अर्थसाक्षर नेटफ्लिक्स Netflix
https://bit.ly/3iZEHfN
Reading Time: 3 minutes

Netflix -नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्स (Netflix) हे नाव माहित नसणारे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही सापडणार नाहीत. अनेकजण दिवसांतील कितीतरी वेळ नेटफ्लिक्स ॲपवर विविध मालिका, सिनेमे पाहण्यात रममाण असतात. आजपर्यंत आपण नेटफ्लिक्स या फक्त एक मनोरंजनाचे साधन म्हणून पहात आलो, पण आज आपण याचा एक ब्रँड म्हणून विचार करणार आहोत. 

नेटफ्लिक्सने पारंपरिक केबल टीव्ही या संकल्पनेमध्ये आश्चर्यकारक बदल घडवून आणला आणि प्रत्येकासाठी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मनोरंजनाचे अगणित पर्याय केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळा पाहण्यासाठी अगदी वाजवी किमतीत उपलब्ध करून दिले. नित्यनवीन संकल्पना त्यांच्या ग्राहकांसाठी घेऊन येत असतात, म्हणूनच आज वीस वर्षांपासून ते त्यांच्या ग्राहकांच्या मनांवर अधिराज्य करू शकले आहेत.

डिस्ने+ हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ की झी ५? 

ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या व्यवसायात जवळजवळ संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या नेटफ्लिक्स या वीस वर्षांच्या ब्रॅण्डने आपले स्थान राखण्यासाठी कोणते उपाय केले, याविषयी संक्षिप्त माहिती- 

Netflix – नेटफ्लिक्सच्या यशाची ७ रहस्ये:

१. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवी दिशानिर्मिती: 

  • डीव्हीडी भाड्याने देण्याच्या व्यवसायाने सुरुवात केलेल्या नेटफ्लिक्स (Netflix) या कंपनीने त्यानंतर हळू हळू या डीव्हीडीज परत करण्यास उशीर झाला असता लावली जाणारी फी देखील माफ केली.
  • यामुळे ‘ब्लॉकबस्टर’ या त्या काळातील नावाजलेल्या प्रतिस्पर्ध्याला चांगलीच धडक बसली व ‘ब्लॉकबस्टर’ नावाचा ब्रँड नेस्तनाबूत झाला. 
  • इतक्यावर न थांबता काळाची गरज ओळखून अगणित टीव्ही मालिका, सिनेमे उच्च दर्जामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले. 
  • यांनतर नेटफ्लिक्स स्वतः निर्मिती क्षेत्रात उतरले. दर्जेदार कार्यक्रम व  सिनेमे बनवले, ज्यांचे ग्राहकांनी मनापासून स्वागत केले.  
  • नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमांना इतका भरभरून प्रतिसाद दिला की त्या काळात ते कार्यक्रम सर्वात लोकप्रिय म्हणून गणले गेले.

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

२. सवयीनुसार कार्यक्रम पाहण्याची सोय-

  • ही नेटफ्लिक्सची सर्वांत जमेची बाजू आहे. 
  • नेटफ्लिक्स ग्राहकांना कोणताही कार्यक्रम संपूर्णतः त्यांच्या सोयीनुसार पाहण्यासाठी उपलब्ध करून देते. 
  • ग्राहक त्यांच्या आवडीनुसार कोणताही कार्यक्रम कोणत्याही पडद्यावर, कोणत्याही वेळी, कितीही वेळा पाहू शकतात. 
  • इतकेच नाही, तर त्यांच्या आवडीनुसार ते कार्यक्रमांची यादी देखील बनवून ठेवू शकतात.
  • नेटफ्लिक्सने लोकांना वैयक्तिक आवडीचे अगणित पर्याय अगदी सुलभतेने उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ते ही अगदी माफक दरामध्ये. 
  • ग्राहकांच्या सोयीच्या बाबतीत सुरुवातीपासूनच नेटफ्लिक्स अत्यंत जागरूक, सतर्क आणि तत्पर आहे.

३. अगणित पर्यायांची उपलब्धता: 

  • प्रत्येक घरातील सर्व व्यक्तींची आवड एकसारखीच असेल असे फारच क्वचित असते, त्यामुळे आधीच्या काळात कार्यक्रम पाहताना देखील कोणाला ना कोणाला त्यांचं मन मारून समोर टीव्हीवर जे लावले आहे ते पाहावे लागत असे. 
  • नेटफ्लिक्सने ही संज्ञाच बदलली आणि प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार कार्यक्रमांचे अगणित पर्याय उपलब्ध करून दिले. 
  • या करणामुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणि पर्यायाने ग्राहक संख्येत प्रचंड वाढ झाली. 

चिनी ॲप्सवर बंदी: ५ स्वदेशी ॲप्सचा पर्याय 

४. स्वनिर्मित कार्यक्रम/सिनेमे: 

  • नेटफ्लिक्सने त्यांच्या येणाऱ्या कमाईमधील ८५% हिस्सा हा त्यांच्या स्वतःच्या निर्मितीसाठी खर्च केला, जो त्यांच्या इतर सर्व स्पर्धकांच्या तुलनेत खूप जास्त होता 
  • याचाच परिणाम म्हणजे त्यांच्या ग्राहकांचे मन तर त्यांनी जिंकलीच शिवाय नवीन ग्राहक आकर्षित करण्यातही नेटफ्लिक्स पूर्णपणे यशस्वी झाले. 

५. जाहिरातविरहित कार्यक्रमांचा आस्वाद: 

  • जाहिरातदारांकडून पैसे कमावणे हे नेटफ्लिक्सचे उद्दिष्ट कधीही नव्हते आणि त्यामुळे ते जाहिरातदारांवर अजिबात अवलंबून राहिले नाहीत.  
  • याच कारणामुळे ते त्यांच्या ग्राहकांना जाहिराती विना कार्यक्रम पाहून त्याचा पूर्ण आनंद घेण्याचा अनुभव देऊ शकतात. 

६. मोफत सदस्यत्व: 

  • नेटफ्लिक्सने ग्राहकांची आवड समजून घेऊन त्यांना त्यांचे अनुभव छोट्या व्हिडिओ स्वरूपात सांगण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला ज्यामुळे नेटफ्लिक्स त्यांच्या ग्राहकांच्या मनात घर करू शकले. 
  • कार्यक्रम डाउनलोड करून नंतर ऑफलाईन पाहण्याची देखील सुविधा दिली.  
  • याशिवाय ३० दिवसांसाठी नेटफ्लिक्सचे मोफत सदस्यत्व देखील दिले आहे.

आत्मनिर्भर भारत:  शेतीपासून मनोरंजनापर्यंत फक्त स्वदेशी ॲप्स! 

७. वैयक्तिक आवडीनुसार पर्याय सुचवणे: 

  • नेटफ्लिक्सला त्यांच्या प्रत्येक ग्राहकाच्या आवडीबद्द्दल अत्यंत सविस्तर माहिती आहे. त्यांनी कोणकोणते कार्यक्रम पाहिले, किती वाजता पाहिले, किती वेळा पाहिले, किती भाग पाहिले याची नोंद त्यांच्याकडे ठेवली जाते आणि त्यांचा कार्यक्रम सुचवणारा प्रोग्रॅम याच्यानुसारच चालतो.
  • त्यानुसार ग्राहकांना विविध पर्याय नेटफ्लिक्सकडून सुचवले जातात, यामुळे ग्राहकांचा कार्यक्रम शोधण्यासाठीचा कितीतरी वेळ वाचतो.
  • नेटफ्लिक्सच्या यशामध्ये याचादेखील सिंहाचा वाट आहे. 

याच सर्व सोयीसुविधांमुळे आज नेटफ्लिक्स (Netflix) त्यांच्या ग्राहकांची ‘गरज’ बनले आहे. त्यांच्या सततच्या विविध प्रयत्नांमुळेच ग्राहकांचा नेटफ्लिक्सच्या सेवांवर आणि दर्जावर दृढ विश्वास निर्माण झालेला आहे आणि नेटफ्लिक्सही जबाबदारीने तो विश्वास टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आणि तत्पर असते.

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Why Netflix is popular Marathi Mahiti, why Netflix is successful in Marathi, Success Story of Netflix marathi, Netflix marathi mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –