म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग १०
नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडचे स्टेटमेंट ऑफ अकाउंट कसे वाचावे”.
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात- भाग ३
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४
- आपण जी इतर गुंतवणूक करतो, म्हणजे जसे ‘बँक एफडी’मध्ये आपल्याला प्रमाणपत्र (Certificate) मिळते, तसेच इतर काही गुंतवणुकीमध्ये बॉण्ड्स किंवा सर्टिफिकेट्स मिळतात. परंतु म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला “स्टेटमेंट ऑफ अकाउंट” (Statement of Account) मिळते.
- आपल्या बॅंकचे पासबुक असते त्या पद्धतीचे म्युच्युअल फंडचे ‘स्टेटमेंट ऑफ अकाउंट’ असते. डाव्या बाजूला वर गुंतवणूकदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर व ई-मेलची माहिती दिलेली असते. उजव्या बाजूच्या बॉक्स मध्ये आपले पॅन नंबर ची माहिती, तसेच जर दुसरा गुंतवणूकदार असल्यास त्याचे नाव आणि नॉमिनीची माहिती दिलेली असते.
- जेव्हा आपल्याला पहिले ‘स्टेटमेंट ऑफ अकाउंट’ मिळते तेव्हा आपण आपली सर्व माहितीची म्युच्युअल फंडाकडे बरोबर नोंद झाली आहे की नाही ते चेक करावे.
- काही म्युच्युअल फंड मध्ये ही माहिती थोडी वर खाली दाखविली गेली असेल कारण प्रत्येक मुचुअल फंडचे सादरीकरण वेगळे असू शकते.
- त्यानंतर खाली आपण गुंतवणूक केलेल्या योजनेचं नाव, गुंतवणूक पर्याय वैगेरे माहिती दिलेली असते. ती आपण नीट चेक करून घेतली पाहिजे कारण ती माहिती चुकीची नोंदवली गेल्यास आपल्याला नुकसान होऊ शकते.
- त्यानंतर आपण खरेदी केलेल्या योजनेच्या युनिट्सची माहिती असते. त्यात ज्या दिवसाची एनएव्ही (NAV) दिली गेली आहे ती तारीख, गुंतवणूक केलेली रक्कम, मिळालेले युनिट्स व शेवटी आपले आता पर्यंतचे जमा झालेले युनिट्स याची माहिती असते.
- त्यानंतर काही वेळा आपण गुंतवणूक केलेल्या योजनेच्या एक्झिट लोडची माहिती दिलेली असते.
- ‘स्टेटमेंट ऑफ अकाउंट’च्या खालच्या भागात एक ‘ट्रान्झॅक्शन स्लिप’ (Transaction Slip) असते, जिथे आपली आवश्यक माहिती अगोदरच नोंदवलेली असते. त्या स्लिपच्या साहाय्याने आपण वाढीव गुंतवणूक, पैसे काढणे किंवा त्या पद्धतीचे व्यवहार करू शकतो. गुंतणूकदार म्युच्युअल फंडाला विनंती करून कधीही आपले स्टेटमेंट ऑफ अकाउंट मागवू शकतो.
आहे की नाही म्युच्युअल फंड समजण्यास सोपा?
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ७
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ८
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!
–निलेश तावडे
9324543832
(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)
अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/