Reading Time: 3 minutes

व्यवसाय सुरु करताना व्यावसायिकाला अनेक गोष्टींची गरज लागते. त्यातही महत्वाचे म्हणजे भांडवल / पैसे. सुरुवातीच्या काळात व्यवसायिकाकडे पत नसते. परिस्थितीत त्याला त्याची आधीच मार्केटमध्ये पत असलेल्या लोकांकडेच भांडवल उभारणीसाठी मदत मागावी लागते व ते संयुक्तिकच आहे. त्यात गैर काही नाही. हीच गोष्ट व्यवसाय सुरु झाल्यावरही उपयोगी पडते. 

फ्रेंचाइजी व्यवसायाबद्दल सर्वकाही – भाग १

सर्व साधारणपणे व्यवहाराचे  ४ भागात विभाजन होते-

१. नैतिक व कायदेशीर

२.अनैतिक व कायदेशीर

३. नैतिक व बेकायदेशीर

४.अनैतिक व बेकायदेशीर

या ४ प्रकारांमध्ये नैतिक व कायदेशीर आणि अनैतिक व बेकायदेशीर या २ प्रकारात अडचणी येतच नाहीत.  फक्त मधल्या २ प्रकारात अडचणी येतात. मैत्रीतील व्यवहार नेमका मधिल २ प्रकारात मोडतो.

  • आपल्या मित्राला चालू व्यवसाय वाढविण्यासाठी, विस्तारण्यासाठी, अन्य ठिकाणी कार्यालय स्थापण्यासाठी भांडवलाची गरज लागते. 
  • त्यावेळी एक मित्र म्हणून त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य असते. पण असे व्यवहार मैत्रीत करताना भावना व कर्तव्य याचा गोंधळ/ घोळ हमखास होतो. 
  • त्यासाठी काही पथ्ये पाळली, तर निष्कारण नंतर होणार मनस्ताप टाळू शकतो. शिवाय मित्राला मदत होऊन त्याचा  व्यवसाय व्हायलाही मदत होईल व आपली मैत्रीही अबाधित राहील. 
  • अर्थात ही भांडवल उभारणीची मदत डोळे झाकून न करता जर डोळस पणे केली, तर सोन्याहून पिवळे नाहीतर पितळ किंवा कथिलाचा वाळा!
  • मित्राला भांडवल उभारणीसाठी कर्जाऊ रक्कम देताना भावनिक होऊ नका. फायनान्शिअल संस्था  किंवा बँका ज्या गोष्टींचा विचार करून कर्ज वितरण करतात, त्या गोष्टींचा विचार आवर्जून करावा. 

फ्रेंचाइजी व्यवसायाबद्दल सर्वकाही – भाग २

भांडवल मदत देताना पाळावयाची काही पथ्ये –

१. व्यवसायाची माहिती– 

  • आपल्या व्यावसायिक मित्राला सदर व्यवसायाची काही माहिती आहे का? त्याने त्यात काम केले आहे का? 
  • त्याला त्यातील खाचा खोचा माहित आहेत का? कामाची त्याला जाण आहे का? अनुभव आहे का ? कौशल्य आहे का ? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत व त्यांचे निरसन करून घेतले पाहिजे.
  • सदर व्यावसायिक मित्राकडे व्यवसायाचा पूर्ण प्लॅन / आराखडा  आहे का? त्याची रूप रेषा मनात व कागदावर तयार आहे का? ती रूप रेषा प्रत्यक्षात कितपत उतरू शकते? याचाही विचार करायला हवा. 

२. व्यवसायातला आपला सहभाग- 

  • पुढील प्रश्न अत्यंत महत्वाचे. 
    • सदर व्यवसायात आपला सहभाग किती असेल? 
    • आपल्याला अधून मधून अथवा मागितल्यावर माहिती मिळेल का? 
    • मी विचारणा करू शकतो का? 
    • मला फक्त पैसेच गुंतवायचे आहेत की माझा वेळ ही अपेक्षित आहे? 
    • गुंतवणुकीचा उपयोग होऊ शकतो का? 
    • माझी जबाबदारी व कर्तव्ये काय असतील? 
    • सध्याची बाजारातील गरज ही पहावयास हवी.  
    • भविष्यकालीन वाढीची शक्यता आहे का?  
  • सगळ्या गोष्टींचे “SWOT analysis” करावे. (Strength- सामर्थ्य, Weakness- कमकुवतपणा, Opportunity- संधी, Threats- जोखीम).

भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १

३. आपल्या अपेक्षा – 

  • आपल्याला गुंतवणुकी तून काय अपेक्षा आहेत? त्या अध्याहृत न ठेवता लिखित करुन स्पष्ट करुन घ्याव्यात.  
  • यासंदर्भात स्पष्टपणे बोलणे केव्हाही उत्तम. 

४. व्यावसायिक अडचणी- 

  • सदर व्यवसायात काही अडचणी आहेत का ? अडचणी नेहमी असतातच.  
  • या जगात अडचणी नसणारे  फक्त दोघेच आहेत, एक म्हणजे संत व दुसरा वेडा.  उरलेले आपण सगळे या दोघांच्या मध्येच असतो. त्या व्यवसायात वाईटात वाईट काय होऊ शकते? तसे दुर्दैवाने झालेच तर् काय करावयाचे ? याबद्दल अभ्यास करणे आवश्यक आहे. 

५. कायदेशीर करार – 

  • भांडवल देताना बँका जसे करार करतात तसे आपणही करणे योग्य. म्हणजे मागाहून काही अडचणी येत नाहीत. 
  • तसेच, सर्व कागदपत्रे आपणाजवळ असणेही महत्वाचे आहे. कारण हा व्यवहार आहे. व्यवहार हा अपेक्षेने, तर मैत्री ही निरपेक्षतेने होते .हा महत्वपूर्ण फरक जाणावा व अमलात आणावा .

भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २

६. गुंतवणुकीची ऐपत 

  • शेवटचे, आपण जेवढे भांडवल देऊ शकतो तेवढेच द्यावे. कारण अनेकानेक अव्यवहारिक तडजोडी मालकाला कराव्या लागतात. 
  • त्याला असंख्य प्रश्नांना एकाच वेळी तोंड द्यावं लागते.कायद्याच्या किचकट जंजाळातून मार्ग काढावा लागतो.  
  • आपले भांडवल कधी परत मिळू शकेल हेस्पष्ट असावे .

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की मित्राकडून भांडवल घेणे हा सर्वसाधारण पणे शेवटचा पर्याय असतो व तिच गोष्ट परत करताना पाळली जाते. शक्यता जरी नगण्य असली तरी विसरून चालणार नाही. कारण हे पैसे आपण कष्टाने मिळवलेले असतात .

हे सर्व सव्य अपसव्य  / खटाटोप का करावा लागतो, तर आपण अनौपचारिक मैत्रीला औपचारिक व्यवहारात बांधून ठेऊ इच्छितो .असे करणे म्हणजे एका कोणत्यातरी गोष्टीचा गळा घोटणे निश्चित आहे

– महेश मुळे

९९२२४००९८०

(लेखक तंत्र , उत्पादन , जाहिरात , विपणन व व्यवस्थापन क्षेत्रात ३४ वर्षांपासून कार्यरत असून व्यवस्थापन कौशल्यामधे निष्णात व निपुण प्रोफेसर आहेत.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…