Reading Time: 2 minutes

मागच्या भागात आपण दोन्ही देशांचा जीडीपी, परदेशी कर्ज, दरडोई उत्पन्न व विकास दर या साऱ्या विषयांची तुलनात्मक मांडणी बघितली या भागात इतर महत्वपूर्ण विषयांची तुलना पाहू.

भारताची अर्थव्यवस्था वि. पाकिस्तानची अर्थव्यवस्था – १५ महत्वाचे मुद्दे, भाग- १

 

६. थेट परकीय गुंतवणूक – २०१७  (FDI- 2017)

भारत: ४३.४८ अब्ज डॉलर 

पाकिस्तान: २७.६१ अब्ज डॉलर

विकसनशील देशांना आर्थिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआय (FDI) खूपच महत्वाची असते.  आंतरराष्ट्रीय व्यापार करारामुळे थेट परदेशी गुंतवणूक वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एफडीआयमुळे अनेक  देशांना फायदा झाला आहे. एफडीआयच्या जागतिक यादीमध्ये भारत १९ व्या तर ५९ व्या स्थानावर आहे. 

 

७. गोल्ड रिझर्व्ह (Gold Reserves)-

भारत: ५५७.७७ टन्स (भारत हा जगातील सर्वात जास्त सोनं आयात करणारा देश आहे.)

पाकिस्तान: ६४.५० टन्स 

आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यवहार करण्यासाठी सोने राखीव चलन म्हणून काम करते. त्यामुळे कोणत्याही देशासाठी जास्त प्रमाणात सोने असणे महत्वाचे आहे. परकीय चलनाचे मूल्य अस्थिर असते.  त्यामध्ये चढउतार होत असतात. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मान्यतेनुसार बाजारभावाच्या आधारे एखाद्या मान्य देशाच्या कर्जाची परतफेड करण्याकरिता सोने वापरता येते. कर्ज घेणार्‍या राष्ट्रांना कर्ज देताना जागतिक बँकसुद्धा सोने स्वीकारते. सर्वात जास्त गोल्ड रिझर्व्ह असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत नवव्या स्थानावर,  तर पाकिस्तान ४४ व्या स्थानावर आहे. 

 

८. साक्षरता दर – २०११ (Literacy Rate -2011)

भारत: ७४.०४%  

पाकिस्तान: ६०% 

साक्षरतेमध्येही भारतानेच बाजी मारली असून जास्त लोकसंख्या असूनही, भारतातील साक्षरता दर पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. 

 

९. वाहतूक (Transportation)- 

भारत: रस्ते  – ५.५ मिलियन किमी (२०१८), रेल्वे ट्रक्स – १,१५,००० किमी 

पाकिस्तान: २,६४,४०१ किमी (२०१८), रेल्वे ट्रक – ११,८८१ किमी 

चांगली वाहतूक व्यवस्था हे प्रतिशिल  देशाचे वैशीष्ट्य आहे. भारताची वाहतूक व्यवस्था ही पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. 

 

१०. दारिद्र्य (Poverty):

भारत: २८% (UNDP रिपोर्ट २०१८)

पाकिस्तान: २८% 

दारिद्र्य ही समस्या दोन्ही देशांसमोर समसमान प्रमाणात आहे.  

 

११. महागाई दर (Inflation Rate)-

भारत: २.४९%

पाकिस्तान: ४.७८% 

भारत सध्या वाढत्या महागाईचा सामना करत असला तरीही पाकिस्तानमध्ये मात्र यापेक्षा जास्त महागाई आहे. दोन्ही देशांच्या महागाई दरामध्ये लक्षणीय तफावत आहे.

 

१२. बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) –

भारत: ६.१%

पाकिस्तान: ५.९% 

भारतात बेरोजगारीचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. इथे पाकिस्तानचा बेरोजगारी दर भारतापेक्षा कमी आहे. 

 

१३. मिलिटरी खर्च (Military expenditure) –

भारत: रु. ३.१८ लाख कोटी (अर्थसंकल्प २०१९)

पाकिस्तान:  १२६८६ मिलियन डॉलर (अर्थसंकल्प २०१८)

आजपर्यंत  भारतासोबत झालेली सगळी युद्ध हरुनही भारताशी युद्ध करण्याची आणि ते जिंकण्याची दिवास्वप्न बघणाऱ्या पाकिस्तानचा मिलिटरी खर्च मात्र भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. पुढील इमेजमधून दोन्ही देशांच्या मिलिटरी खर्चाचा अंदाज येईल.

(Image source: IB Times UK)

१४. भ्रष्ट्राचार (२०१६) –

भारत: ७९ (३८/१००)

पाकिस्तान: ११६ (२९/१००)

भ्रष्ट्राचार ही देशातली अजून एक मोठी समस्या. खरंतर भ्रष्ट्राचार हे अनेक समस्यांचे मूळ आहे. भ्रष्ट्राचारामध्ये मात्र भारत देशाने पाकिस्तानला मागे टाकले आहे.  यासाठी केवळ सरकारनेच नाही तर समस्त देशवासीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारण शेवटी, “हर व्यक्ती से हि देश बनता है…”

१५.  लोकसंख्या (Population) –

भारत: १३३.९२ कोटी (जगात दुसऱ्या क्रमांकावर)

पाकिस्तान: १९.७ कोटी 

भारतात वाढती लोकसंख्या एक मोठे आव्हान आहे. भारताची लोकसंख्या सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, बेरोजगारी यासारख्या समस्यांना तोंड देत आज देशाची अर्थव्यवस्था “टॉप टेन” अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाते. ही भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.