Reading Time: 3 minutes

मोबाईल क्रांती आणि स्वस्तात उपलब्ध मायाजाल यामुळे ऑनलाईन गेम माहित नाही असे कोणी नसेल. सर्व वयोगटातील लोक ड्रीम 11, रमी सर्कल, माय 11, पोकरबाजी इ.खेळ खेळत आहेत. या खेळांचा प्रचार प्रसार करण्यात प्रसिद्ध खेळाडू, मान्यवर नट  गुंतले आहेत. 

हे खेळ इंटरनेटद्वारे आयपॅड, टॅबलेट, मोबाईल फोन किंवा अन्य दुरसंचार उपकरणावर खेळता येतात. यातील काही खेळ हे कौशल्यावर आधारित असतात तर काही नशिबावर अवलंबून असतात. यात लोक केवळ मनोरंजनासाठी गुंतत नसून त्यांना घरच्या घरी आरामात पैसे मिळतील असे वाटत आहे.

  • एखादी गोष्ट माहित करून घेण्यासाठी वाचन श्रवण यापेक्षा दृश्य स्वरूप अधिक परिणामकारक असल्याने शैक्षणिक हेतूने निर्माण केलेले खेळ हसत खेळत अनेक गोष्टी सर्वाना सहज समजाऊ शकतात त्याचप्रमाणे अनेक खेळ लहानथोर सर्वांची करमणूक करू शकतात. 
  • सहसा असे खेळ खेळणाऱ्यास थोडे पैसे खर्च करूनच खेळ खेळण्याची परवानगी देतात. सुरवातीस काही टप्पे मोफत खेळण्यास मिळून नंतर त्या अँपची प्रीमियम आवृत्ती खेळ खेळण्यासाठी निवडली तर शुल्क भरावे लागते. 
  • यातील काही खेळ केवळ रोमहर्षक असले तरी असे अनेक खेळ आहेत जे खेळाडूना खरे पैसे अथवा महागड्या वस्तू जिंकण्याची संधी देतात. यांना खेळ म्हणावे का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर आला असता न्यायालयाने ज्या खेळातील यश हे खेळाडूंचे ज्ञान, प्रशिक्षण, लक्ष, अनुभव, कौशल्य यावर अवलंबून असते.त्यास कौशल्याचे खेळ मानावे. उदा. गोल्फ, हॉर्स रेसिंग, बुद्धिबळ तथापि संभाव्यातेचा समावेश असलेले इतर अनेक खेळ हे संधीचे खेळ मानला जातो. 
  • या संबंधत सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणात जे निवाडे दिले आहेत ते कौशल्य आणि संधी यातील गोंधळास पूर्णविराम देणारे आहेत. 
  • त्याचप्रमाणे हे खेळ कायदेशीर असण्याबद्धल कोणताही संदेह राहिलेला नाही. अनेक ऑनलाईन गेमर्सना त्यांनी जिंकलेल्या बक्षिसाच्या परिणामाची माहिती नसते. 

जाणून घ्या : ‘डार्क पॅटर्न’ म्हणजे काय ? 

  • आयकर कायद्यानुसार कोणताही बोनस, संदर्भ प्रोत्साहन, अन्य प्रलोभने हे संबंधित व्यक्तीचे उत्पन्न मानले जाते. याशिवाय प्राप्तकार्त्यास रक्कम अथवा बक्षीस देण्यापूर्वी जबाबदार व्यक्तीने 194 BA नुसार त्यातून मुळातून करकपात करणे आवश्यक आहे.
  • वस्तू आणि सेवाकर (GST) लागू झाल्यापासून ऑनलाईन खेळास दोन प्रकारे करआकारणी लागू होत होती. 
  • शैक्षणिक/ कौशल्याच्या खेळावर 18% आणि संधी / करमणूकीच्या खेळावर 28% जिएसटी आकारला जात होता. मागील वर्षात (सन 2023-24 मध्ये) ₹14000/- कोटीहून अधिक म्हणजेच सन 2017-18 च्या तुलनेत पाचपट कर संकलन झाले. 
  • त्यामुळे कर संकलन वाढवण्यासाठी आता 1 ऑक्टोबर 2023 पासून सरसकट 28% GST लागू केल्याने या उद्योगातील अपेक्षित असलेली वाढ लक्षात घेऊन नाजिकच्या भविष्यात या क्षेत्रात भूमितीय श्रेणीने वाढ होऊन ₹ 75000/- कोटीहून कर जमा होईल अशी सरकारची अपेक्षा आहे. 
  • याचे समर्थन करताना या मधील व्यसनाधीनतेची शक्यता ( हे म्हणजे सिगारेट दारू यावरील बंदीऐवजी करवाढीचे समर्थन करताना अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे) हे कारण दिले जाते.
  • या मोठ्या करवाढीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचा पाठींबा असलेला हा उद्योग, सरकारच्या या अतिलोभीपणामुळे भारताबाहेरही जाऊ शकतो. 
  • आता येथे नोंदणी किंवा प्रवेश फिवर देखील हा दर लागू झाला असून जिकंलेल्या रकमेवर अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न म्हणून 30% आयकर आणि 4% अधिभार सेक्शन 115 BB नुसार द्यावा लागतो. 
  • केंद्रीय करनियंत्रण मंडळाने (CBDT) टिडीएस नियम स्पष्ट करणारे परिपत्रक जारी केले असून ऑनलाईन गेमिंग कंपन्यानी ₹100/- ची मर्यादा ओलांडल्यास विजयाची रक्कम वितरित करण्यापूर्वी 30% करकपात वास्तविक मुल्यावर करावी असे सुचवते म्हणजेच 100 रुपयातील 30 रुपये मुळातून कापलेला कर आणि 70 रुपये ही विजेत्यास दिलेली रक्कम अशी विभागणी झाली पाहिजे. 
  • अनेक तज्ञाच्या मते हा उद्योग आता स्थिर झाला असल्याने या सर्वांचा आढावा घेऊनच त्यावर निर्णायक मत व्यक्त करता येईल. उत्पन्नाची मोठी क्षमता असणाऱ्या क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे कर आकारणीच्या तरतुदी असणे आवश्यक आहे. यासंबधी अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहेत.

हे वाचले का ?  क्राउडफंडिंग – वित्तपुरवठा  निधी 

      ऑनलाईन गेमिंग संदर्भात उपस्थित होणारे काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे –

★एका आर्थिक वर्षात ऑनलाईन खेळातील एका ठिकाणातून झालेला तोटा हा दुसऱ्या ठिकाणी झालेल्या नफ्यात समायोजित करता येईल का?

◆निव्वळ विजयाची गणना करताना असे केले जात नाही आणि ते अपेक्षितही नाही. या संदर्भातील कायद्यात, तोटा पुढील वर्षी नेण्यासाठी प्रतिबंध आहे परंतु उत्पनाच्या विरुद्ध तोटा सेट ऑफ करण्यास कोणताही स्पष्ट प्रतिबंध नसल्याने तो समायोजित करता येईल असे वाटते.

★ऑनलाईन गेमिंग खेळण्यासाठी झालेल्या खर्चाची वजावट घेता येईल का?

◆असा प्रश्न पडू शकतो पण आयकर कायद्याच्या कलम 58(4) मध्ये लॉटरी, शब्दकोडी, पत्ते, शर्यती, जुगार किंवा सट्टेबाजी यामुळे उद्भवणाऱ्या उत्पन्नाशी संबंधित कोणत्याही खर्चास अशी कपातीची परवानगी नाही. निव्वळ नफा मोजण्यासाठी प्रवेश फी भरली असल्यास तेवढीच वजावट मिळेल.

★बक्षीसाव्यतिरिक्त ऑनलाईन गेमिंगमध्ये अजून कोणकोणत्या ठिकाणी मुळातून करकपात करावी लागते?

◆बक्षीसाव्यतिरिक्त खेळाडूस दिलेला बोनस, रेफरल बोनस, कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन करपात्र असल्याचे आयकर विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

★करदात्याचे एकूण उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेहून कमी असेल तर कापलेला कर परत मिळेल का?

◆जिकंलेल्या बक्षीसासह व्यक्तीचे एकूण उत्पन्न करपात्र उत्पन्नाहून कमी असल्यास कापलेला कर आर्थिक वर्ष संपल्यावर विहित मुदतीत विवरणपत्र भरून परत मिळवता येईल.

★ऑनलाईन गेनींग विक्रीवर व्यवसायावर किती GST द्यावा लागेल?

◆अशा व्यवसायिकास खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील फरकावर GST द्यावा 28% दराने लागेल. निव्वळ करपात्र उत्पन्नावर नियमानुसार कर द्यावा लागेल.

©उदय पिंगळे 

अर्थ अभ्यासक 

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक असून आयकर कायद्यात वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेता या संदर्भातील कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विषयातील जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.