Economy: अर्थव्यवस्था – रोखीची की डिजिटल?

Reading Time: 4 minutesअर्थक्रांती मांडण्यासाठी कोणत्याही व्यासपीठावर गेले की अर्थव्यवस्था (Economy) आणि नोटबंदीविषयीचे प्रश्न अजूनही हमखास येतात. अधिक मूल्यांच्या नोटांनी भारतात जो गोंधळ घातला होता, तो आपल्या देशाच्या हिताचा नव्हता, हे बहुतेक नागरिकांना समजले आहे. मात्र हा बदल एवढा मोठा आहे की देश त्यात गेले तीन वर्षे ढवळून निघाला आहे.

आजपासून NEFT चोवीस तास उपलब्ध!

Reading Time: < 1 minuteसध्या ऑनलाईन बँकिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. बँकेकडूनही ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. आता यामध्ये भर पडली आहे एका नवीन नियमाची! नवीन नियमाप्रमाणे आता एनईएफटी (NEFT) सुविधा आता २४× ७ तास वापरता येणार आहे. यामुळे दिवसभरात केव्हाही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. 

प्रॉव्हिडन्ट फंडचे ५ महत्वाचे फायदे

Reading Time: 2 minutesकर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) देशातल्या पगारदारांसाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. ईपीएफचा लाभ २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या सर्व कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मिळतो. दुर्दैवाने, मागील काही वर्षे व्याजदरात सातत्याने घट होत होती. परंतु,सध्या व्याजदर वाढून ८.६५% झाला आहे. पगारामधून ईपीएफ कपात केली जात असल्यामुळे, या लोकप्रिय गुंतवणूक योजनेचा अवलंब करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नाही. तसेच इथे कर्मचारी व नियोक्ता (Employer) दोघांचेही ५०-५०% योगदान असल्यामुळे, एकूण गुंतवणुकीच्या निम्मी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते व निम्मी रक्कम नियोक्ता भरत असतो.  

काय आहे कार्ड सुरक्षा योजना?

Reading Time: 3 minutesकार्ड सुरक्षा योजना हा एक सर्वसाधारण विम्याचा करार असून त्यामुळे आपले क्रेडिट /डेबिट कार्ड, योजना सदस्यत्वाचे कार्ड चोरीस जाणे, हरवणे, गैरव्यवहार होणे यापासून संरक्षण मिळते. यासाठी फी म्हणून दरवर्षी निश्चित रक्कम भरावी लागते. यामुळे ही योजना घेणाऱ्यास कार्ड व्यवहारापासून संरक्षण आणि तातडीची आर्थिक मदत असा दुहेरी फायदा होतो. आपल्या गरजेनुसार अशा अनेक प्रकारच्या योजना सध्या उपलब्ध आहेत.

बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutesडिजिटलायझेशनच्या जमान्यात ऑनलाईन बँकिंग वाढत चालले आहे. पेटीएम, गुगल पे, फोन पे आणि एकूणच नेट बँकिंगचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. पण सायबर क्राईम, फेक कॉल्स यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. याशिवाय बँकेसंदर्भात ततक्रारींचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे बँक व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

बजाज फायनान्स- मंदीमधली संधी

Reading Time: 3 minutesभारतीयांची क्रयशक्ती कमी आहे, पण लोकसंख्येचा बोनस घेतला तर त्यात प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता ओळखणारे मंदीच्या वातावरणात चांगला व्यवसाय करत आहेत. सर्वसामान्यांना सोबत घेतल्यास आजच्या आर्थिक वातावरणात मोठा बदल होऊ शकतो. ती क्षमता आपण एक समाज म्हणून कधी ओळखणार आहोत? 

‘फास्टॅग’विषयी सारे काही…

Reading Time: 2 minutesटोलनाक्यावरची ट्रॅफिकची भलीमोठी लाईन हा अनेकांचा नित्य अनुभव असेल. अनेकदा सुट्टे पैसे आणि सुट्ट्या पैशांच्या ऐवजी दिली जाणारी चॉकलेट्स हा वादाचा आणि विनोदाचाही मुद्दा झाला होता. पण या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना करण्यात आली आहे. ती म्हणजे फास्टॅग! काय आहे फास्टॅग, त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याचे फायदे काय, या साऱ्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊ. 

बँक व्यवहार आणि तक्रार निवारण

Reading Time: 3 minutesबँकिंग व्यवसाय कसा चालतो, ते आपल्याला माहीत आहेच. जनतेकडून व्याजाने ठेवी स्वीकारून भांडवलाची जरुरी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना अधिक व्याजाने देणे, हा कोणत्याही व्यापारी बँकेचा मुख्य व्यवसाय. या बँका सहकारी, सरकारी व खाजगी स्वरूपाच्या आहेत. तसेच, नव्याने अस्तित्वात आलेल्या पेमेंट बँक याही बँकांच असून रिझर्व बँकेचे त्यांच्यावर नियंत्रण आहे. मुख्य व्यवसायाशिवाय ग्राहकांना लॉकर पुरवणे, पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देणे, क्रेडिट कार्ड देणे, गुंतवणूक विमा यासंबंधी सेवा पुरवणे यासारखी अनेक कामे बँका करतात यातील काही सेवा विनामूल्य तर काही सेवा मूल्य आकारून देण्यात येतात. 

बँका आणि मुदत ठेवींची सुरक्षितता

Reading Time: 3 minutes‘सुरक्षित’ समजल्या गेलेल्या मुदतठेवीमधे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेवर अचानक रिझर्व बँकेने निर्बंध घालून त्यांच्या कर्जवितरणातील घोटाळा उघड केला. त्याचपाठोपाठ शेअर बाजारात सुचीकृत असलेल्या लक्ष्मीविलास बँकेवर देखील निर्बंध लागू झाले. या लागोपाठच्या घटनांनी सामान्य गुंतवणूकदार पुरता भांबावून गेला. 

आर्थिक साक्षरता शिबिर: जन निवेश अभियान

Reading Time: 3 minutesआर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी, सीएफए सोसायटी इंडियातर्फे १५ ते  २९ नोव्हेंबर या कालावधीत जन-निवेश अभियान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी एकूण १४ दिवसांचा “सायकल” प्रवास  दौरा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५००० स्वयंसेवकांनी भाग घेतला असून, या दौऱ्याची सुरुवात  १५ नोव्हेंबर रोजी एकत्रितपणे गुडगाव व मुंबई पासून करण्यात आली आहे. यानंतर  दोन्ही भागातील स्वयंसेवक अहमदाबाद येथे भेटतील व इंदोरला या दौऱ्याची आणि अभियानाचीही सांगता करण्यात येईल.