Success Story Of Titan – टायटन कंपनीची यशोगाथा

Reading Time: 4 minutes तुम्ही जर  नोव्हेंबर २००९ मध्ये रु. १ लाख टायटनच्या  शेअर्स मध्ये गुंतवले असते, तर आज त्यांचे एकूण बाजारमूल्य जवळपास रु. २१ लाख असते. याव्यतिरिक्त  कंपनीने वेळोवेळी दिलेले डिव्हिडंड तर बाजारमूल्यात आपण मोजलेले नाही. १ नोव्हेंबर २००१ रोजी रु.६२ मध्ये मिळणारा टायटनचा शेअर या १ नोव्हेंबर २०१९ ला तब्बल रु. १३०१ पर्यंत वाढलेला होता. टायटनने गेल्या १० वर्षांत जवळपास २०००% परतावा दिला आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की टाटा समूहाचा एक भाग असलेली  ‘टायटन कंपनी’ केवळ घड्याळेच बनवत नाही तर ज्वेलरी, अक्ससेसरीज, साड्या या इतर विविध ग्राहक उपयोगी वस्तू विकते. संपूर्ण जगात टायटन पाचवी सर्वात मोठी घड्याळ उत्पादक कंपनी आहे. 

सोन्याच्या साठाविषयक माफी योजना का आली पाहिजे?

Reading Time: 3 minutes देशातील निम्म्या संपत्तीची नोंदच नसेल तर देशाचे आर्थिक व्यवस्थापन कसे होईल? आपल्या देशातील प्रचंड सोन्याच्या साठ्याचे तसेच झाले आहे. हा साठा अधिकृत संपत्तीचा भाग व्हावा आणि त्याचा न्याय्य कर सरकारला मिळावा, यासाठी सोन्याच्या रूपातील संपत्ती जाहीर करण्याची माफी योजना लवकरच येणार, याचा सरकारने इन्कार केला असला तरी ती नजीकच्या भविष्यात का आली पाहिजे आणि नागरिकांनी तिचे स्वागत का केले पाहिजे, हे समजून घेतले पाहिजे. 

म्युच्युअल फंड क्या है? – भाग ६

Reading Time: 3 minutes म्युच्युअल फंडांची निर्मिती मोठया समूहाच्या विखुरलेल्या छोटया-छोटया रकमेची गुंतवणूक करण्यासठी झाली. काळानुसार त्यात पारदर्शकता आणण्यासाठी बदल होत गेले, होत आहेत आणि होत राहतील. तरीदेखील दोन प्रकारची जोखीम ही कायम असणार आहेच. पहिली अर्थचक्राची आणि दुसरी कंपनीच्या दोषात्मक व्यवस्थापनाची. कारण या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या बचतीवर परिणाम करू शकतात. हे टाळण्यासाठी तुमची जोखीम क्षमता माहिती असायलाच हवी. 

चिट फंड म्हणजे नक्की काय?

Reading Time: 3 minutes चिट म्हणजे वचनचिठ्ठी! असंघटित क्षेत्रातील लोक, ज्यांचा बँकिंग व्यवहाराशी अत्यंत कमी संबंध येतो, अशा समान उत्पन्न असलेल्या गरजू लोकांना आपल्या आर्थिक गरजा ताबडतोब भागवण्यासाठी या फंडाचा उपयोग होतो. भिशीच्या जवळपास जाणारा हा बचतीचा प्रकार असून, त्यास अनेक वर्षांची परंपरा आहे. काही चिट फंड कंपन्या १०० वर्षाहून जुन्या असून अजून व्यवस्थित चालू आहेत. 

बँक एफडीच्या जोडीला म्युच्युअल फंडचा “बँकिंग अँड पीएसयू डेट फंड” 

Reading Time: 3 minutes सेबीच्या कडक नियंत्रणाखाली असलेल्या म्युच्युअल फंडाची एक कॅटेगरी आहे जी शेअर बाजाराशी अजिबात संबंधित नाही आणि आपली गुंतवणूक ही फक्त चांगल्या बॅंका आणि सरकारी कंपन्यांच्या व्यवसायात कर्जरोखे स्वरूपात गुंतवून आपल्याला त्यातून मिळणारा परतावा देतात.  त्या कॅटेगरीचे नाव आहे ” बँकिंग अँड पीएसयू डेट फंड ” (PSU म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा सरकारी कंपन्या). गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे हे फक्त नामांकित बँका तसेच, फक्त सरकारी कंपन्या यांच्या कर्जरोखे या मध्ये गुंतविल्यामुळे जोखीम नगण्य होऊन जाते. 

थेट इक्विटी की म्युच्युअल फंड?

Reading Time: 3 minutes आम्हाला अनेक लोक विचारत असतात शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, कुठले शेअर्स घेऊ? अनेकदा कोणाच्या तरी सल्ल्याने सुरुवात केलेली असते. बाजारात तेजी असते, सगळेच शेअर्स वर जात असतात तेव्हा हे लोक खुश असतात. पण आपल्याला झालेल्या फायद्यात स्वतःच्या कौशल्याचा भाग किती आणि निव्वळ नशिबाचा भाग किती याचा बहुतेकांनी विचार केलेला नसतो.

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

Reading Time: 4 minutes सरकारी उद्योग, व्यवस्था कार्यक्षम नाहीत, हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्या विश्वासार्ह आहेत. आणि खासगी कंपन्या जेवढ्या कार्यक्षम आहेत, तेवढ्या त्या विश्वासार्ह नाहीत! खासगीकरणाचे लोण जगभर आणि भारतात वेगाने पसरत असताना हे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. खासगीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला असताना त्याच्या अपरिहार्य रेट्यात भारत यापुढे कोणता मार्ग निवडतो, हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.  

फिटे अंधाराचे जाळे….गुंतवणूक विशेष

Reading Time: 3 minutes LPG म्हणजेच Liberalization, Privatization आणि Globalization. दुर्दैवाने या स्थित्यांतराकडे बघण्याचा दृष्टीकोन सामान्य बचतकर्त्याकडे नसतो. त्याचे कारण वर नमूद केले आहेच. परंतु त्याला छोटीशी का होईना गुंतवणूक सुरु करायची असते. ही सुरुवात मात्र इच्छा, आस की ध्येय हे ठरवता येत नाही. मग पदरी अंधारच पडतो. 

बँकेतील ठेवींना सुरक्षित पर्याय 

Reading Time: 4 minutes पीएमसी बँकेसारख्या मोठया सहकारी बँकेवर भारतीय रिजर्व बँकेने अचानकपणे निर्बंध आणल्याने आणि त्यानंतर उडालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे, त्याचप्रमाणे यासंबंधी नियामकांनी महिनाभरात घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाने देशातील सर्वच बँक ठेवीदार आज संभ्रमात आहेत. यातच देशातील मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना ‘डीआयजिसी’च्या नियमानुसार आपल्या बँकेतील ठेवी १ लाख रुपयांपर्यंत सुरक्षित असल्याचा शिक्का बचत खात्याच्या पासबुकावर मारून दिल्याचे चित्र समाज माध्यमात सर्वत्र प्रसारित झाल्याने, विविध बँकेत आपल्या ठेवी ठेवलेले ग्राहक, आता नक्की काय करावे? ज्यामुळे आपण निश्चित राहू शकू याचा शोध घेत आहेत. तेव्हा उपलब्ध पर्यायांचा शोध आणि बोध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

हीच ती वेळ, म्युच्युअल फंड गुंतवणुकीची

Reading Time: 2 minutes सर्व सामान्य मराठी गुंतवणूकदार नेहमीच अतिशय कमी जोखीम घेणारे असतात. पारंपरिक बँकेचे एफडी, पोस्टाच्या योजना किंवा सोने यामध्येच गुंतवणूक करतात. हे पर्याय जरी खूप आश्वस्त वाटत असले तरी या पर्यायातून मिळणार परतावा हा महागाई वर मात करत नाही आणि त्यामुळे दीर्घावधी मध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा होत नाही. त्याचबरोबर येणाऱ्या ७-८ वर्षात आपला भारत देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होईल. पुढील काही वर्षात व्याज दर हे आणखी खाली खाली जातील.