आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस

Reading Time: 3 minutes या व्यवसायात झालेल्या मूल्यवृद्धीचा फायदा घेण्यासाठी आणि भांडवल उभे करण्यासाठी एस.बी.आय. कार्ड्स आपला आय.पी.ओ. शेअर बाजारात घेऊन येत आहे. सेबीला दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार ९६०० कोटी रुपये गोळा केले जाणार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न तयार असेल की या पैशाचे कंपनी काय करणार आहे ? यासाठी आपण  एस.बी. आय. कार्ड्सचा इतिहास बघूया. 

गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला?

Reading Time: 4 minutes बऱ्याच लोकांना ‘गुंतवणूक सल्लागार’ म्हणजे नक्की काय या विषयी मोठे गैरसमज असतात. त्यांना वाटतं की हे लोक फक्त पैशांची गुंतवणूक करून देतात किंवा फक्त श्रीमंत लोकांनाच त्यांची गरज असते. प्रत्यक्षात एक गुंतवणूक सल्लागार त्याच्या क्लाएन्टना अनेक प्रकारे मदत करत असतो आणि श्रीमंत लोकांपेक्षा त्यांची जास्त गरज मध्यमवर्गीयांना असते. कारण जेवढी आपली संसाधनं मर्यादित तेवढे त्यांचे नियोजन जास्त महत्त्वाचे.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १२

Reading Time: 2 minutes जेव्हा आपल्याला एकगठ्ठा रक्कम इक्विटी फंडामध्ये गुंतवायची असते तेव्हा शेअर मार्केटमधल्या शॉर्ट टर्म अस्थिरतेचा प्रभाव आपल्या एकगठ्ठा इक्विटी गुंतवणुकीवर होऊ नये, त्यासाठी वितरक आपल्याला ती रक्कम एकगठ्ठा कर्जरोखे निगडित ‘डेट फंडा’मध्ये गुंतवून ठराविक मुदतीने इक्विटी फंडामध्ये थोडे थोडे ट्रान्सफर करण्याचा सल्ला देतात. त्यालाच “सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन” म्हणतात. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११

Reading Time: 2 minutes एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). नियमित कालावधीनंतर (साधारण दर महिन्याला) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे ‘एसआयपी’ आपल्या गुंतवणुकीला शिस्त लावण्यासाठी आणि शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडांनी उपलब्ध केलेली सुविधा आहे. 

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? भाग २

Reading Time: 3 minutes आपल्या रिअल इस्टेट मधे गुंतवणूक करण्याच्या भावनिक निर्णयापोटी अधिक परतावा देऊ शकणाऱ्या इक्विटी या पर्यायाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष होते आहे. एक गुंतवणूकदार म्हणून आपण रिअल इस्टेट मधे अनेक वर्षं वाट बघायला तयार असतो, तसाच संयम आपण शेअर मार्केट मधील किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत दाखवायला हवा

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक? – भाग १

Reading Time: 3 minutes आपण घर जर स्वतः राहण्यासाठी घेत असलो तर त्यातून भविष्यात परतावा काय मिळेल वगैरे गोष्टींचा विचार करायची विशेष गरज नाही. पण जर तुम्ही ‘रिअल इस्टेट नेहेमीच चांगला परतावा मिळवून देते’ अशा विश्वासापोटी केवळ गुंतवणूक म्हणून घर घेत असाल तर दीर्घकाळात सर्व खर्च आणि कर वजा जाता महागाईदरापेक्षा जास्त परतावा त्यातून खरंच मिळू शकेल काय या विषयी विचार केलेला हवा.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९

Reading Time: 2 minutes म्युच्युअल फंडाच्या योजनेचे दोन प्रकार असतात खुली योजना /ओपन एंडेड आणि बंद योजना / क्लोज्ड एंडेड. ओपन एंडेड योजनेमध्ये कधीही गुंतवणूक करता येते. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो त्या दिवसाच्या एनएव्ही (NAV) प्रमाणे आपल्याला युनिट्स मिळतात. 

सार्वभौम सुवर्ण बाँड १७ जानेवारीपर्यंत विक्रीस उपलब्ध

Reading Time: 3 minutes सार्वभौम सोन्याचे रोखेची (२०१९ -२०२० मालिका आठ) विक्री सध्या सुरु आहे. ही विक्री १७ जानेवारी रोजी बंद होईल. सरकार सोन्याला  प्रति ग्रॅम, रु. ४,०१६/- वर सोन्याचे बंधपत्र जारी करीत आहे. ऑनलाइन अर्ज करणारे आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम रु ५०/- ची सूट मिळते. तर अशा गुंतवणूकदारांना सोन्याच्या बाँडची किंमत  रु. ३,९६६/- प्रति ग्रॅम असेल. कराच्या बाबतीत, परिपक्वतावर भांडवली नफा करमुक्त असतो. सोन्याच्या बाँडवर हा एक विशेष फायदा आहे.

घर: विकत घ्यावे की भाड्याने राहावे?

Reading Time: 3 minutes कुठल्याही मोठ्या निर्णयाबाबत होते तसे घर विकत घेणे किंवा भाड्याने घेणे या दोन्ही पर्यायांच्या बाजूने आणि विरुद्ध अनेक मुद्दे आहेत (त्यामुळेच तर सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो). ‘आपले स्वतःचे घर’ ही कल्पनाच सुखद असते, स्वतःच्या घरामुळे कुटुंबाला स्थैर्य मिळते, त्याचबरोबर गृहकर्ज काढून घर विकत घेतल्यास कर वजावट मिळते, भविष्यात घराच्या किमती वाढतात त्यांचा फायदा होतो वगैरे मुद्दे घर विकत घेण्याच्या बाजूने आहेत.