Arthasakshar Corona & Real estate
Reading Time: 8 minutes

बांधकाम व्यावसायिकांनो, सीट बेल्ट बांधा आणि गियर बदला !

“मला चंद्राकडून प्रकाश नाही, तर अंधाराशी लढण्यासाठी बळ मागायचे आहे”…

लोकप्रिय चित्रपट शराबीमध्ये ज्याप्रमाणे मुन्शीजींची भूमिका साकारणारा ओमप्रकाश जसं विक्की कपूर म्हणजेच अमिताभ बच्चनला म्हणतो की, “शायरी में वजन चाहिए तो इश्क होना जरुरी है, बरखुरदार”, त्याचप्रमाणे कोणत्याही तत्त्वज्ञानाचं मुख्य ‘कारण’ असतं पिडा सहन करणे! असो.  हे सुद्धा पुन्हा स्वनिर्मित तत्त्वज्ञान आहे (त्याचं कारणही लॉकडाऊन हेच आहे हे नव्यानं सांगायची गरज नाही). 

आली सर्वांनी तुलनात्मक ‘गरीब’ होण्याची वेळ !

  • या लॉकडाऊन मध्ये दिवसागणिक सगळं काही व्हर्च्युअल अथवा आभासी व्हायला लागलंय, कारण प्रत्यक्षात काहीच होत नाही, मात्र झूमवर मिटींग्स, वेबिनार्स, ड्यूओ कॉल्स, वॉट्सॲप ग्रूपवर चर्चा, असं सगळं काही जोरात सुरू आहे. 
  • दररोज काहीतरी नवीन चर्चेत असते, ज्यामुळे सर्वत्र अतिशय गोंधळाचे वातावरण आहे. बांधकाम व्यवसायाच्या बाबतीत तर गोंधळ नेहमीच असतो, हा विषाणूच कशाला सरकार किंवा समाजाच्या नियंत्रणात नसलेली कोणतीही समस्या असू दे; उदाहरणार्थ कमी पाऊस, जास्त पाऊस, अवैध बांधकामं, मेट्रो एफएसआय/टीआरडी/टीओडी यापैकी काहीही असलं तरी दोष नेहमी रिअल इस्टेटलाच दिला जातो व परिणामही त्यांच्यावरच होतो. 
  • रिअल इस्टेट उद्योग हा अनाथासारखा आहे (कुणी “माय बाप” नाही) व याच्याशी संबंधित बहुतेक घटकांसाठी घरून काम करणे शक्य नाही; म्हणजे जोपर्यंत आपण व्हर्च्युअल घरे बांधून त्यात लोकांना व्हर्च्युअली राहायला सांगून त्याचे बिट-कॉईनमध्ये पैसे घेई पर्यंत तरी नक्कीच नाही!
  • मी अर्थातच उपरोधानं बोलतोय, पण परिस्थितीही तशीच आहे कारण सरकारनं आधी २० एप्रिलपासून बांधकामाला सुरूवात करता येईल अशी घोषणा केली, अर्थात ते कसं शक्य होईल याबाबत काहीच स्पष्टता नव्हती, तरीही घोषणा करण्यात आली. 
  • त्यानंतर १९ एप्रिलला सरकारनं (पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी, माननीय उप मुख्यमंत्री व सगळ्यांनी) संध्याकाळी घोषणा केली की पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात (इतर क्षेत्रातकदाचित परवानगी दिली असेल पण मला या क्षेत्रांची जास्त काळजी आहे) म्हणजे पुणे प्रदेशात कशालाही परवानगी नाही. 
  • त्याशिवाय अशीही घोषणा करण्यात आलीय की मालमत्ता नोंदणीलाही (म्हणजे सदनिकांच्या) २० एप्रिलला सुरुवात होईल, आता नोंदणीसाठी बाहेर जायला कुणाला व कशी परवानगी दिली जाईल हे देवालाच माहिती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेर एवढी भीती पसरली असताना कुणी बाहेर जायची हिम्मत कशाला करेल? 
  • यासंदर्भात माध्यमे तसंच सरकार स्वतःही धोरणांबाबत गोंधळलेलं आहे. म्हणूनच नेहमीप्रमाणे आपण फक्त रिअल इस्टेटच्या भविष्याविषयी चर्चाचर्विचरण करत बसू शकतो. 

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

पुणे शहराची परिस्थिती –

  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यानं प्रयत्न करूनही, पुणे प्रदेशातील परिस्थिती बिघडली आहे असा समज झाला आहे. पण पुणे व मुंबईमध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे, जवळपास निम्मा महाराष्ट्र (इतर राज्यांमधले लोकही) नोकरी व करिअरसाठी या भागांमध्ये राहात आहेत या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. 
  • सगळ्या अधिकाऱ्यांविषयी पूर्णपणे आदर राखत मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की पुणे शहरातल्या परिस्थितीवर कुणाचे नियंत्रण आहे, कारण पोलीस त्यांची स्वतःची परिपत्रके काढतात, पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे आयुक्त आपापली पत्रके काढतात, त्यानंतर जिल्हाधिकारी वेगळे आदेश काढतात त्याउपर मायबाप सरकार ज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा जे कुणी पदाधिकारी असतील ते नवीन निर्बंध लागू करणे, काढून टाकणे किंवा आणखी कडक करण्याविषयी घोषणांची सरबत्ती करतात. 
  • तर्कसंगतपणे विचार करता मला असं वाटतं की, ही साथीच्या रोगाची आपत्ती असल्याने सार्वजनिक आरोग्य विभाग नियंत्रकाच्या भूमिकेत असला पाहिजे व इतर सर्व विभागांनी संबंधित मंत्री काय म्हणतात त्याचे पालन केले पाहिजे, जे डॉक्टरही आहेत. 
  • पण वस्तुस्थिती अशी आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता इतर सर्व विभाग त्यांच्या योजना राबवताहेत ज्यात अजिबात समन्वय नाही, हीच खरंतर मुख्य आपत्ती आहे. माफ करा मित्रांनो (म्हणजेच अधिकाऱ्यांनो) पण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून किमान आपल्या येथे तरी अशीच परिस्थिती आहे, मात्र मला तुमच्या प्रयत्नांचं (सरकार म्हणून करत असलेल्या) श्रेय अजिबात काढून घ्यायचं नाही.
  • असो, तर आता एप्रिल अखेरपर्यंत संपूर्ण पुणे प्रदेशातील हालचालींवर आणखी कडक निर्बंध असणार आहेत, (आता त्याचा अर्थ काय होतो असं विचारू नका). 
  • मला फक्त एवढाच प्रश्न पडलाय की बाहेर उन्हाचा पारा ४० अंशांपर्यंत पारा चढलेला असताना बांधकामाच्या ठिकाणी झोपड्यांमध्ये दाटीवाटीनं राहावं लागणाऱ्या व हाताला काम नसलेल्या मजुरांना कसं सांभाळायचं? 

 कोरोना -अभूतपूर्व, अमुलाग्र धोरणात्मक बदलांची अपरिहार्यता आणि संधीही !

रिअल इस्टेटचं भवितव्य –

  • मी पुन्हा एकदा सांगतो, कोरोना विषाणू ज्या वेगानं पसरतोय त्याचं गांभीर्य मला समजतंय पण त्याचवेळी लॉकडाऊनमुळे गरीबांचा मानसिक व आर्थिक ताण वाढतोय (रिअल इस्टेट तसंच इतर सर्व उद्योगांमधल्या) या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे.
  • या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडीशी आशेची किनार म्हणजे माझ्यासोबत काम करणारी तरुण पिढी रिअल इस्टेटमधील त्यांच्या भावी वाटचालीकडे कुतुहलानं (काळजीनंही) पाहतेय. 
  • माझ्या मित्राचा मुलगा, जो माझ्यासोबत अभियंता म्हणून काम करतो, तसंच माझ्या धाकट्या मुलानं (जो मार्केटिंग मध्ये काम करतो) आमच्या कंपनीतील तसंच संपूर्ण रिअल इस्टेट उद्योगात व सामाजिक पातळीवर काय परिस्थिती असेल याविषयी दहा मुद्द्यांची एक प्रश्नावली पाठवली. 
  • मला आनंद झाला, कारण तुम्हाला प्रश्नच पडत नसतील तर याचे दोनच अर्थ होतात एक म्हणजे तुम्ही अगदीच मठ्ठ आहात किंवा तुम्हाला संपूर्ण ज्ञानप्राप्ती झाली आहे. पण तुम्हाला काही प्रश्न असतील व तुम्ही ते विचारायचं धाडस करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही बिनडोक तरी नक्कीच नाही. 
  • मी त्याला मेलवर उत्तर पाठवले की मी योग्य ते शंका निरासन करण्याचा प्रयत्न करेन कारण मी आधी एक अभियंता व नियोजक आहे, पण खरा धंदेवालानाही व दुसरे म्हणजे आमच्यापैकी अगदी भल्याभल्यांनीही अशी परिस्थिती कधीच अनुभवली नव्हती, त्यामुळे माझं बरोबर आहे किंवा चूक याची मला खात्री नाही. 

मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

माझ्या तर्काप्रमाणे त्याला दिलेली उत्तरं इथे देत आहे, त्याचा केवळ बांधकाम व्यावसायिक, त्यांचे कर्मचारी किंवा रिअल इस्टेटशी संबंधित संस्थांनाच नाही तर संपूर्ण उद्योग जगताला थोडाफार उपयोग होईल (विशेषतः व्यवसायातील पुढच्या पिढीला) अशी मला आशा वाटते. 

मी जशी उत्तरं लिहीली त्याच स्वरूपात ती देत आहे जेणेकरून हा संवाद नैसर्गिक राहील. त्याच्या प्रश्नांमध्ये नाविन्य आहे व तो ज्या प्रकल्पावर काम करतोय त्याविषयी ते आहेत पण हे प्रश्न बहुतेक बांधकामांना (तसंच बहुतेक बांधकाम व्यावसायिकांना) लागू होतात, तर हे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत…

१४ एप्रिल, २०२० रोजी संध्याकाळी ४:५० वाजता रोहित महाजन याने ईमेलवर विचारले:

संजय काका, मला काही मुद्द्यांविषयी तुमचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे.

१. प्रेस्टीज अव्हेन्यच्या( आमचे एक प्रोजेक्ट) बांधकामाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी आपली काय योजना आहे, कारण आपला बराच वेळ वाया गेलाय व संपूर्ण लॉकडाऊन संपेपर्यंत पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असेल?

  • खरं सांगायचं तर सरकार, पुण्याविषयी व बांधकाम साहित्याच्या वाहतुकीविषयी काय निर्णय घेतील याविषयी आत्ताच काही टिप्पणी करणं घाईचं होईल, म्हणूनच २० एप्रिलच्या आदेशांपर्यंत वाट पाहू. 
  • त्यांनी निर्बंध शिथील केले तरीही बाहेरून बांधकामाच्या ठिकाणापर्यंत साहित्य कसं पोहोचेल हा प्रश्नच आहे, पुरवठा साखळी पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल.त्यानंतर आपल्याला कर्मचारी तसंच मजुरांच्या सुरक्षिततेसाठी संसर्गाचा धोकाही विचारात घ्यावा लागेल, जो अजूनही कायम आहे. त्यामुळे मला असं वाटतं लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे ३ मेपर्यंत वाट पाहावी, परिस्थितीचा आढावा घ्यावा व त्यानंतर आपली कृती योजना ठरवावी. 
  • आपण आपल्या ग्राहकांना, तसंच रेरासारख्या प्राधिकरणांना व आपल्या बँकांनाही यासंबंधी पत्रं लिहीणार आहोत.

दिवस असे की कोणी माझा नाही….

२. कोव्हिड-१९च्या परिस्थितीमुळे भविष्यात काय घडणार आहे, हे आपल्याला अजूनही माहिती नाही किंवा त्याविषयी काही कल्पना नाही (वाईटात वाईट परिस्थिती असेल तर आपण आपल्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांना कधीपर्यंत पगार देऊ शकतो).

  • मी यासंदर्भात विचार करतोय, पण कंपनीला उत्पन्न नसताना हे जरा अवघड होणार आहे हे सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे. 
  • तुम्ही जवळपास ५० दिवस घरी बसून असताना कोणतीही कंपनी तुम्हाला पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. 
  • या काळात कर्मचाऱ्यांचा घर खर्च वा पेट्रोल तसेच हॉटेलिंग इत्यादी बाबींवरील खर्च नक्कीच कमी झाला असला पाहिजे. 
  • कंपनीला होत असलेला तोटा त्यांनीही विचारात घेतला पाहिजे, आपल्याला हे कर्मचाऱ्यांना समजावून सांगावं लागेल, जे मी सांगीनच. 

३. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर प्रकल्पातील विलंबाविषयी रेराला सूचना देण्याबद्दल आपली काय योजना आहे व ज्यांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत त्या सगळ्या कंपन्या यासाठी अर्ज करतील हे विचार घेऊन त्यांचा दृष्टिकोन किती वास्तववादी असेल. एक शिखर संस्था म्हणून क्रेडाईच्या आगामी परिस्थितीविषयी काही योजना आहेत का?

  • क्रेडाई ही सामाजिक संघटना आहे व ती सल्ला देऊ शकते किंवा मार्गदर्शन करू शकते, जे ती नक्कीच करेल. 
  • रेराने आधीच प्रकल्पांना महिन्यांच्या विलंबाला परवानगी दिली आहे, पण या आपत्तीचा परिणाम त्याहूनही बराच अधिक असणार आहे.  
  • आपण प्राधिकरणांना वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहोत.

४. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून परिस्थिती हाताळण्यासाठी आपली काय योजना आहे?

  • आता सदनिकांची विक्री (खरतर कशाचीही विक्री) ही सगळ्यात अवघड बाब ठरणार आहे कारण लोकांना त्यांच्या स्वतःच्या भवितव्याचीच भीती वाटतेय व ते कदाचित घर भाड्याने घ्यायचा विचार करतील. 
  • गुंतवणूकदार असतील पण ते तुम्ही जे दर मागताय त्यासाठी तुम्हाला रडवतील (दर पाडून मागतील).
  • आपल्याला दोन्हींचा समतोल साधावा लागेल व लोकांनी घर घ्यावे यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन यावे लागेल, कारण हाच एकमेव मार्ग आहे. तसंच सध्याच्या ग्राहकांनाही विश्वासात घ्यावे लागेल.

आर्थिक संकटांचा पुनर्विचार

५. या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण बँका व त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करत आहोत, प्रकल्प वित्त पुरवठा, कर्ज, व्याजदर इत्यादीं संदर्भातील?

  • वैयक्तिक पातळीवर बोलायचं तर आपल्याला केवळ एका प्रकल्पाचं कर्ज आहे (सुदैवानं) तेही प्रेस्टीजच्या साईटवर पण तिथे अजूनही आपली विक्रीयोग्य घरे भरपूर आहेत. 
  • आम्ही बँकेला कर्जाच्या हप्त्यांसाठी तीन महिन्यांची स्थगिती देण्याची विनंती केली आहे, जी आणखी तीन महिने वाढेल अशी अपेक्षा करता येईल. पण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतःहूनच निधी उभारणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. 
  • सरकारलाही या बाबीचा विचार करावा लागेल, तसंच मीदेखील विचार करतोय पण वित्तपुरवठा या विषयात मला विशेष गती नाही, त्यामुळे मी या क्षेत्रातल्या एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेईन. 
  • ज्या विकासकांचे एकाचवेळी अनेक प्रकल्प सुरू आहेत, त्यांना पैसा खेळता ठेवणे, कर्ज फेडणे तसंच बांधकाम पूर्ण करण्यासाठी नव्याने निधी मिळवणे आव्हानात्मक असणार आहे हे नक्की. 
  • इथे कंत्राटदार व सप्लायर्सनीही त्यांच्या पैशांसाठी थोडं थांबायचं मान्य केलं पाहिजे, तरच त्यांच्या हाती काही पडेल. त्याच बरोबर बँकानेही त्यांच्या व प्रकल्पाच्या दृष्टीने योग्य तो विचार केलाच पाहिजे! 

 ६. या काळात जो काही तोटा झाला त्यामुळे उत्पादनाची किंमत वाढवणे हाच एकमेव उपाय आहे का? त्याऐवजी इतर काही पर्याय आहेत का हे कृपया मला सांगा?

  • बांधकाम खर्चात वाढ होणार आहे पण विक्रीच्या दरात नाही, हा रिअल इस्टेट तसंच इतर प्रत्येक उद्योगासाठी या आपत्तीचा सर्वात वाईट पैलू. 
  • आपल्याला आपले जास्तीचे खर्च शक्य तितक कमी करावे लागतील. सप्लायर्स तसंच कंत्राटदारांशी नव्याने बोलणी करावी लागतील कारण काही भार त्यांनाही उचलावा लागेल!

७. कामासाठी पुन्हा लोक मिळणं अतिशय अवघड असणार आहे व सगळी कामं पूर्ण करण्यासाठी हातात अतिशय कमी वेळ असल्यामुळे ते कदाचित जास्त पैसे मागतील, अशावेळी आपली काय करायची योजना आहे?

  • ही दुधारी तलवार आहे, कारण मजूर, कंत्राटदार व विक्रेत्यांनाही काम हवंच आहे, नाहीतर ते उपाशी मरतील, एकतर इथे काम करा किंवा आपल्या घरी परत जा, जिथे त्यांना काहीच काम नसेल. एवढेच पर्याय त्यांच्याकडे आहेत. 
  • आपल्याला त्यांना हेच समजून सांगावं लागेल, आपण किमान प्रयत्न तरी करू शकतो.

८. या काळात बाजारात टिकून राहण्यासाठी खर्च, पगार, वरखर्च व इतरही अनेक गोष्टींमध्ये कपात करावी लागेल; याविषयी तुमचे काय मत आहे?

  • प्रत्येकाने संबंधित प्रकल्पाचे व व्यवसायाचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे व त्यानंतर कृती केली पाहिजे, थेट कोणताही निष्कर्ष काढू नये, नाहीतर उगाच गोंधळ निर्माण होतो. मी हेच करत आलोय व तुम्हालाही हेच करायचं आहे भविष्यात!

आर्थिक आणीबाणीची शक्यता अजिबात नाही…

९. रिअल इस्टेटचे दर किमान २०%ने कमी होतील असा अंदाज आहे, असे झाल्यास भविष्यातील विकास योजनांसाठी तुमचा काय व कसा प्रस्ताव असेल?

  • कोणताही साथीचा रोग असो, युद्ध किंवा आर्थिक आपत्ती, त्यानंतर रिअल इस्टेटचे दर पडतील अशी चर्चा सुरू होते. 
  • अशा चर्चा ऐकण्याऐवजी, आपण किती किमतीत बांधकाम करू शकतो व किती योग्य दराने विकू शकतो तसंच ग्राहकांची काय गरज आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यानुसारच काम केले पाहिजे.
  • ज्या व्यक्तीने वारेमाप म्हणजेच क्षमतेहून अधिक कर्ज घेतलेले नाही तिने घाबरायची गरज नाही, तर खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व संयम राखला पाहिजे. 
  • घरांसाठी ग्राहक येतील, कारण पुण्यातून सध्या बाहेर गेलेल्या या सगळ्या लोकांना पुन्हा पुण्यातच यावं लागेल कारण त्यांना त्यांच्या गावांमध्ये नोकऱ्या किंवा त्यांना आता ज्या जीवनशैलीची सवय झालीय ती मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. 
  • ते जेव्हा परत येतील तेव्हा त्यांनाही कमी पैशातच काम करावं लागेल हे वास्तव आहे. 
  • आपल्याला घराच्या ग्राहकांना (म्हणजे ज्यांचं स्वतःच्या मालकीचं घर नाही त्यांना) स्वतःच्या मालकीचं घर असणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव करून द्यावी लागेल, कारण खरंतर अशा काळामध्ये घर हीच सर्वोत्तम मालमत्ता तसंच आधार आहे आणि घरून काम करा ही पद्धत ज्या कंपन्या वापरतील त्या कर्मचार्यांनातरी पहिले स्वतःचे घर घ्यावे लागेलच ना!

१०. सगळ्यात शेवटी मी इतर काही पाहिले/वाचले पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल, तर कृपया मला सांगा.

  • या काळात संयम सर्वात महत्त्वाचा आहे व मन संतुलित ठेवायला पाहिजे. तसंच उत्पन्नासाठी केवळ रिअल इस्टेट किंवा एकाच उद्योगावर अवलंबून राहून चालणार नाही, उत्पन्नाचे इतरही स्रोत असले पाहिजेत.
  • सेवा उद्योगाची स्थिती चांगली असेल कारण लोक त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्याशिवाय जगू शकत नाहीत. म्हणूनच आपणही अशी क्षेत्रं कोणती आहेत याचा विचार केला पाहिजे व त्यांच्याकडे समांतर संधी म्हणून पाहिलं पाहिजे. 
  • त्याचवेळी घर घेणारा ग्राहकही इथून पुढे चैनीच्या किंवा ऐषो आरामाच्या गोष्टींऐवजी मूलभूत सोयींवर लक्षं केंद्रित करेल. कारण पुढची दोन-तीन वर्षं पैन् पै महत्त्वाची असेल, त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, कारण लोकांची स्मरणशक्ती नेहमी प्रमाणेच अगदी अल्पकाळ असते. 
  • तुमच्या पिढीनं अशा जागतिक पातळीवरील सामाजिक आपत्तीसाठी सज्ज राहिलं पाहिजे, कारण ही पहिली आपत्ती असेल पण शेवटची नक्कीच असणार नाही, हे लक्षात ठेवा. 
  • एका अर्थानं आपल्यापैकी बहुतेकांसाठी ही आयुष्य बदलून टाकणारी घटना होती. अर्थात आपण त्यातून काही शिकलो तर! कारण इथून पुढे जीवनाच्या दृष्टिकोनापासून ते जीवनाच्या गरजांपर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत, त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगातही बदल होणं अपरिहार्य आहे 
  • त्याचबरोबर तुम्हाला स्वत:ला शारीरिकरित्या व मानसिकरित्या खंबीर बनवावे लागेल आणि जीवनशैली तशीच करावी लागेल. 

कोरोना – लॉकडाऊनच्या काळात या ८ आर्थिक गोष्टी अवश्य करा

मला असं वाटतं मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा किंवा तर्कशुद्धपणे समजून सांगण्याचा माझ्यापरीनं जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे, मी माझी बाजू स्पष्टपणे मांडलीय; तू व रोहननं आपल्या टीमला वॉट्सॲपवर हे पाठवावं असं मला वाटतं कारण त्यांनाही पुढे परिस्थिती कशी असेल हे समजलं पाहिजे. मला अतिशय आनंद वाटतो की तू कामाविषयी बराच विचार केला आहेस, भविष्यकाळ हा आपल्या अपेक्षेप्रमाणे नसेल हे नक्की, पण कदाचित म्हणूनच त्याला भविष्यकाळ म्हणतात! 

एक गोष्ट मात्र नक्की या कोव्हिडच्या आपत्तीवरून तुमच्या पिढीनं एक धडा नक्की घेतला पाहिजे, जो तुम्ही बहुतेकजण विसरला आहात; कष्टाला केवळ एकच पर्याय आहे तो म्हणजे जास्त कष्ट!

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

बेस्ट लक! 

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

ईमेल: [email protected]

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…