सध्या एकूणच आर्थिक, औद्योगिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेतला तर, आहे ती नोकरी टिकेलच याची शाश्वती फारशी राहिलेली नाही. जागतिक मंदीने भारतालाच नाही तर, जगाला वेढलेलं आहे. अशातच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हवं तेवढं उत्पादन करण्याची क्षमता वाढली आहे, त्यामुळे कामगार किंवा कर्मचा-यांची गरज आणि मागणी कमी झालेली आहे.
नोकरी कशी आहे, कुठे आहे, यापेक्षाही नोकरीच्या संधी किती आहेत, याला जास्त महत्त्व आलं आहे. अशात आपली चालू नोकरी, ज्यावर आपली उपजिविका चालते, ती गमावून बसतो की काय? या मानसिक तणावामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
असलेली नोकरी गेलीच, तर आपलं कुटुंब कसं चालेल?
मुलांच्या गरजा कशा पूर्ण होतील?
असे अनेक नकारात्मक विचार मनाला ग्रासून टाकतात; पण दुर्दैवाने हेच विचार ती परिस्थिती भविष्यात सत्त्यात येण्यास भाग पाडते.
तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा जादुई मार्ग – हॉफ्सटॅडर सिद्धांत
नोकरी जाण्याची भीती आहे? मग या ६ गोष्टी करा-
१. नकारात्मक विचारसरणीला दूर सारा-
- अनेक वेळा मनात येणारे नकारात्मक विचार ती परिस्थिती प्रत्यक्षात येण्यास भाग पाडतात आणि अर्थातच याचा परिणाम चालू असणाऱ्या कामावरहोतो. यामुळे कळत नकळत त्या कंपनीची उत्पादकता कमी होण्यास तुम्ही जबाबदारठरता.
- स्वत:वर विश्वास ठेऊन समोर असणारं काम व्यवस्थित केलं पाहिजे, चांगल्या कामात व्यस्त राहिल्यास ती भिती ही संपून जाते.
- एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी प्रचंड भितीमुळे आलेल्या नैराश्याचं वाईट सवयीमध्ये रूपांतर होऊ शकतं. काहींना झोप न येणे, अती खाणे किंवा भूक न लागणे, शारिरीक अशक्तपणा, रात्री भयानक स्वप्न पडणे, इत्यादी गोष्टींचा त्रास होऊ शकतो.
२.भीतीची कारणे शोधा-
- नोकरी जाण्याची भीती वाटण्यामागची काही कारणे लक्षात घ्यायला हवीत आणि तशी काही विशेष भयानक परिस्थिती नसेल, तर भिती फक्त तुमच्या मनातच असते.
- अचानक असलेलं काम बंद होणं, कंपनीत नवीन व्यवस्थापन पद्धत राबवली जाणं, कंपनीच्या व्यवस्थापकाने तुम्हाला टाळणं, महत्त्वाच्या मिंटींग्स मध्ये तुम्हाला सहभागी करून न घेणे , तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाची अती चिकीत्सा होणं वगैरे अशी काही कारणे असतील, तर नोकरी जाण्याची भिती वाटणं रास्त आहे.
- खरंतर रोजच्या धावपळीत वावरताना माणसाने चांगल्यात चांगलं काय होऊ शकतं आणि सगळ्यात वाईट काय होऊ शकतं, या दोन्ही परिस्थितीसाठी तयार असायला हवं.
कशी तयार कराल प्राधान्य यादी (To do list)?
३. कौटुंबिक आधार घ्या-
- गेलेली नोकरी कदाचित पुन्हा मिळवताही येईल, पण अशा वेळी मानसिकरित्या भक्कम असणं गरजेचं असतं.
- आपल्याला आधार देणारं कुटुंब सोबत असतं. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला विश्वासात घेऊन परिस्थितीची जाणीव करून द्यायला हवी, यामुळे पुढे दुसरी नोकरी मिळेपर्यंत मानसिक आधार मिळतो. कुटुंब हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, आणि महत्त्वाचा आधार सुद्धा.
४. योग्य संधीची निवड-
- कोणत्याही परिस्थितीत मनाने खचून न जाता इतर उपलब्ध असणा-या संधीचा विचार करायला हवा. त्यासाठी लागणारे संपर्क आणि माहिती गोळा करून त्यादृष्टीने विचार करावा. आपण दुस-या ठिकाणी नोकरी पाहतो आहे हे मात्र सध्याच्या ठिकाणी कोणाला समजू नये याची काळजी घ्यावी.
- मानसिक ताणामुळे दैनंदिन नियोजन विस्कळीत झाल्यामुळे कामात लक्ष लागत नाही, स्वत:लाही पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत नोकरी गेलीच, तर त्यावर कोणत्या प्रकारे मात केली जाऊ शकते, याचा विचार करायला हवा.
- आपले जवळचे मित्र, सहकारी, काही वरिष्ठ व अनुभवी व्यक्ति यांचा सल्ला घ्यावा. नवीन ठिकाणी हवी तशी नोकरी मिळवण्यासाठी स्वत:मध्ये किंवा आपल्या ‘रेझ्युम’मध्ये कोणते अपेक्षित बदल करायला हवेत, याचा विचार करावा, त्यासाठी लागणा-या गोष्टी विचारात घ्याव्या. शांतपणे या योग्य गोष्टींवर भर द्यावा.
तुम्ही नेहेमी कामाची डेडलाईन चुकवता? मग हे वाचा
५. सकारात्मक दृष्टिकोन-
- सकारात्मक दृष्टीकोन ठेवला, तर ही नवीन संधी आहे, स्वत:ला पुन्हा ओळखण्याची! काहीतरी नवीन शिकण्याची संधीही मिळू शकते. नवीन वातावरण, नवीन सहकारी तसेच कामाचा नवा अनुभव या गोष्टींचाही आनंद घेता येतो, पुन्हा नव्याने दिशा आणि ध्येय ठरवलं जाऊ शकतं.
- स्वत:ला जास्तीत जास्त आनंदी ठेवल्याने आत्मविश्वास व उत्साह ही वाढतो.जुन्या सहका-यांचा काही सल्ला कामी येऊ शकतो,त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित संपूर्ण ठेवून राहणं फायद्याचं ठरतं. कुटुंबासोबत काहीसा वेळ घालवायला मिळतो. आपला जोडीदार, मुलं, आई-वडील यांच्यासोबत किती दिवसापासून राहिलेल्या मनमोकळ्या गप्पा होऊ शकतात.
६. परिस्थिती स्वीकारण्याची तयारी-
- अनेक यशस्वी लोकांची चरित्रे वाचून आपण स्वत:ला प्रेरणा देऊ शकतो. अशी अनेक जगप्रसिद्ध यशस्वी लोकांची उदाहरणे आहेत जसं की, ‘जे.के.रोलिंग’ ला तिच्या जॉबवरून काढून टाकण्यात आलं होतं आणि पुढील काही काळासाठी तिला रहायला घर ही नव्हतं, अशाही परिस्थितीत तिने “हॅरी पॉटर” नावाचं आपल्या सर्वांना ज्ञात असणारं जगप्रसिद्ध पुस्तक लिहून पूर्ण केलं.
- एका मोठ्या फायनान्शिअल कंपनीची मालक असलेल्या ” मिशेल ब्लूमबर्ग”ला तिच्या जॉब वरून काढून टाकण्यात आलं, तेव्हा तिच्या बचतीच्या पैशातून एवढी मोठी कंपनी उभी केली. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
कसे कराल कामाच्या वेळेचे नियोजन? वाचा हे ६ नियम
या काही गोष्टींचा अभ्यास केला तर आपला आत्मविश्वास आपण निश्चितच परत मिळवू शकतो व नव्या जोमाने पुन्हा कामासाठी सुरूवात करू शकतो. स्वत:ला पुढच्या येणा-या संधीसाठी कायम तयार ठेवावं. पुढच्या नोकरीच्या ठिकाणी १००℅ देईल असा आत्मविश्वास आणि उत्साह ठेवा.
Download Arthasakshar App – CLICK HERE…
Disclaimer: –https://arthasakshar.com/disclaimer/