डिस्ने+ हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ की झी ५ : तुम्ही काय निवडाल?

Reading Time: 3 minutes कोविड-१९ मुळे झालेल्या लोकडाऊनमुळे आजपर्यंत कधीही पाहिले गेले नव्हते इतके ऑनलाईन शोज पाहिले जात आहेत आणि त्यासाठी नानाविध पर्याय उपलब्ध आहेत. यामधून योग्य पर्याय निवडण्यासाठी २ प्राधान्यक्रमांचा विचार करावा लागेल, एक म्हणजे सबस्क्रिप्शन प्लॅन्स आणि तुम्हाला कशा प्रकारचे कंटेन्ट पाहण्यामध्ये जास्त रस आहे. 

जर्मन भाषा – का, कशी आणि कुठे?

Reading Time: 3 minutes जूनचा साधारण पहिला आठवडा म्हणजेच दहावी बारावीचा निकाल लागण्याची वेळ आणि असे प्रश्न घेऊन आम्हा परकीय भाषेच्या शिक्षकांना फोन यायची वेळ ही एकच असते. एखादी परकीय भाषा का शिकावी? या प्रश्नाला  बरीच उत्तरं आहेत. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी तर जर्मनपासून अगदी मँडरीन भाषेपर्यंत सर्व भाषा शिकता येतात. मी या लेखात प्रामुख्याने जर्मन भाषा – का? कशी? कुठे?  या तीन मुद्द्यांवर विस्तृत लिहिणार आहे म्हणजे वरील प्रश्नांची उत्तरं शोधायला सोपं जाईल.

लॉकडाऊनमध्ये जपा मानसिक आरोग्य

Reading Time: 3 minutes कोव्हिड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारला लॉकडाऊन सारखं कठोर पाऊल उचलणे भाग पडले. अशा परिस्थितीत, आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे कदाचित मानसिक तणावही वाढू शकतो.  आजच्या लेखात आपण वाढलेलं लॉकडाऊन आणि त्याचे मानसिक आरोग्यावर होत असणाऱ्या परिणामांची आणि  मानसिक आरोग्य  उत्तम राखण्यासाठी काय करावे, याबद्दल माहिती घेऊ. 

Financial crisis – आर्थिक संकटांचा पुनर्विचार

Reading Time: 3 minutes संभाव्य आर्थिक संकटे या विषयावरील मागील एका लेखात नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना येऊ शकतील अशा संभाव्य आर्थिक संकटावर थोडक्यात विचार करून काही उपाययोजना सुचवल्या होत्या. संकटे इतकी अचानक येतात की त्यावर काही विचार करण्यासही पुरेसा वेळ मिळत नाही. कोविड १९ हे एक महाभयंकर संकट असून त्याची थोडीशी जाणीव आपल्याला होयला १५ मार्च उजाडायला लागली. त्यापूर्वी दोन महिने आधी कोणी याबाबत सांगितले असते तर सर्वांनी त्याला मूर्खांत काढले असते.

लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला शांत व आनंदी कसे ठेवाल?

Reading Time: 2 minutes कोरोना या संसर्गजन्य रोगाने सगळीकडे निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. मानवी आयुष्यात अनिश्चितता आली आहे. जगभरातील सर्व देश या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढत आहेत.सतत त्याच त्याच गोष्टी ऐकून मनाचा गोंधळ होऊ शकतो. आयुष्यात १००℅ सुखी झालात तर मग ते आयुष्य कसलं, नाही का? पण या भयावह परिस्थितीत आपण शांत व आनंदी राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या. 

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutes कोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची? झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया –

गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?

Reading Time: 3 minutes “दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…” आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही आपण मात करण्यात आपल्याला यश मिळेल.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. 

“वर्क फ्रॉम होम”साठी काही महत्वाच्या टीप्स

Reading Time: 3 minutes कोव्हिड-१९ या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत संपर्काने होते. याचे तीव्र व भयानक परिणाम जगातील सर्वच देश भोगत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी अनेक कंपन्यानी त्यांच्या कर्मचा-यांनी घरी बसून म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सांगितले आहे. घरी बसूनही तुमचं काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी खालील काही टिप्स लक्षात ठेवा. 

Valentine’s day: असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण व्हॅलेंटाईन डे

Reading Time: 3 minutes प्रेमाचा गुलाबी रंग ओसरल्यावर वास्तवाचा पांढरा शुभ्र कोरा कॅनव्हास समोर दिसू लागतो. या शुभ्र कॅनव्हासवर रेखाटण्यासाठी तुमच्या नात्याचं सुंदर चित्र तयार असू द्या. तुमच्या नात्याला सुंदर बनविण्यासाठी यावर्षी एक वेगळा विचार करा. तो म्हणजे “इकॉनॉमी व्हॅलेंटाईन डे”!

तुम्हाला कामात दिरंगाई करायची सवय आहे? मग हे वाचा

Reading Time: 3 minutes टीव्ही, मोबाईल याचा बरोबरीने २१ व्या शतकात लागणाऱ्या वाईट सवयींमध्ये अजून एक महत्वाची सवय म्हणजे- ‘चालढकल करणे’. आश्चर्य वाटेल पण ही मोठी समस्या आहे. “कल करे सो आज, आज करे सो अब” हा सुविचार म्हणून बरा वाटतो, पण वास्तवात मात्र आपण “आज करे सो कल करे, कल करे सो परसो” अशीच परिस्थिती आपल्या पैकी काही लोकांची असेल, त्यांना सांगणं गरजेचं आहे की ही एक धोक्याची घंटा आहे. तुमची दिरंगाई करण्याची सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा! तुम्हाला जाणून घ्यायचंय की दिरंगाई करणे का संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे तर हे नक्की वाचा-