पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध, तुम्ही काय कराल?

Reading Time: 2 minutes आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी बातमी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर आजपासून म्हणजेच २३ सप्टेंबर २०१९ पासून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घातले आहेत. आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९ कलम ३५/ए (१) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सदर निर्बंध घातले आहेत. 

तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा

Reading Time: 3 minutes कामाचा व्याप वाढल्याने कधीतरी चुकून वेळ पाळली जात नाही, पण हे सतत होत असेल तर मात्र याच्यावर विचार करायला हवा. आणि व्यवस्थित नियोजन करून आपल्यामध्ये वक्तशीरपणा कसा बाणवता येतील हे बघावे लागेल. आपल्या कामाची डेडलाईन पाळून तुमच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांचा म्हणजे तुमचे शिक्षक, बॉस, उच्च अधिकारी, ग्राहक, घरातील लोक यांचा विश्वास जिंका.

अर्थमंत्र्यांचा निर्णय: शेअर बाजाराने गाठला उच्चांक, सर्वसामान्यांचाही फायदा

Reading Time: 2 minutes नेहमीच बेधडक, धक्कादायक पण सकारात्मक निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारने कॉर्पोरेट क्षेत्रात धमाका करणारा निर्णय घेतला आहे. गोव्यामध्ये जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सीतारमन यांनी, देशांतर्गत कंपन्या आणि नव्या देशांतर्गत उत्पादन कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा अध्यादेश मंजूर झाल्याचं सांगितलं आहे. या निर्णयामुळे केवळ कॉर्पोरेट क्षेत्रच नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. 

To do list: कशी तयार कराल प्राधान्य यादी?

Reading Time: 3 minutes शाळा, महाविद्यालय, नोकरी, निवृत्ती अगदी घरात असणाऱ्या व्यक्तींनीही स्वतःच्या कामाची आखणी करायला हवी. आतापर्यंत सवय लागली नाही, काही हरकत नाही. आता तुम्ही हे करूच शकता. तुम्हाला करायचं एकच आहे, आपल्या कामाची यादी बनवायची आहे. कोणत्या कामाला किती वेळ लागू शकतो? किती वेळेच्या आत हे काम व्हायला हवं? कोणते काम अधिक महत्वाचे आहे?अशा प्रश्नाची उत्तरे शोधून आपल्या कामांचा अग्रक्रम ठरवा. आपली प्राधान्य यादी डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास तुमच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. 

इन्कम टॅक्स रिफंड कधी आणि कसा मिळवाल?

Reading Time: 5 minutes आयकर परतावा भरून झाल्यावर आत अनेकजण रिफंडची रक्कम कधी जमा होणार, या विचारात असतील. अनेकदा कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे किंवा घाईगडबडीत जास्तीचा ॲडव्हान्स टॅक्स भरला गेल्यास अथवा जादा टीडीएस कपात झाली असल्यास, आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करून ही जास्तीची रक्कम आयकर विभागाकडून करदात्याला परत मिळते. 

आयफोन ११ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes स्मार्टफोनने आयुष्यात अनेक बदल घडवले. आजपर्यंत अनेक कंपन्या ‘मोस्ट सेलिंग स्मार्टफोन’च्या स्पर्धेत आल्या आणि गेल्या. पण या साऱ्या गदारोळात एक कंपनी आपले अव्वल स्थान टिकवून आहे. ती कुठली हे तुम्ही ओळखलंच असेल. बरोबर! ती कंपनी आहे “ॲपल आयफोन(Apple iPhone )”! भारतीय शेअर बाजारात नोंदल्या गेलेल्या सर्व कंपन्यांचे मिळून जे काही “मार्केट कॅपिटल” असेल त्याच्या जवळपास निम्मं व्हॅल्यूएशन म्हणजे तब्बल ७२ लाख कोटी रुपये म्हणजे १ ट्रिलीयन डॉलर्स इतके एकट्या ॲपलचे आहे. सध्या चर्चा आहे ती ॲपल कंपनीने नव्याने लॉंच केलेल्या आयफोन ११ सीरिजची.

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

Reading Time: 2 minutes विना भांडवल व्यवसायाचे असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. परंतु अनेक वेळा हे काय करायचं? असं म्हणून या छोट्या पण चांगला नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांकडे दुर्लक्ष करतो. मॅक्डोनल्ड, पिझ्झा हट, डॉमिनोज यासारख्या फूड चेन किंवा मॉन्जिनीजसारख्या केक शॉपनी आज भारतातल्या छोट्या शहरातही आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. फिटनेस, न्यूट्रिशन या क्षेत्रांतील व्यक्तींना मोठमोठे सेलिब्रिटी विशेष मान देतात. ऋजुता दिवेकर यांनी याच क्षेत्रात काम करून स्वतःचं करिअर घडवलं आहे. “कुठलंही काम सोपं नसतं आणि कमीपणाचंही नसतं.” जेव्हा ही गोष्ट तुम्हाला पटेल तेव्हा तुमच्या व्यावसायिक होण्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु होईल. 

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutes अगदी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांपासून ते निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना छोटासा का होईना पण व्यवसाय करायची इच्छा असते. तसंच, काहींना पर्यायी उत्पन्न म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असं वाटत असतं. पण करायचं काय? त्यासाठी  लागणारं भांडवल कुठून आणायचं? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. म्हणूनच या लेखात आपण वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेणार आहोत ज्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज लागणार नाही व तुम्ही तुमची नोकरी सांभाळूनही  हे व्यवसाय करू शकता व त्यात यश मिळाल्यानंतर ते वाढवून यशस्वी व्यावसायिकही बनू शकाल. 

आधार क्रमांकाच्या सहाय्याने आता मिळवा पॅनकार्ड !

Reading Time: 2 minutes जुलै २०१९ ला जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन नियम प्रस्तावित करण्यात आले होते. करवसुली,  करबुडाव्यांना चाप, पारदर्शी व्यवहार ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून नियमांची आखणी करण्यात आली होती. आयकर विवरण पत्र म्हणजे आयटीआर (ITR) संदर्भात अनेक नवीन नियमांची भर पडली आहे. तसेच, पॅन आधार जोडणीही बंधनकारक करण्यात आली आहे.नवीन नियमांमुळे नागरिकांनी गोंधळून जायचे काहीच कारण नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे. 

१ सप्टेंबरपासून बदललेले आयकराचे ८ महत्वपूर्ण नियम तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes बँक नियमांपाठोपाठ आता करासंबंधित नवीन नियमांची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. जुलै २०१९ च्या अर्थसंकल्पात करासंदर्भात काही नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. हे नियम संसदेत प्रस्तावितही करण्यात आले होते. परंतु आता हे बदल याच म्हणजेच सप्टेंबर २०१९  पासून लागू करण्यात आले आहेत.