आयपीएल आणि गुंतवणूक

Reading Time: 3 minutesक्रिकेटच्या तरुण चाहत्यांसाठी गुंतवणुकीच्या काही खास टिप्स. वर्षातून एकदा येणारी आयपीएल मॅच सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जाते. एवढंच काय तर मॅच आपल्याला गुंतवणुकीचे तत्वज्ञान  शिकवून जाते. कशी? अगदी सोपं आहे! आता आयपीएल मॅच दरम्यान तुम्ही खेळाडू ज्या ज्या गोष्टी करतात त्या लक्ष देऊन बघा आणि त्यांना तुमच्या आयुष्यातील आर्थिक घटनांशी जोडून बघा. तुमच्या लक्षात येईल की मॅच मध्ये लागणारी खिलाडूवृत्ती, चिकाटी, आणि  गुंतावूणुकीच्या नियमांमध्ये बरंच साम्य आहे आणि क्रिकेटचा जाणकार एक चांगला नियोजक किंवा गुंतवणूकदार होऊ शकतो.

‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesएक नवीन उत्साहपूर्ण आर्थिक वर्ष सुरु झालंय आणि या वर्षाच्या सुरवातीलाच दोन अत्यंत महत्वाचे उत्सव देशात सुरु आहेत. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरं आयपीएल मॅचेस! खरंतर यातील एक घटना राजकीय आणि दुसरी संपूर्णपणे क्रीडा किंवा मनोरंजन विश्वातली आहे. मग याचा संबंध नवीन आर्थिक वर्षाशी कसा काय? जरा विचार करा, तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही घटनांमागे ही काही आर्थिक धागे आहेत. या घटना आपल्या आणि पर्यायाने देशाच्या नवीन आर्थिक वर्षाला एक दिशा देऊ शकतात. कसं? हे जरूर वाचा.

संकल्प जुनेच आर्थिक वर्ष नवे

Reading Time: 3 minutes१ एप्रिल २०१९ ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पानी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.

डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

Reading Time: 3 minutesमी जितका खोल व्यक्तिगत आर्थिक कुवतीचा विचार करते, तितकं मला जाणवतं की पश्चिमात्याचा दृष्टीकोन हा खूपच उपयुक्त आहे. यूएस मध्ये डेटींगचा एक प्रमुख निर्धारक म्हणजे व्यक्तीचा ‘क्रेडीट स्कोअर’! ज्याप्रमाणे एखादी बँक कर्ज देताना, “व्यक्ती परत फेड करण्या इतकी जबाबदार आहे का?” हे क्रेडीट स्कोअरने तपासते. त्याप्रमाणे, अमेरिकेमध्ये डेट करण्यापूर्वी आपल्या साथीदाराचा क्रेडीटस्कोर तपासतात.

भारतीय बनावटीचे रूपे कार्ड

Reading Time: 3 minutesव्हिझा/मास्टरकार्ड ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये एक पाऊल उचलले. भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळ (NPCI National Payment Corporation of India ) च्या माध्यमातून एक स्वदेशी कार्ड बाजारात आणायचे ठरवले. त्यानुसार मार्च २०१२ मध्ये अधिकृतरित्या रूपे कार्ड देशभरात बाजारात आणले गेले.Rupee आणि Payment या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून ‘RuPay’ हा शब्द तयार केला गेला. भारतीय बाजारात व्यवहार ग्राहकांना व बँकांना सोयीचे व्हावे म्हणून हे रूपे कार्ड सामान्य (domestic) बाजारात आणले गेले.

जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

Reading Time: 3 minutesआताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पाडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुण वयापासून एसआयपी किंवा स्टॉक मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केलेली जी पिढी आहे त्यांचे वयोमान साधारणतः ५४ तो ६६ दरम्यान आहे. त्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल? याचा आढावा घेऊ.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड – बहुउद्देशीय प्रवासी कार्ड

Reading Time: 2 minutes‘एक देश एक कार्ड’ या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचा भाग म्हणून बरेच वर्ष संकल्पित असलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)  हे बहुउद्देशीय प्रवासी कार्ड ४ मार्च २०१९ पासून अस्तित्वात आले आहे. सध्या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करताना त्याचा मोबदला सामान्यतः रोख रकमेने करण्यात येतो. याचे व्यवस्थापन करणे त्रासदायक व खर्चिक आहे. रोकडविराहित व्यवहार आपणास वेगवेगळ्या कार्डसच्या माध्यमातून करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने स्वतःची वेगळी कार्ड पेमेंट व्यवस्था चालू केली.

बँक मनी, जनधन योजना आणि भारतीय अर्थव्यवस्था

Reading Time: 4 minutesकोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पतपुरवठ्याच्या विस्ताराला अतिशय महत्व आहे. भारतात त्याला अनेक कारणांनी मर्यादा होत्या, पण गेल्या काही दिवसांत बँक मनी सातत्याने वाढत असल्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचा तो अडथळा दूर होतो आहे. पुढील वर्षभरात बँकांची स्थिती सुधारणार, ही बातमी त्यामुळेच अर्थव्यवस्थेला गती देणारी ठरणार आहे.

विक्रीकर विभागातर्फे सेटलमेंटची संधी

Reading Time: 3 minutesकेंद्र शासनाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात जुने वाद, विवाद मिटविण्यासाठी आयकर व सेवाकरात योजना आणली आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने ७ एप्रिल २०१६ रोजी विक्रीकर विभागात येणारे सर्व कर कायदे व त्याच्याशी निगडीत विषयांवरील जुने वाद, विवाद व तंटे मिटविण्यासाठी स्वतंत्र बिल आणले आहे. या कायद्याचे नाव राज्य शासनाने ‘महाराष्ट्र सेटलमेंट ऑफ अरिअर्स इन डिस्प्युट अ‍ॅक्ट २०१६’ असे ठेवले आहे. याचा अर्थ शासन सर्व जुन्या थकीत लवादांना निकाली लावण्याच्या व पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे वर्षानुवर्षे चालणारे वाद व विवाद कमी होतील व शासनाला महसूलही मिळेल व लवादांचा वरील होणारा शासनाचा खर्चही कमी होईल. परंतु करदाते या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना किती प्रतिसाद देतील हे पाहू या!

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

Reading Time: 3 minutesभारतात सर्व मिळून असे २१ शेअरबाजार असले तरी या दोन बाजारातच सर्वाधिक सौदे होतात. या दोन्ही बाजारांना कमोडिटी व्यवहार करण्याची परवानगी मिळाली असून पूर्ण भारतभर त्यांचे दलाल, उपदलाल यांचे जाळे पसरलेले असून तेथून रोखीचे, वायद्यांचे आणि भविष्यातील व्यवहार कोणीही कोठूनही करू शकतो.