Credit Score: क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर त्याचा खरंच फायदा होतो का?

Reading Time: 2 minutesकर्जदायी संस्था कर्ज देताना एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा खात्री करून घेतात, ती म्हणजे अर्जदाराची आर्थिक विश्वासार्हता. कर्ज मान्य केल्यावर त्याची पूर्ण परतफेड होणार आहे का, आणि ती ठराविक वेळेत होणार आहे का ह्या दोन प्रश्नांची खात्रीशीर सकारात्मक उत्तरं मिळाल्याशिवाय कोणतीही संस्था ग्राहकाला कर्ज मान्य करताना दिसत नाही. आता ही उत्तरं बँकांना किंवा कर्जदायी संस्थांना कशी मिळतात?  अर्थातच सिबिल कडून.

Brand: तुम्ही ब्रँडेड वस्तू खरेदी करता? मग हे नक्की वाचा…

Reading Time: 3 minutesआजकाल ब्रँडचा जमाना आहे. ब्रँडेड कपडे, वस्तू वापरणे म्हणजे स्टेटस झालेले आहे. या वस्तू वापरणारे म्हणजे श्रीमंत, सुखवस्तू घरातले असे समजले जाते. पण आता या वस्तू सर्रास सगळीकडे बरेच जण वापरताना दिसतात.

SIP Investment:“एसआयपी” गुंतवणूक करताना या ४ चुका टाळा

Reading Time: 2 minutesगुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण यामध्ये स्टॉक मार्केटसारखे सतत चढउतार, रिअल इस्टेट सारखी मोठी गुंतवणूक नसते. म्युच्युअल फंडात वार्षिक आणि मासिक पद्धतीने गुतंवणूक करता येते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी (SIP) हा सध्या अनेक गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. मात्र यातून आपली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजे.

जीडीपी (GDP): सकल राष्ट्रीय उत्पन म्हणजे काय?

Reading Time: 3 minutesआपलं रोज सकाळचं वर्तमानपत्र असो नाहीतर संध्याकाळच्या बातम्या; मुख्यत्वे दोनच महत्वाचे मुद्दे असतात, राजकीय पटलावरच्या घडामोडी आणि देशाची “सुधारणारी” नाहीतर “ढासळती” अर्थव्यवस्था. आणि अर्थविषयक बातम्यांमध्ये एक सतत कानावर पडणारा शब्द म्हणजे, जीडीपी! आजच्या लेखात आपण याच ठेवणीतल्या संज्ञेविषयी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन (GDP) बद्दल जाणून घेणार आहोत.    

Hofstadter Law: दैनंदिन जीवनासोबत आर्थिक नियोजन करतानाही हॉफ्सटॅडर सिद्धांताचा विचार करा

Reading Time: 3 minutesमर्फीच्या सिद्धांताप्रमाणे, जर एखादी गोष्ट चुकीची घडणार असेल, तर ती घडतेच. थोडक्यात परिस्थितीच तशी होते. पण हॉफ्सटॅडरच्या म्हणण्यानुसार, “आपण योग्य नियोजन केलं, तर आपण निश्चितच योग्य वेळेत आपले ध्येय गाठून यशाचा  आनंद घेऊ शकतो. “

Concept of Share Market: शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? मग हे नक्की वाचा

Reading Time: 3 minutesकोरोना काळात शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये (Share Market Investment) प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पण अजूनही शेअर बाजार म्हणजे नक्की काय, त्याचं काम कसं चालतं, आयपीओ, शेअर्स खरेदी-विक्रीचे नियम, याबद्दल अनेक लोक अनभिज्ञ आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक तर करायची आहे, पण बाजाराबद्दल काहीच माहिती नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. आजच्या लेखात आपण याच विषयाबद्दल मूलभूत माहिती घेऊया. 

Credit Card vs Debit Card: क्रेडिट कार्ड वि. डेबिट कार्ड, कोणत्या कार्डचा उपयोग कधी कराल?

Reading Time: 4 minutesडिजिटल पेमेंट व ऑनलाइन खरेदीच्या आजच्या काळात, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. कार्डने पैसे देण्याच्या या काळात आज प्रत्येकाच्या खिश्यामध्ये कार्ड असते. परंतू तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डमधील फरक माहितीये का ? अनेक वेळा आपण या दोन्ही कार्डांना एकसारखे समजण्याची चूक करत असतो. मात्र या दोन्ही कार्डांमध्ये खूप फरक आहे.  चला तर मग समजून घेऊया की, या दोन्ही कार्डांमध्ये काय फरक आहे

Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी हे नक्की वाचा

Reading Time: 3 minutesआपल्याला गाडी चालवता येत असते, गाडीत पुरेसे इंधनही असते, गाडी उत्तम स्थितीतही असते आणि भरधाव गाडी चालविण्याची इच्छाही असते, पण परिसर नवा असतो…रस्ते, वळणे, खाणा खुणा  सगळेच नवे आणि अनोळखी असते. अशावेळेला आपण नेव्हिगेशनची मदत घेतो किंवा कुणा माहितगाराला विचारतो….याच माहितगार किंवा नेव्हिगेशनचे काम आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात म्युच्यअल फंड्स करतात.  

Health Insurance: कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची ६ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutesकोरोनाने दिलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आरोग्य विमा (Health Insurance). पण कोरोना व्यतिरिक्त आरोग्य विमा खरेदी करण्याची अजूनही काही महत्वाची कारणे आहेत. ती कोणती याबद्दल आजच्या लेखात माहिती घेऊया. कोरोनाच्या औषध उपचारांचा खर्च आज लाखोंच्या घरात गेला आहे. केवळ कोरोनाच नाही तर, इतर आजारांच्या उपचारांचा खर्चही लाखाच्या घरात असतो. यामुळे या अचानक उद्भवणाऱ्या आणि टाळता न येणाऱ्या खर्चाला सामोरे जाताना आपल्या बरोबर ‘आरोग्य विमा’ नावाची ढाल असणे अत्यंत आवश्यक आहे.

Gautam Adani: शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानी यांच्या यशाचा प्रवास

Reading Time: 4 minutesआज गौतम अदानी (Gautam Adani) हे नाव केवळ भारतीय उद्योगजगतात नाही तर जागतिक उद्योगजगतातही मानाने घेतलं जाते. अनेकांना असं वाटतं की केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि अदानी यांचे खूपच निकटचे संबंध आहेत. अर्थात याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या राजकीय संबंधांबद्दल नाही, तर गौतम अदानी यांच्या यशाच्या प्रवासाची रंजक माहिती घेणार आहोत.