ये पेपरवर्कला लोक फारसे महत्व देताना दिसत नाही. त्यामुळे घरी बसल्या बसल्या एका क्लिकवर बॅंक खाते उघडण्याची सोय झाली असल्याने नो झेराॅक्स, नो के वाय सी चे पेपर ची झंजट, काही मिनिटात तुमचे खाते उघडेले जाते. त्यामुळे एका व्यक्तीची वेगवेगळ्या बॅंकेत वेगवेगळी बचत खाती दिसून येतात.
- बॅंकेत खाते उघडणे हा आर्थिक गुंतवणुकीचा मोठा भाग आहे. मात्र एका पेक्षा अनेक खाती उघडणे हे कितपत फायद्याचे आहे की यामध्ये जोखीम आहे हे आपण पाहणार आहोत.
बँकेत खाते उघडण्याचे फायदे
- भत्ते आणि विशेषाधिकार –
- बहुतांश बॅंका आपल्या खातेधारकांना एका पेक्षा जास्त लॅाकरची ऑफर देतात, तसेच वीमा प्रीमियम डेबिट कार्ड आणि इतर विशेषाधिकार ज्यांचा वापर करता येईल. या व्यतिरीक्त खातेधारकांना युटिलिटी पेमेंट किंवा जसे खरेदी-शॉपिंग, तसेच हप्ते करण्यावर बक्षिसे आणि सूट दिली जाते.
- त्यामुळे एकाधिक खाती असल्यास खर्च करताना तुम्हाला जास्तीत जास्त बचत करण्यास मदत होऊ शकते. तसेच एटीएम मधून एका महिऩ्याला मोफत पैसे काढण्याला मर्यादा घालण्यात आल्याने एका पेक्षा जास्त खातेधारकांना विशेषतः एटीएमच्या वारंवार वापरकर्त्यांसाठी याचा फायदा होतो.
नक्की वाचा – Key Ratios of Banking Finance Sectors : काय आहेत बँकिंग फायनान्स क्ष्हेत्राची गुणोत्तरे ?
- ध्येयानुसार विशिष्ट खाती –
- अनेक जण आर्थिक ध्येय गाठण्यासाठी एका पेक्षा अनेक खाती उघडण्यावर भर देतात. त्यामध्ये परदेशातील प्रवास, वाहन खरेदी, उच्च शिक्षण यासारखे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध बॅंकेत खाती उघडतात. तर काही जण कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी जॉईंट अकाउंट उघडतात. तर काही जण आकस्मक निधी जमा करण्यासाठी म्हणून खाती उघडताना दिसतात.
- बँकिंग भागीदार विशेषाधिकार –
- विविध ऑनलाइन आणि ई-कॉमर्स पोर्टल्स त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर प्रदान करण्यासाठी बँकेशी टायअप करतात. त्याचा वेगवेगळ्या बँकेत अनेक खाते असणाऱ्याना अशा ऑफरचा लाभ घेता येतो.
महत्त्वाचा लेख – New Bank Locker Rules : लॉकर संदर्भात रिझर्व्ह बँकेची नवी नियमावली
- सुरक्षा –
- अनेक शेड्युल्ड बँकेत रु.५ लाखांपर्यंतच्या ठेवी वर विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे विमा उतरवला जातो.
- जेव्हा एखादी बँक बुडीत जाते किंवा आपल्या खातेधारकाला ठेवी परत करण्यास अपयशी ठरते तेव्हा खातेदारांकडे असलेली रक्कम रिझर्व्ह बॅंकेची उपशाखा असलेली क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे मिळवता येते. मात्र एकाच बॅंकेत जास्त रक्कम ची ठेव ठेवणे धोकादायक ठरू शकते. मात्र, ज्या बॅंकेचा वीमा आहे तसेच ज्या बँकेचे प्राथमिक खाते आहे त्या बँकेद्वारे डिफॉल्ट झाल्यास असे खाते बॅकअप म्हणून वापरले जाऊ शकते.
एकापेक्षा जास्त बँक खाती उघडण्याचे तोटे –
- ए एम बी अर्थात एव्हरेज मंथली बॅलेंस सरासरी मासिक शिल्लक –
- बॅंकेच्या नियमानुसार खात्यात सरासरी मासिक शिल्लक ठेवणे खातेधारकांना क्रमप्राप्त असते. नाहीतर बॅंकेकडून दंड आकारला जातो. एकाधिक खाती असल्यास सरासरी मासिक शिल्लक राखणे अवघड जाते.
नक्की वाचा – bank and credit cards : क्रेडीट कार्ड व्यवसायातून बँकेला बँकेला नक्की काय फायदा होतो ?
- व्याजाची रक्कम गमावणे –
- बचत खात्यावर सर्व बॅंकांचे वेगवेगळे व्याजदर असतात. त्यामुळे विविध खात्यांमधील ठेवींवर वेगवेगळा व्याजदर लागला जातो. त्याचा फटका खातेधारकांना बसू शकतो.
- जेव्हा जमा केलेली रक्कम ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तेव्हा अनेक बॅंका उच्च व्याजदर आकारतात.
- जर पैसे वेगवेगळ्या बॅंक खात्यात जमा असतील तर खातेधारकाला जास्त व्याजदर मिळत नाही.
- शुल्क आणि शुल्क आकारणी फी आणि चार्जेस
- बहुतेक बॅंकेत बचत खात्यांसाठी विशिष्ट वार्षिक फी आकारण्यात येते. त्यामधे एटीएम शुल्कासारख्या शुल्कांसह लॉकर शुल्क, देखभाल शुल्कचा समावेश असतो.
- सर्व खात्यांसाठी हे शुल्क विचारात घेतल्यास तुमचा एकूण खरच वाढतो.
- कागद पत्र बाळगण्याचा त्रास
- आर्थिक बाबतीत बेशिस्त लोकांना कागदपत्र सांभाळण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांची एका पेक्षा जास्त खाती असल्यास त्याची कागदपत्रे सांभाळणे अवघड होते.
- पासबुक, धनादेश, युजर आय.डी, पासवर्ड आदी सांभाळणे अवघड होते. आणि त्याचा परिणाम सरासरी मासिक शिल्लक रकमेवर होऊ शकतो.
हेही वाचा – Online Banking : सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी ५ महत्त्वाच्या टिप्स
महत्वाचे –
- एकापेक्षा जास्त खाते असणे हे त्या व्यक्तीच्या व्यवहारांची वारंवारता, पद्धत तसेच जोखीम, गरजांवर अवलंबून असते.
- जर आर्थिक व्यवहार आठवड्यातून एक किंवा दोन पर्यंत मर्यादित असतील तर जास्त खात्यांची गरज नसते. वार्षिक कार्ड शुल्कासारखे खर्च टाळण्यासाठी निष्क्रिय बचत खाती किंवा अधिकची असलेली खाती बंद करणे शहाणपणाचे ठरू शकते आणि सरासरी मासिक रक्कम राखण्यास मदत होईल.
- ज्या बॅंकेत आपल्याला व्याजदर जास्त मिळत असेत व गरज असेल अशावेळी अतिरिक्त बचत खाते नक्कीच उघडले पाहिजे. शेवटी पैसा तुमचा आणि निर्णय देखिल तुमचाच !
Share this article on :