गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’ कॅल्क्युलेटर

Reading Time: 3 minutes एसआयपी’चा मागील इतिहास पहिला तर इक्विटी म्युच्युअल फंडांनी ‘एसआयपी’ मधून खूप चांगला म्हणजे अगदी १५ ते १८ % किंवा कधी त्याहून जास्त परतावा दिला आहे. आपले करोडपती होण्याचे स्वप्न म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’मधून कसे साकारत येईल ते आपण पाहू. यासाठी आपण म्युच्युअल फंडाचा कंजर्वेटिव्ह १२% परतावा गृहीत धरू. बरेच आर्थिक सल्लागार आपल्या संकेत स्थळावर आपली गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता ‘एसआयपी’चे कॅल्क्युलेटर उपलब्ध करतात ज्यातून आपण आपल्या गुंतवणुकीतील पुढील काळातील वाढीचा अंदाज बांधू शकतो.

कर्जरोखे (Debt Fund) योजनांचे कामकाज कसे चालते?

Reading Time: 5 minutes म्युच्युअल फंडाच्या डेट फंड किंवा कर्जरोखे संबंधित योजनांची सोप्या शब्दात व्याख्या करायची झाल्यास आपण म्हणू की व्याजाने पैसे देणे. यात म्युच्युअल फंड, कर्जदाराकडून मिळालेले व्याज किंवा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना भांडवलवृद्धीच्या स्वरूपात देतात. म्युच्युअल फंडात १२ प्रकारच्या डेट फंड किंवा कर्जरोखे प्रकारच्या योजना असतात. या सर्व १२ प्रकारची वर्गवारी त्या योजनेमध्ये असलेल्या निरनिराळ्या कर्जरोख्यांच्या एकत्रित मुदतपूर्ती कालावधीवर अवलंबून असते.

बँक एफडी वि. म्युच्युअल फंड

Reading Time: 4 minutes आपण सर्व जण बँकेच्या एफडीमध्ये नियमित गुंतवणूक करत असतो. बँकेच्या एफडीमधून मिळणारा निश्चित कालावधीसाठी निश्चित परतावा आपल्याला आश्वस्त करतो आणि त्यामुळे आपली ओढ बँकेच्या एफडी कडे अधिक असते.  बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करीत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Investment FAQ : गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न व त्याची उत्तरे

Reading Time: 5 minutes विमा पॉलिसी, गृहकर्ज, म्युच्युअल फंड, एसआयपी, एसडब्ल्यूपी, इत्यादी गुंतवणुकीसंदर्भात पडणारे काही प्रश्न (FAQ) व त्यांची गुंतवणूक सल्लागारांमार्फत दिलेली उत्तरे या लेखात दिलेली आहेत.

म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

Reading Time: 2 minutes आपण अजूनही ठराविक व्याज देणाऱ्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करता का?  मग थांबा हे वाचा, जरा विचार करा आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार हे चुकीचे आहे. म्युच्युअल फंड मध्ये तब्बल ३६ प्रकारच्या योजना असतात. त्यातील १६ योजना शेयर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड योजना निवडा.आपली संपत्ती पुढील ३० वर्षात ३० पट बनवण्यासाठी आपली गुंतवणूक फक्त १२% चक्रवाढ व्याजाने वाढीची आवश्यकता आहे. हे शक्य होऊ शकते म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून.

जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

Reading Time: 3 minutes आताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पाडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुण वयापासून एसआयपी किंवा स्टॉक मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केलेली जी पिढी आहे त्यांचे वयोमान साधारणतः ५४ तो ६६ दरम्यान आहे. त्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल? याचा आढावा घेऊ.

चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन

Reading Time: 2 minutes तरुणांनो यशस्वी नियोजन करून ४० व्या वर्षी निवृत्त व्हा. चाळीशी ओलांडलेल्यांनी पन्नाशीत निवृत्ती घेऊन ती आनंददायी कशी करता येईल? हा विचार करा. या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. चाळीशीतील गुंतवणूकदारांनी जर त्यांच्या करिअरच्या सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल तर निश्चित त्यांना ५०-५५ वर्षी निवृत्ती घेता येईल. मात्र बऱ्याच जणांच्या बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूक न होता, आपली नजीकच्या काळातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची बचत झाली.

डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना

Reading Time: 3 minutes म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय दिवसेंदिवस जास्त पसंतीचा होऊ लागल्यानंतर, SEBI ही वारंवार त्यात नवनवीन नियमावली आणून गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत बदल करत असते. १ जानेवारी २०१३ पासून असाच एक बदल लागू झाला, तो म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी दोन पर्याय उपलब्ध झाले. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार दोन पद्धतींनी गुंतवणूक करू शकतात – एक म्हणजे डायरेक्ट प्लॅन आणि दुसरे म्हणजे रेग्युलर प्लॅन.

Retirement Planning : तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

Reading Time: 4 minutes आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे. आजच्या तरुण पिढीने जास्त पगाराच्या नोकऱ्या बदलत असताना त्याच्या जोडीला व्यवस्थित आर्थिक नियोजन केले तर नक्कीच ते पन्नाशीला वेळेच्या अगोदर निवृत्ती स्वीकारून आपल्या आयुष्याचा जास्त आनंद घेऊ शकतात.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

Reading Time: 3 minutes म्युच्युअल फंड आपल्याला तब्बल ३६ प्रकारच्या योजना देतात, ज्यांचे योग्य संयोजन केल्याने कॅपिटल मार्केटच्या चढ उतारावर मात करता येते. मात्र बरेचसे लोक काय करतात तर म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेले मागील रिटर्न्स पाहून गुंतवणूक करतात, त्यात काही विमा सल्लागार हे बाजाराचा अभ्यास न करता गुंतवणूकदारांना चुकीच्या योजना देतात.