श्रीमंतीच्या मार्गातील ‘अडथळे’

Reading Time: 3 minutes आर्थिक निर्णय म्हणजे फक्त गुंतवणूक हा समज सर्वात अगोदर दूर करा. खर्च करणे हा सुद्धा आर्थिक निर्णय प्रक्रियेतील एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची जोखीम घेण्याची क्षमता माहित असलीच पाहिजे. ते न बघता जाहिरातींच्या प्रभावामुळे सामान्य माणसाचं चित्त विचलीत होते आणि गरज नसलेले आर्थिक निर्णय घेतले जातात. 

गुंतवणूक – कला का शास्त्र?

Reading Time: 3 minutes खरंतर गेल्या १५ वर्षात आपल्याला माहितीचा प्रचंड स्त्रोत गवसला आहे. अगणित संकेतस्थळे, मोबाईल ॲप्स, कॅल्क्युलेटर्स, व्हिडीओज, दृक-श्राव्य जाहिराती, उरलेसुरले वर्तमानपत्रात येणारे लेख आणि या सगळ्यांमुळे आपल्या आजूबाजूस तयार झालेले मुक्त मोफत अर्थतज्ञ असा एवढा लवाजमा असतांना देखील समभाग निगडीत योजनांमधे गुंतवणूकदारांची संख्या वाढत नाहीये.

श्रीमंतीची ‘वही’वाट

Reading Time: 3 minutes आता मुलांच्या शाळा सुरु होणार म्हणजे खर्चांना सुरुवात होणार. खरतर शिक्षणासाठी केलेला खर्च म्हणजे गुंतवणूक असली पाहिजे. परंतु सध्याच्या शैक्षणिक बाजारात ही गुंतवणूक कायम आर्थिक ताळेबंदाच्या तुटीकडे जात असल्यामुळे सगळेच पालक चिंतीत आहेत. आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करू.बचतीच्या सवयी ढोबळपणे ४ प्रकारे नोंदविल्या जाऊ शकतात.

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना

Reading Time: 4 minutes वित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्यानेच झाली पाहिजे. कमवित्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे शुद्ध विमा खरेदी करणे.शुद्ध विम्याच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाइतकी (Sum Insured) रक्कम विमा पॉलीसीत नामनिर्देशन असलेल्या वारसास (Nominee) देय असते. विमा पॉलीसीची मुदत संपल्यानंतर विमा धारक हयात राहिल्यास विमा कवच बंद होते. परिणामी कुठलीही रक्कम देय राहत नाही. शुद्ध विमा ही गुंतवणूक नसून एक खर्च आहे. विमा पॉलीसीची मुदत संपल्यावर कुठलाही दावा करता येत नाही, या कारणामुळे विमा खरेदी इच्छुक या प्रकारचा विमा खरेदी करण्यास उत्सुक नसतात.

आर्थिक सल्ला न लगे मजला…

Reading Time: 4 minutes बचत अथवा गुंतवणूकीचे पर्याय निवडतांना आपण कुठले निकष लावत असतो? त्यापूर्वी आपली अर्थ-मानसिकता काय आहे, याची पुरेशी कल्पना आपल्याला असते का? गुंतवणूकीचा हवाला कुणावर असतो? स्वतःवर, नशिबावर, देवावर कि सल्लागारावर? गुंतवणूकीतून नेमकं मला काय हवंय? हे ठरवणारे कोण असतं? अशा प्रश्नांची भली मोठी यादी तयार होईल.

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

Reading Time: 3 minutes सर्व अर्थसाक्षर वाचकांना आता थोडं का असेना हायसं वाटत असेल. कारण कर वाचवा, कर वाचवा असे सारखे येणारे मेसेजेस आणि फोन कॉल्स आता बंद झाले असतील. आर्थिक स्वयंशिस्त असणारे किंबहुना त्याहूनही नसणारे सल्लागार समाज माध्यमातून किती तरी मोठया प्रमाणात ह.भ.प. असल्यासारखे प्रबोधन करत असतात. या समाज माध्यमी मंडळीच बर असतं पहिली पोस्ट राजकीय विषयावर, दुसरी दुष्काळावर, तिसरी प्रेरणादायक चित्रफितीची आणि मग एखादी आर्थिक गुंतवणुकीची… जनजागृती केल्याचं तेवढंच समाधान मिळतं एवढीच यांची शुद्ध भावना.

सुख के सब साथी, दुख में न कोई…..

Reading Time: 3 minutes ५ दिवसांच्या दीपावलीच्या सणाला धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत असतो. आज धन्वंतरीचे पूजन केले जाते. धन्वंतरीला आयुर्वेदाची देवता म्हणजेच आरोग्याची देवता मानले जाते. तिच्या पूजनापाठीमागचा शुद्ध हेतू हा असतो की, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी प्रत्येकास सद्बुद्धी व सर्व सुखांचा उपभोग घेण्यासाठी निरामय आरोग्य मिळू दे. तेव्हा या ५ दिवसांत पुढील ५ संकल्प करू या.