कोरोना व्हायरस हा जीवघेणा विषाणू चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरला. हवाई मार्गाने येऊन याने भारतातही पाय पसरले. संपूर्ण पृथ्वीवर या रोगाने थैमान मांडले आहे. याला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक त्यांचे प्रयत्न करत आहेतच, पण अद्याप यावर योग्य इलाज मिळाला नाही. कोरोनाचे गंभीर परिणाम पृथ्वीवर प्रत्येक सजीव जातीवर दिसून येत आहे. या महामारीचा पृथ्वीवर व सजीवांवर काय परिणाम होत आहे, ते आपण जाणून घेऊ.
मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट !
कोरोनाचे मानवी आयुष्यावरील परिणाम
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. याचा परिणाम मानवी आयुष्यावर झाला आहे.
- आज बरेच कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक घरी बसूनच काम पहात आहेत, म्हणजे वर्क फ्रॉम होम करत आहेत.
- दुसऱ्या बाजूला अनेक लोक या कोरोना व्हायरसच्या संसर्गात आले आहेत, हजारो लोकांचे बळी गेले. कोरोना या महामारीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- कोरोनामुळे जगभरातील व्यापार, आयात-निर्यात, नवीन उत्पादन सगळंच ठप्प झालं आहे यामुळे अर्थव्यवस्थेत अराजकता पसरली आहे.
कोरोना व्हायरसविषयीचे ८ गैरसमज
कोरोनाचे निसर्ग आणि पृथ्वीवर होणारे परिणाम
- रोजची वाहनांची गर्दी, वर्दळ, वाहनांचे आवाज, कारखान्याचे आवाज प्रदूषण यासारख्या गोष्टी थोड्याशा काळासाठी तरी नाहीशा झाल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच हा शुकशुकाट जाणवत आहे.
- या महामारी विषयीच्या सततच्या बातम्यांमध्ये एक सकारात्मक बातमी म्हणजे आज कित्येक वर्षांनंतर पृथ्वीवरील प्रदूषण कमी झाल्याचे आढळले. हवेत ही स्वच्छता जाणवत आहे.
- ब्रिटिश भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षणानुसार सुद्धा लॉकडाऊन काळातील आवाजाच्या पातळीमध्ये घसरण दिसून आली आहे.तसेच फ्रान्स आणि न्यूझीलंडमधील स्थानकांच्याही हे निदर्शनास आले आहे .
कोरोना आणि कायदा
हालचाली कमी झाल्यामुळे पृथ्वीवरील ध्वनीची पातळी खूप कमी झाली असं आढळून आले. या छायाचित्रात गॅट्विक विमानतळाशेजारील जीएटी-२ हे स्टेशन दिसत आहे. पुढील छायाचित्रात आपण पाहू शकता लॉकडाऊन पूर्वीची म्हणजेच २४ फेब्रुवारीची स्थिती आणि खालच्या छायाचित्रात पाहू शकता, ३० मार्च (सोमवार) पर्यंत काय बदल झाला आहे .
Lots of our seismometers are seeing a drop in noise levels as human activity decreases. The image shows our GAT2 station beside Gatwick airport. Upper image is from Monday 24th February (normal situation), lower image Monday 30th March. pic.twitter.com/p3CiQSv7Hk
— BGSseismology (@BGSseismology) April 1, 2020
जाणून घ्या वैज्ञानिक काय सांगताहेत?
- लॉकडाऊन, पृथ्वीवरील हालचाली आणि भुकंप यांचा परस्परांशी संबंध आहे असं वैज्ञानिकांच्या निरीक्षणातून समोर आले आहे.
- बेल्जियम मधील रॉयल वेधशाळेचे पृथ्वीवरील हालचालींवर लक्ष आहे, येथील संशोधक भूगर्भातील ज्वालामुखीय क्रिया, संभाव्य भूकंपाचे धोके, भौगोलिक बदल याबाबत संशोधन करीत आहेत.
- त्यांच्या मते, पृथ्वीवरील मनुष्यांच्या हालचाली, रहदारीचे आवाज, कारखाने व इतर व्यावसायिक यंत्रणा यांमुळे कित्येकदा पृथ्वीवर होणाऱ्या संभाव्य भूकंपाचे मोजमाप करण्यात अडथळे येतात.
- ज्याप्रमाणे भूकंपासारख्या नैसर्गिक घटनांमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो त्याचप्रमाणे वाहने किंवा औद्योगिक यंत्रणांच्या एकत्रित होणाऱ्या आवाजांमुळे पृथ्वीवर कंपने तयार होतात. त्यामुळे भुकंपशास्त्रज्ञांना समान वारंवारता असणा-या भूकंपाच्या लहरींचा अभ्यास करणे कठीण होते.
लॉकडाऊनचा भूकंपशास्त्रज्ञांना काय फायदा झाला?
- लॉकडाऊन १७ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत पाळण्यात आले त्यामुळे आवाजाची पातळी ३३ टक्क्यांनी कमी झाली .मनुष्याच्या हालचालींमुळे १ ते २० हर्ट्झ वारंवार असणारी कंपने आता बरीच कमी झाली आहेत.
- भुकंपसंशोधन वेधशाळेतील निरीक्षणानुसार भूकंपाची आकडेवारी समोर आली आहे, यानुसार ब्रुसेल्समधील कोव्हिड-१९ च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांमुळे मानव-प्रेरित भूकंपाची संख्या एक तृतीयांशने कमी झाली आहे.
- याचा सकारात्मक परिणाम म्हणजे भुकंप शास्त्रज्ञांना भूकंपविरोधी यंत्रणा तयार करण्यात यश येत आहे. यामुळे संभाव्य भूकंपाचा व ज्वालामुखीय क्रियांचा चांगल्याप्रकारे अंदाज लावता येऊ शकतो.
- इतकंच नाही, तर भुकंपशास्त्रज्ञांना भूकंपाचे संभाव्य धोके असणारी शहरे देखील शोधण्यास मदत होऊ शकते.
- वॉशिंग्टन डी. सी. मधील भुकंपशास्त्रामध्ये संशोधन करणारे भुकंपसंशोधक, अँडी फ्रासेटो यांच्या मते, पृथ्वीवर असणारा मानवनिर्मित गोंगाट संपूर्णपणे थांबला तर याबाबतची माहिती अधिक चांगल्याप्रकारे मिळू शकते.
- पृथ्वीवरील ध्वनीची पातळी अजुनच कमी झाल्यामुळे भुकंपशास्त्रज्ञांना आणखी फायदा होऊ शकतो तो म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी नैसर्गिकरित्या उद्भवणा-या कंपनांचा वापर करू शकतात.
- समुद्राच्या लाटा पृथ्वीच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या किती वेगाने आदळू शकतील, याचा ज्वालामुखीच्या क्रियांवर काय परिणाम होईल या गोष्टींचा अभ्यास करणे आता शक्य आहे. संवेदनशील परिस्थिती किंवा भविष्यात येणारा काही नैसर्गिक आपत्ती याचाही तर्क लावणे शास्त्रज्ञांना शक्य होईल.
“करोना” – यातील काही आपण विसरलोय का?
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले आहे, सक्तीने घरात बसावं लागणार म्हणून कंटाळू नका.वर दिल्याप्रमाणे लॉकडाऊनचे असेही काही सकारात्मक फायदे होऊ शकतात. या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सरकारला पाठिंबा द्यावा व स्वतःची काळजी घ्या.
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/
1 comment
उत्तम