RBI – आरबीआयचा कर्जदारांना आणखी ३ महिने दिलासा

Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतल्या महत्वाच्या घोषणा : रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात. बँकेचा रेपो दर आता ४.४% वरून ४% झाला आहे. परिणामी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.  ६ जून रोजी आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे पण त्याआधीच व्याजदर कपात करून सामान्य कर्जदारांना दिलासा दिला गेला आहे.

कर्जमाफी आणि कर्ज निर्लेखन म्हणजे काय?

Reading Time: 4 minutesसन २०१४ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत सरकारने  ६.६६ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यातील ६८६०७ कोटी रुपयांची कर्जे विजय मल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी या सारख्या ५० प्रमुख थकाबाकीदारांची आहेत, अशा आशयाच्या बातम्या समाज माध्यमातून प्रसारित होत असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया वाचायला मिळतात. याबाबत वस्तुस्थिती काय ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. 

कर्जाच्या हप्त्याला स्थगिती दयावी का?

Reading Time: 3 minutesकोरोनाने महामंदी सोबतच महामारीचा यक्ष प्रश्न उभा केला. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक हातात हात घालून काम करण्यास सज्ज झाले आहेत. लोकांच्या हाती अडचणीच्या काळात खर्च करण्यासाठी पैसे राहावेत म्हणून ३ महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या मुदतीच्या कर्जांचे हप्ते स्थगित करण्याचा पर्याय कर्जदारांना उपलब्ध करून देण्याची मुभा बँकांना देण्यात आली. आर्थिक भाषेत मॉरेटोरीअम म्हणजे कर्जाची परतफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार. परंतु त्यावरून सामान्य कर्जदारांचे बरेच गैरसमज झाले आहेत. आपण हा मुद्दा उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करू.

कर्ज परतफेड -कर्जमाफी नाही, तर सवलत !

Reading Time: 2 minutesरिझर्व बँकेचे अलीकडील ‘अर्थव्यवस्थेस गती देणारे निर्णय व त्याचे परिणाम’ यातील कर्ज परतफेड निर्णयाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून याबाबत पत्रकात असलेली असंधिग्ध वाक्यरचना, त्याचे वेगवेगळ्या लोकांनी काढलेले अर्थ आणि समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या उलटसुलट बातम्या यामुळे यातील घोळ अजून वाढत असल्याने यासंबंधी योग्य ती माहिती नक्की काय आहे व त्याचा नेमका काय परिमाण होतो ते पाहुयात.

रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutesरिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे.  कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ? यासाठीचा कालावधी कोणता आहे ? कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

कमी क्रेडिट स्कोअर असताना वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल?

Reading Time: 3 minutesक्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे, जो कर्ज मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ही तीन अंकी संख्या ३०० ते ९०० दरम्यान असते. सामान्यपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर तो चांगला मानला जातो, अथवा पेक्षा कमी असणारा अंकाला खराब क्रेडिट स्कोअर असं म्हटलं जातं.  क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्ज मंजूर होण्यात अडथळे येतात किंवा मंजूर होत नाही. 

रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes ‘गृहकर्ज’ म्हणजे काय? हे सर्वांना माहिती आहेच. गृहकर्ज घेताना पैसे ‘कर्ज’ म्हणून घेऊन त्यातून घर घेतले जाते, तर रिव्हर्स मोर्गेजमध्ये स्वतःच्या मालकीचे राहते घर, बँकेकडे ‘तारण’ म्हणून ठेऊन कर्ज घेतले जाते. हे कर्ज आपल्या जरुरीप्रमाणे एकरकमी / मासिक, त्रैमासिक, वार्षिक  हप्त्याने किंवा दोन्ही प्रकारे मिळू शकते. 

तणावमुक्त गृह कर्जाने बनवा आपल्या मालकी हक्काचे घर

Reading Time: 3 minutesआपण नोकरीला लागलो की आपलं पहिलं स्वप्न असतं , ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, प्रत्येकालाच  गृह कर्ज घेण्याची  गरज भासतेच. काही जण गृहकर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण घर कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण ८.१५ ते ८.४० % इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०-२५ वर्षे मुदतीचे गृह कर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते. २०-२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो. 

कर्ज घेतलंय? व्याजदर तपासा!

Reading Time: 3 minutesगृहकर्ज घेऊन वर्षानुवर्षे ईएमआय (EMI) भरत असणाऱ्या अनेक ग्राहकांना आपण किती दराने व्याज भरतोय याचाच विसर पडतो. बाजारात किती दर चालु आहे किंवा आपले क्रेडिट रेटिंग अथवा सिबिल (CIBIL) काय आणि त्यानुसार आपल्याला किती कमी दर मिळू शकतो, किंबहुना अशा कमी दरामुळे दीर्घकाळात केवढा फायदा पदरात पडतो, याची माहिती शोधण्याची तसदी फार कमी लोक घेतात.

क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

Reading Time: 3 minutesनवीन वर्षांचे स्वागत, विविध सणवार, स्वातंत्र्य दिन, व्हॅलेन्टाईन डे, या वर्षातील मेगा ऑफर, सुपर बंपर ऑफर अशी विविध कारणे देऊन  क्रेडिट कार्ड देत असलेली कंपनी (बँक/ वित्तीय संस्था) आपल्या ग्राहकांना कॅशबॅकची ऑफर देत असतात. ही रक्कम आपल्या खरेदीच्या बिलातून थेट कमी होते अथवा पूर्ण बिल केल्यानंतर खात्यात वेगळी परत येते. बोनस पॉईंट व्यतिरिक्त अशी संधी मिळत असल्याने, अशा आशयाची सूचना आली की ग्राहक मनातून सुखावतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊयात असा संकल्प सोडतो. कोणतीही गोष्ट मोफत मिळते आहे, याचे सर्वाना आकर्षण असल्याने त्याला आनंद होतो. लोकांच्या याच मनोवृत्तीचा लाभ उठवण्यात येतो. वास्तविक कोणतीही गोष्ट आपल्याला कधीच फुकट मिळत नसते.