Money Transfer alert: चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाल्यास करा हे उपाय

Reading Time: 2 minutes ऑनलाईन व्यवहार करताना चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होऊ शकतात. चुकीचा क्रमांक टाईप केला जाऊ शकतो. यामुळे बँकेचे व्यवहार, मनी ट्रान्सजॅक्शन  घाईत करू नयेत.  परंतु चुकून चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले असल्यास पाठवणाऱ्या व्यक्तीला प्रचंड ताण येतो. त्याच्यासाठी ते संकटापेक्षा कमी नसतं. व्यक्तीला वाटतं की आपले  पैसे कायमस्वरूपी गेले. तीच व्यक्ती कोणत्या कंपनीत किंवा कार्यालयात नोकरी करत असेल आणि त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीचे, त्याच्या कार्यालयाचे किंवा कंपनीचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले असतील तर त्याच्यासाठी ते मोठं संकट असू शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण यावर उपाय आहेत. रिझर्व्ह बँकेने याबद्दल काही तरतुदी केल्या आहेत.

श्रीकृष्ण जयंती विशेष: कृष्णाकडून शिका व्यवस्थापन कौशल्याच्या या ५ गोष्टी

Reading Time: 3 minutes कृष्ण कोण होता? कृष्ण गोकुळातला ‘माखनचोर’ होता. कृष्ण राधेचा प्रियकर होता. तो द्वारकाधीश होता आणि अर्जुनाचा सारथीही होता. असुरांचा नाश करणारा नरहरी होता तर गोवर्धनाचे छत्र बोटावर पेलणारा उत्तम बासरीवादकही होता. कृष्ण त्याची प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडत होता. आपण काही कृष्ण नाही. पण आपल्याला जर  आयुष्यातल्या प्रत्येक भूमिकेत यशस्वी व्हायचं असेल तर कृष्णाने शिकवलेला मार्ग आचरणात आणावा लागेल. कृष्ण एक चांगला व्यवस्थापक होता त्याने सांगितलेली व्यवस्थापन कौशल्य आचरणात आणल्यास तुम्हीही उत्तम व्यवस्थापक बानू शकाल. 

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

Intestate: मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप

Reading Time: 3 minutes मृत्यू अटळ असतो, बहुतांश वेळा अनपेक्षितही असतो. मृत्यूपत्र हा कायद्याने दिलेला असा मार्ग आहे ज्यामार्गे आपण आपल्या संपत्तीची मृत्यूपश्चात विभागणी करु शकतो. पण काही कारणांमुळे मृत्यूपत्र करायच्या आधीच जर एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला तर त्याच्या मालमत्तेचं काय होत असेल? त्याची विभागणी कशा प्रकारे होत असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कायद्यानुसार ज्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलेलं नाही, त्या व्यक्तीला ‘इनटेस्टेट’ (Intestate) असं म्हणतात. अशावेळी संबंधित देशाच्या कायद्यानुसार त्या व्यक्तीच्या मालमत्तेची विभागणी करण्यात येते. यामध्ये इनटेस्टेट व्यक्तीचे बॅंक खाते, सिक्युरिटीज, स्थावर मालमत्ता व इतर मालमत्ता इत्यादी मालमत्तांचा सामावेश होतो.

आरोग्य सेतू आणि तुमच्या माहितीची गोपनीयता

Reading Time: 2 minutes “आरोग्य सेतू” या ॲप्लिकेशनचे जसे अनेक फायदे आहेत तसे काही तोटेही समोर येत आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिकल अँड इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी MeiTY) या ॲप्लिकेशनद्वारे मिळालेल्या माहितीचा वापर करण्याविषयीचे काही शिष्टाचाराचे नियम घालून दिले आहेत. याआधी यासंदर्भातील या ॲप्लिकेशनची ‘गोपनीयता’ (Privacy Policy) हा एकच मार्ग या माहितीच्या सुरक्षेबाबतीत होता. 

काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?

Reading Time: 3 minutes काही महत्त्वाचा, अचानक आलेला खर्च करण्यासाठी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक च नसते. कारण महिना संपता संपता अनेक जणांचा पगार सुद्धा अस्सा संपलेला असतो की लक्षातच येत नाही. महिन्याची १ तारीख आणि शेवटची तारीख हसत हसत आनंदाने भेटल्या, असे फार कमी जणांचे होते. मग काही इमर्जन्सी खर्च उद्भवला तर इतरांकडे हात पसरायची वेळ येते. अशी वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर त्यासाठी काही ठोस पावले ही उचलायलाच लागतात.

आरोग्य सेतू ॲप: फायदे व वापराची पद्धत

Reading Time: 3 minutes कोरोना या महामारीने आज संपूर्ण जग अक्षरशः थांबवलं आहे. असे असताना याबद्दल जनसामान्यांत भीती, शंका, तणाव निर्माण होणं अगदी साहजिक आहे. याच समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सर्व भारतीयांसाठी ‘आरोग्य सेतू’ नावाचे मोबाईल ॲप आणले आहे. 

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था (Partnership Firm)

Reading Time: 3 minutes स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर, व्यवसायाचे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. प्रत्येक प्रकारचे स्वतःचे असं वेगळं वैशिष्ट्य व फायदे तोटे आहेत. आजच्या लेखात आपण भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती घेऊया.

Health Insurance Renewal: आरोग्य विमा नूतनीकरण करताना तपासा या ९ गोष्टी

Reading Time: 3 minutes आरोग्य विमा हा स्वतःसाठी व  कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामुळे आरोग्य खर्चामुळे होणारे वित्तीय त्रास कमी होण्यास मदत होते. आरोग्य विमा मात्र हा काही विशिष्ट काळासाठीच असतो. कालावधी संपल्यावर त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असतं. स्वास्थ्य विम्याचे नूतनीकरण करणे अगदी सोपं आहे. परंतु, नूतनीकरण करताना काही गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक असते.

कुठल्या मालमत्ता मृत्युपत्रात समाविष्ट करू नयेत?

Reading Time: 2 minutes मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे सक्तीच नसल तरी गरजेच मात्र आहे. मृत्यूपत्र करताना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेपेक्षाही कठीण काम असत ते मालमत्तेच वर्गीकरण आणि विभाजन. सगळ्या मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येत नाहीत. जरी सर्व मालमत्ता तुमच्या स्वतःच्या मालकीच्या असल्या तरी काही मालमत्ता या संबंधीत कायद्यांनुसारच हस्तांतरित केल्या जातात किंवा त्या मालमत्तांसाठी मालकी हक्क निर्माण होतानाच लाभार्थीच (beneficiary) नाव नमूद कराव लागत. त्यामुळे या मालमत्तांची तरतूद मृत्यूपत्रात केल्यास  एका मालमत्तेसाठी एकापेक्षा जास्त लाभार्थींची (multipal  beneficiary) तरतूद केली जाऊ शकते व त्यामुळे मालमत्ता हस्तांतरित करण्यावरून विनाकारण निर्माण होणाऱ्या गोंधळाचाही सामना करावा लागतो.