अर्थसाक्षर इंट्रा-डे ट्रेडिंग
https://bit.ly/2OTR0MQ
Reading Time: 3 minutes

इंट्रा डे ट्रेडिंग : योग्य स्टॉक्सची निवड कशी कराल?

इंट्रा-डे ट्रेडिंग करणाऱ्यांना योग्य स्टॉक्सची निवड करणे आवश्यक आहे. एखादी लहान चूक झाली तरी काही तासातच मोठे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे स्टॉक्सची योग्य निवड केल्यास सरासरी आरओआय (ROI) पेक्षा अधिक कमाई करता येते. हे लक्षात घेता, इंट्रा-डे ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम स्टॉक ओळखण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत. 

Stock Market : शेअर बाजारातील वादळी काळात टिकण्यासाठी ५ गोल्डन टिप्स

इंट्रा डे ट्रेडिंग : स्टॉक्सची निवड करताना खालील ५ गोष्टी लक्षात ठेवा. 

१. सुरक्षित रहा:

  • इंट्रा-डे ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडरला स्टॉक्सची योग्य निवड करताना सर्वात चांगली सूचना काय असू शकते, याचा विचार केलाय कधी? 
  • तुम्ही याचे उत्तर एकाच शब्दात देऊ शकता- लिक्विडिटी. लिक्विड स्टॉक्सचा फायदा म्हणजे ते मोठ्या संख्येने घेऊ शकता आणि किंमतीवर कोणताही महत्त्वाचा परिणाम न होता ते विकू शकता. 
  • बहुतांश वेळा असेही दिसून आले आहे की, मोठ्या प्रमाणात खरेदीदार नसल्यामुळे लिक्विडीटी कमी असलेले स्टॉक्स व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात खरेदी किंवा विक्री करण्याची संधी देत नाहीत.
  • काही व्यापाऱ्यांच्या मते, किंमतीत वेगाने बदल होत असल्याने लिक्विड स्टॉक्समध्ये जास्त संधी असतात. पण आकडेवारी दुसरेच चित्र दर्शवते. 
  • लिक्विड स्टॉक्सबाबत खूप कमी वेळात जास्त बदल होतात आणि बहुतेक वेळा संभाव्य नफा नष्ट होतो. परिणामी नकारात्मक बाजू मोठ्या प्रमाणात वाढते.

शेअर ट्रेडिंग व्यवहार विरुद्ध गुंतवणूक

२. परस्पर-संबंधांतील स्टॉक्समध्ये व्यापार: 

  • प्रमुख सेक्टर्स आणि निर्देशांकांशी सर्वोत्तम परस्पर संबंध असलेल्या स्टॉसची निवड करा. इंट्रा-डे व्यापाऱ्यांसाठी सर्वोत्तम सूचनांपैकी ही एक. 
  • प्रमुख सेक्टर्स आणि निर्देशांकांशी चांगला संबंध असलेले स्टॉक्स योग्य असतात. 
  • उदा. निर्देशांक किंवा सेक्टरच्या वृद्धीतील हालचालीने स्टॉक्सची किंमत वाढते. म्हणजेच जो स्टॉक समूहाच्या भावनेनुसार मूल्य बदलतो किंवा परस्पर संबंध ठेवतो तो विश्वासार्ह असतो आणि तो सेक्टरच्या अपेक्षित हालचालीनुसार अनुकरण करतो. 
  • उदाहरणार्थ, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत बळकट झाला, तर अमेरिकी बाजारावर अवलंबून असलेल्या सर्व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर त्याचा परिणाम होईल. रुपया मजबूत झाला तर आयटी कंपन्यांचे उत्पन्न कमी झाल्याचे दर्शवते. 
  • त्याचप्रमाणे, रुपया कमकुवत झाल्यास उपरोक्त कंपन्यांना जास्त निर्यात उत्पन्न मिळण्याची संधी असते.

शेअर बाजार – गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार?

३. संशोधनानंतर आपल्या स्टॉक्सची निवड करा: 

  • योग्य स्टॉक्स निवडीसाठी गुणात्मक संशोधन महत्त्वाचे आहे. 
  • आपण ज्या स्टॉकमध्ये व्यापार करणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती मिळवणे यापेक्षा जास्त आश्वासक काही असू शकत नाही. 
  • दुर्दैवाने, बहुतांश ट्रेडर्स स्टॉक निवडण्यापूर्वी पुरेसे संशोधन करण्याकडे दुर्लक्ष करतात.
  • संशोधनाच्या महत्त्वाबाबत आज्ञान किंवा साफ दुर्लक्ष यामुळे किंवा या दोन्ही कारणांमुळे असे होते. माहिती मिळाल्याने सुयोग्य व्यापार करणे शक्य होते.  
  • इंट्रा-डे व्यापारी या नात्याने, तुम्ही ठराविक ट्रेडिंग कालावधीत कमी किंमतीत अस्थिरतेचा फायदा घेऊन नफा कमवाल. अशा प्रकारे, योग्य आरओआय (ROI) घेण्यासाठी त्वरित निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.

स्टॉक मार्केट – पी /बी प्रमाण म्हणजे काय?

४. स्वत: चार्ट वाचायला शिका:

  • इंट्रा-डे ट्रेडर म्हणून आपण टेक्निकल चार्टवर अवलंबून आहोत, हे पहिल्या दिवसापासून माहिती असल्यास अत्यंत फायद्याचे ठरेल. 
  • या व्यवसायात तुम्ही चार्टद्वारे सर्व गोष्टी जाणून घेऊ शकता. 
  • सभोवती काय सुरू आहे, कशाचा परिणाम होतो, कशाचा होत नाही, हे दर्शवणारे ते जणू होकायंत्र असते. 
  • हे लक्षात घेता, चार्ट वाचणे तसे किचकट व कौशल्याचे काम आहे.
  • तुम्ही चार्ट वाचणे आणि त्याचे आकलन करण्याचे कौशल्य विकसित केले असले, तरीही चार्टमधील ज्या स्टॉकवर नजर ठेवली आहे, त्या चार्ट पॅटर्नच्या प्रकल्पाचीही खात्री करून घेतली पाहिजे. 
  • पुरेसा इतिहास नसलेल्या स्टॉकमध्ये व्यापार करणे योग्य नाही किंवा आपण स्पष्ट पॅटर्न नसलेल्या स्टॉकची निवडच करू नये. 
  • दीर्घ इतिहास असलेल्या स्टॉक्सद्वारे आपल्याला पॅटर्न कळतो तसेच उपरोक्त पॅटर्नची पुनरावृत्ती करून व्यापार करता येतो.

शेअर बाजार : किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?

५. बाजाराला आव्हान देऊ नका: 

  • इंट्रा-डे ट्रेंडवर गेल्यास बरेच व्यापारी प्रवाहाविरुद्ध खेळी करताना दिसून येतात. मात्र ट्रेडिंग जगातील बहुतांश व्यापारी बाजाराच्या प्रवाहावर स्वार होऊन ट्रेडिंग करताना दिसतात. +-
  • ही प्रक्रिया बाजारातील लाटा आणि त्यावर स्वार होण्याच्या स्वभावावरून ठरवण्यात आली आहे. 
  • तुम्हाला स्पष्ट चित्र पहायचे असल्यास, मार्केट वाढतेय, असे तुमच्या लक्षात येते तेव्हा आपल्याला अधिक कालावधीसाठी आपल्या स्थितीवर कायम राहता येईल, असे स्टॉक्स निवडावे. 
  • बाजारात घसरण होत असेल, तर आपण त्या दृष्टीने कमी कालावधीचा विचार केला पाहिजे.

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

तळटीप: इंट्रा-डे ट्रेडिंग हा पूर्णपणे वेगळा खेळ आहे. शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी, तुम्हाला नियम आणि बाजार परिभाषित करणाऱ्या ट्रेंड्सची माहिती असणे गरजेचे आहे. परिपूर्ण व्यापार करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य असणे आवश्यक आहेच शिवाय निरंतर शिकणे, ज्ञान आणि सतर्कता वाढवत रहाणेही महत्वाचे आहे.

एंजल ब्रोकिंग लिमिटेड 

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Search: Intra-Day Trading Marathi Mahiti, What is Intra-day Trading in Marathi, Intra-day Trading Marathi,  How To best Stocks For Intra-day Trading in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…