‘मायक्रो एटीएम’ नावाची डिजिटल क्रांती! 

Reading Time: 4 minutesआर्थिक समावेशकता वाढण्यासाठी बँकिंगची अपरिहार्यता कोणीही अमान्य करू शकत नाही. ते बँकिंग वाढविण्याचे काम ग्रामीण भागात मायक्रो एटीएम करत असून त्यांचा वापर वेगाने वाढला आहे. नोटबंदीनंतर भारतीय नागरिकांच्या सवयींमध्ये झालेला सकारात्मक बदल त्यातून दिसतो आहे. 

कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

Reading Time: 4 minutesकौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. १) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च ३) दैनंदिन खर्चांसाठी बचत ४) दीर्घकालीन स्वप्नांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे समजायचे. 

गोष्ट दोन गुंतवणूकदारांची…

Reading Time: 4 minutesबहुसंख्य लोकांचा असा समज असतो की ‘गुंतवणूक करणं’ आणि ‘यशस्वी गुंतवणूकदार बनणं’ या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत. प्रत्यक्षात या विभिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा अनेकदा परस्परसंबंध नसतो. म्हणजेच ‘गुंतवणूक कशी करावी’ हे माहिती झाले म्हणजे आपण आपोआप एक यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो असे अजिबात नाही. सिंहगडाचा ट्रेक करणे आणि एव्हरेस्टचा ट्रेक करणे यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक त्या दोन्हीत आहे. हा फरक अत्यंत सोप्या पद्धतीने विषद करणारा एक लेख मध्यंतरी वाचनात आला, तो ‘अर्थसाक्षर’च्या वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.

श्रीमंतीच्या मार्गातील ‘अडथळे’

Reading Time: 3 minutesआर्थिक निर्णय म्हणजे फक्त गुंतवणूक हा समज सर्वात अगोदर दूर करा. खर्च करणे हा सुद्धा आर्थिक निर्णय प्रक्रियेतील एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची जोखीम घेण्याची क्षमता माहित असलीच पाहिजे. ते न बघता जाहिरातींच्या प्रभावामुळे सामान्य माणसाचं चित्त विचलीत होते आणि गरज नसलेले आर्थिक निर्णय घेतले जातात. 

आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

Reading Time: 3 minutesतुमच्या स्वतःचा पगार आणि इतर उत्पन्नाचे आर्थिक नियोजन तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. गरज वाटल्यास त्याचा एक लिखित आराखडा तुमच्या जवळ असेल तर उत्तमच. पण निदान तुम्ही कुठे खर्च करू इच्छिता? येत्या काळात कोणते संभाव्य खर्च आहेत? कोणती संभाव्य आवक आहे? अडचणीच्या काळी कुठून खर्च करणार? कर्ज घेणार का? किती घेणार? निवृत्तीनंतर काय? अशा प्रश्नाची उत्तरे खूप सुरवातीपासून तपासत राहावी म्हणजे आपल्याबरोबरच आपल्या परिवाराच्या आनंदाची हमी आपण देऊ शकतो.

तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?

Reading Time: 3 minutesप्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असत. कुटुंबातील सदस्यांना आरामदायक आयुष्य मिळावं किंवा त्यांना कुठल्याही आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू नये याचा प्रयत्न कुटुंबातील प्रमुख किवा प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. घरातील प्रत्येकाच्या आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण करणे इतकंच त्यात समाविष्ट नाही. त्याशिवायही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा देतील.

शेअर बाजाराची संथ वाटचाल…

Reading Time: 2 minutesबाजार हा ठराविक टप्पे पार करतच पुढे-मागे होत असतो. या शास्त्राचा शोध साधारण ११९ वर्षापुर्वी म्हणजे १९०० साली लागला. अमेरिकेतील चार्ल्स डॉव यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल. आज ११९ वर्षानंतर सुद्धा त्यांनी सांगून ठेवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बाजाराचे विश्लेषण करावे लागते. तसे केल्यास बऱ्यापैकी अचूक पद्धतीने बाजाराची किंवा शेअरची पुढील दिशा ठरविणे शक्य होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज काल गोष्टी खूपच सोप्या झाल आहेत. पूर्वी तांत्रिक विश्लेषणासाठी लागणारे आलेख (charts) हाताने काढावे लागत होते.

एटीएम मधून पैसे आलेच नाहीत, पण डेबिट झाल्याचा मेसेज आला तर काय कराल?

Reading Time: 2 minutes‘एटीएम’मध्ये पैसे आहेत. परंतू आपण काढू शकलो नाही असा अनुभव आपल्याला कधी आलाय का? एटीएम मधून काढू या हेतूने आपण बँकेच्या एटीएम केंद्रात गेलो. पैसे काढण्याची सूचना दिली त्यावर प्रक्रिया होऊन पैसे वजा (debit) झाल्याचा संदेश आपल्याला आला, परंतू मशिनमधून पैसेच आले नाहीत.

राष्ट्रीय शेअरबाजार: को लोकेशन घोटाळा

Reading Time: 4 minutesमोठा भ्रष्टाचार हा प्रामुख्याने वरिष्ठ पातळीवरून सुरू होतो आणि तळागाळात झिरपत जातो. या घोटाळ्यात राष्ट्रीय शेअरबाजारातील वरिष्ठ लोक, भांडवल बाजार नियंत्रण सेबीने आधी केलेले दुर्लक्ष, त्यामुळे चौकशीस झालेला उशीर, नंतर उचललेली पाऊले, त्यातही कदाचित दुर्लक्ष केलेल्या गोष्टी ज्यामुळे संबंधितांना सिक्युरिटी अपिलेट ट्रिब्युनलकडून लगेचच मिळणारा दिलासा, यामुळेच हा घोटाळा जितका दिसतोय त्यापेक्षा बराच मोठा असण्याची शक्यता जास्त आहे.

कार खरेदीचा निर्णय? थांबा …. आधी हे वाचा – भाग २

Reading Time: 3 minutesभारतातील रस्ते हे योग्य प्रतीचे नाहीत. वाहतूक ही कधीही विस्कळित होत असते. अशावेळी पाऊस, पूर आला असता गाड्या पाण्यातून जात नाहीत. मग कित्येकदा आपली गाडी पाण्यात, रस्त्यात ठेऊन पायी जावं लागतं. मग गाडीची काळजी मनाला लागते. शेवटी ज्यांच्याकडे गाडी नाही तो रस्त्यावरून पायी चालत जातो आणि ज्याच्याकडे स्वतःची गाडी आहे तो ही रस्त्यावरून पायी चालत जातो.