प्रमोशन न मिळण्याची कारणे
https://bit.ly/3oJiUf0
Reading Time: 4 minutes

प्रमोशन न मिळण्याची कारणे

प्रत्येकजण करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो. प्रमोशन म्हणजे करिअरमधला ‘टर्निंग पॉईंट’! परंतु जेव्हा प्रमोशन मिळत नाही तेव्हा मात्र आत्मविश्वास डळमळतो. अशावेळी प्रमोशन न मिळण्याची कारणे शोधून, आपलं काही चुकत तर नाही ना? याचा विचार करा. 

“कौटुंबिक समारंभ म्हणजे जाम मजा असते ना! खायचे, धमाल करायची, गप्पा मारायच्या, सेल्फी काढायचे, भेटीगाठी भारी वाटतेय”, उत्साही जीया बडबडत होती. 

तसं तर सगळेच असे एकदम आनंदात होते आणि वातावरण पण तसेच उत्साही. मात्र या सगळ्यात सायली मात्र जरा शांत शांत दिसत होती. 

नेमके हेच अण्णा काकांनी हेरले आणि त्यांनी सायलीला विचारले, “सायू बेटा कशी आहेस. सुट्ट्या काढल्यास न पूर्ण चार दिवसाच्या”. 

तसं सायलीने, “हो काका पण सुट्ट्या काढल्या की जरा प्रमोशन वर परिणाम होतो म्हणून मी येत नव्हते” असे उत्तर दिले. 

अण्णा काका म्हणजे नामांकित कंपनीमध्ये मॅनेजर! त्यामुळे त्यांना सायलीच्या बोलण्यातील नाराजी लगेच समजली. ते उत्तरले, “बघ सायू, आता पुढच्या काही दिवसांमध्येच तुमच्या कंपनीमध्ये प्रमोशन असतील. तर त्या आधी काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टी समजून घे.”

अण्णा काकांच्या गप्पा म्हणजे सगळीच भावंडे त्यांच्याभोवती जमायची.

काका बोलायला लागले,

“वर्षभर काम करण्यास उत्साह निर्माण होतो तो अप्रायजल नावाच्या कौतुकाच्या थापेने! मात्र हेच अप्रायजल जर योग्य अथवा अपेक्षेप्रमाणे झाले नाही तर मात्र आपण खट्टू होतो. त्यात सातत्याने प्रमोशन जर मिळत नसेल तर आपण आणखीच नाराज होतो. नेमके हेच प्रमोशन आपल्या हातातून का जाते हे आपण समजून घेवूया.”

हे नक्की वाचा: नोकरी जाण्याची लक्षणे – कसा कराल परिस्थितीचा सामना? 

प्रमोशन न मिळण्याची ८ कारणे

1. समाधानकारक कामगिरी नसणे –

  • कर्मचार्‍यांचे मूल्यांकन करण्यासाठी व्यवस्थापकांकडचा एक सोपा उपाय म्हणजे केआरए (key result area).
  • यामध्ये कर्मचार्‍यांचे मूल्यांकन करून त्याला गुण दिले जातात. इथे नेमके बर्‍याच जणांकडून वर्षाभराचे आपले जे काही कामामधील लक्ष्य / ध्येय आहे त्याकडे पहिलेच जात नाही. 
  • जेव्हा फॉर्म हातात येतात तेव्हा त्यांना समजते की आपण आपले वार्षिक ध्येय पूर्ण केलेले नाही आहे. त्यासाठीच हे नेहमी लक्षात असू द्यावे की कोणतीही कंपनी तुमची कामगिरी मागील वर्षी पेक्षा यावर्षी वरचढ असावी अशी अपेक्षा करते.
  • तुमच्या कंपनीला तुम्ही कंपनीसाठी महत्वाचे वाटणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले काम चोख आणि वेळेत पार पडायला हवे.

2. कंपनीची परिस्थिति –

  • बर्‍याच वेळेस असे देखील असते आपण आपले काम चोख बाजवलेले असते मात्र कंपनीची स्थिति चांगली नसते. म्हणजेच व्यवस्थापन कोणालाही प्रमोट करण्याच्या स्थितीमध्ये नसते. 
  • यामध्ये नफा-तोटा, मार्केटची स्थिति अशा बर्‍याच गोष्टी असू शकतात. तेव्हा प्रत्येक वेळेस वैयक्तिक घेऊन विचार करण्यापेक्षा या सर्व बाबी देखील विचारात घ्याव्यात.
  • कंपनीच्या अशा स्थितीमध्ये प्रमोशन मिळण्यापेक्षा तिची स्थिती सुधारणे महत्वाचे असते आणि त्यासाठी जर आपण प्रयत्नशील राहिलात तर नक्कीच व्यवस्थापन पुढच्या पदोन्नतीला आपल्याला विचारात घेईल.

इतर लेख: या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य 

3. पुढाकार न घेणे –

  • पुढाकार न घेणे म्हणजे नेमके काय, तर एखादी परिस्थिती उत्तम रीतीने हाताळणे, त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे, कोणतेही नवीन काम, तंत्रज्ञान शिकण्यासाठी नेहमी तयार असणे/ पुढे असणे.  
  • या सर्व गोष्टींमूळे मूल्यमापनाच्या वेळी आपण आपले स्वतःचे उदाहरण समोर दाखवू शकता.
  • प्रत्येक वेळी पुढाकार हा उत्तम कामगिरीसाठीच असतो असे नाही तर चुकांची सुद्धा जबाबदारी घ्या. 
  • एखादी नकळत झालेली चूक मग ती पूर्ण टिमची अथवा आपल्या हाताखालच्या एखाद्याची, त्याची जबाबदारी घ्या. 

4. आवश्यक कौशल्ये नसणे –

  • आपल्याकडे एखाद्या पदासाठी लागणारी कौशल्ये नसतील, तर आपण त्या पदासाठी अपेक्षा करणे चुकीचे ठरते.
  • नेहमी स्वतःला विचारा की यापेक्षा उच्च पदासाठी मला कोणती कौशल्ये गरजेची आहेत आणि ती जर आपल्याकडे नसतील तर ती मिळवण्यासाठी प्रयत्न करा.

5. भावनांचा योग्य मेळ साधता न येणे –

  • आपले पद वाढत जाते तसे आपली कामामधील परिपूर्णता व अनुभव वाढत असतो. त्याबरोबरच त्या कामाशी आपण भावनिकदृष्ट्याही गुंतत जातो. अशावेळी भावनिक स्थैर्य राखणे आवश्यक आहे.
  • उच्च पदासाठी अथवा वरच्या पदासाठी इतरांचे भावनिक चढ- उतार हाताळता येणे गरजेचे असते. त्यासाठी प्रथम आपला आपल्या स्वतःच्या भावनांवर ताबा असणे महत्वाचे आहे.
  • जे लोक खूप चिडचिडे आहेत, सतत दडपणात राहतात, कामाचा ताण ज्यांना हाताळता येत नाही अशा लोकांकडून बाकीच्यांच्या भावना हाताळण्याच्या अपेक्षा नाही करता येणार. अगदी त्याचमूळे अशांना प्रमोशन देण्याचा विचार व्यवस्थापक करत नाहीत.  

हे नक्की वाचा: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे 

6. संघासोबत राहता न येणे –

  • प्रत्येकाची कार्यशैली, आकलन क्षमता वेगवेगळी असते. म्हणूनच वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जुळवून घेणे, त्यांच्यावर विश्वास टाकणे हा कॉर्पोरेट विश्वामधला महत्वाचा भाग आहे.
  • उत्तम टीमवर्क ज्याला जमते तो उत्तम बॉस बनू शकतो.
  • अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर ज्यांच्या सोबत काम करणे आपल्याला पटत नाही त्यांच्याकडून आपण काम कसे करून घेणार? 
  • तेव्हा जर आपल्याला सांघिक काम करता येत नसेल तर पदोन्नतीचा विचार करता येणार नाही.

7. स्वतंत्रपणे काम करता न येणे –

  • स्वतंत्र काम करणे म्हणजे, जरी आपण संघात काम करत असाल तरी प्रत्येक छोट्या छोट्या अडचणीसाठी आपण दुसर्‍यांवर अवलंबून नसायला हवे, कोणताही निर्णय पटकन घेता यावा.
  • टीमसोबत काम करत असताना आणि इतर वेळेसही आपले वेगळेपण जपता आले पाहिजे. 

 8. वेळेत न येणे, नियम न पाळणे –

  • आपणच जर ऑफिसचे नियम अमलात आणू शकत नसू, तर आपल्याला फॉलो करणारे कसे ऐकणार. 
  • तेव्हा तुम्हाला बढतीसाठी विचारात घेण्यासाठी तुम्ही वेळेवर येणे तसेच, संस्थेचे नियम पाळणे गरजेचे आहे.
  • यासोबतच ऑफिस मधील नियमाप्रमाणे/ वातावरणाप्रमाणे कपडे घालणे, स्वच्छतेचे आणि निटनेटकेपणाचे नियम पाळणे हे देखील लक्षात घ्यावे.
  • बर्‍याच वेळेस आपण कामाच्या ठिकाणाला दुसरे घर असे म्हणतो. मात्र तिथे वागण्याचे, बोलण्याचे जे शिष्टाचार असतात ते पाळायलाच हवे जेणेकरून तुमच्या यशाचा मार्ग सोपा होईल.

इतर लेख: ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

एवढं बोलून झाल्यावर, पुढे काका म्हणाले, “आपल्या हातामधून प्रमोशन जाण्याची वेळ येऊ न देण्यासाठी काही सोप्या, काही सवयीने बदलणार्‍या, काही बदलाव्या लागणार्‍या, काही शिकाव्या लागणार्‍या या सगळ्या गोष्टी अजमावून पहायलाच हव्या. म्हणजे सायली तुझ्या आणि प्रमोशनची अपेक्षा करणार्‍यांच्या हाती प्रमोशन लागण्याची शक्यता वाढेल.”

काकांचे बोलणे संपले. सगळीच भावंड एकदम आनंदात होती. सायलीची पण कळी आता खुलली होती. काकांच्या अनुभवाच्या बोलांचा सर्वांना फायदा नक्कीच होणार होता. तसाच फायदा आपल्या सर्वांना देखील होवो आणि यासाठी सर्वांना शुभेच्छा !!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutesबी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutesवाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesसहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –