Reading Time: 2 minutes

2000 च्या नोटा हद्दपार ?

रिझर्व्ह बँकेने 2000 च्या नोटा बाबत महत्वपूर्ण अशी घोषणा काल संध्याकाळी केली. त्यानुसार आता तुमच्या कडे असणाऱ्या 2000 च्या सर्व नोट बँकेमध्ये जमा कराव्या लागणार आहे. सरकारने बऱ्याच आधी म्हणजे 2018 नंतर 2000 च्या नोटाची छपाई बंद केली होती.त्यामुळे या नोटा चलनात जास्त राहणार नाही हे निश्चित होते.मात्र अचानक आलेल्या या बातमीने लोकांनी रिझर्व्ह बँकेच्या संकेत स्थळावर गर्दी केली त्यामुळे हे संकेतस्थळ तूर्त उपलब्ध असणार नाही असा संदेश येत होता. सामान्य माणसाच्या मनातील संभ्रम दूर व्हावा आणि सर्व प्रश्नांची उत्तरे  सविस्तरपणे मांडता यावी याचा प्रयत्न आजच्या लेखामध्ये करूया. 

आपल्याकडे असणाऱ्या 2000 च्या नोटांचे काय करायचे? 

तुमच्याकडे असणाऱ्या 2000 च्या नोटा तुम्हाला कुठल्याही जवळच्या बँकेत जाऊन जमा करता येणार आहे. 

तुम्ही एका वेळेस 20,000 पर्यंत नोटा सध्या बँकेत जाऊन बदलून घेऊ शकता.बँकेवर निर्माण होणारा आर्थिक ताणाचा विचार करता सध्या ही मर्यादा रिझर्व्ह बँकेने घातली आहे.

कधीपासून 2000 च्या नोटा बँकेत जमा करता येणार आहे? 

23 मे 2023 पासून सर्व बँकांमध्ये 2000 च्या नोटा जमा करता येणार आहे. 

ही मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल.

अपंग,ज्येष्ठ तसेच महिला साठी विशेष सोय आहे का?

रिझर्व्ह बँकेने अपंग,ज्येष्ठ तसेच महिला यांची गैरसोय न होता सुरळीतपणे पैसे जमा करता यावे यासाठी सर्व बँकांना विशेष सूचना केल्या आहेत.

बँकेत खाते नसल्यास नोट धारकांनी काय करावे?

तुमच्याकडे 2000 ची नोट आहे मात्र कुठल्याही बँकेत खाते नाही अशा वेळेस तुम्ही कुठल्याही जवळच्या बँकेत जाऊन नोट जमा शकता.त्या साठी बँक मध्ये खाते असणे अनिवार्य नाही. 

दैनंदिन व्यवहारात 2000 च्या नोटा वापरता येऊ शकतील का? 

रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा व्यवहारात वापरल्या जाऊ शकतात.त्या नंतर मात्र वैध धरल्या जाणार नाही.

बँक ATM मधून पैसे काढताना 2000 च्या नोट मिळाल्या तर काय करावे. 

रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ATM मध्ये 2000 च्या नोटाचा भरणा करू नये याबाबत सूचना केली आहे. जेणेकरून पुन्हा 2000 च्या नोट चलनात येणार नाही.

कुठल्याही बँकेच्या शाखेमध्ये नोट स्वीकारण्यास मनाई केली असता काय करावे?

रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार कुठल्याही बँकेने पैसे घेण्यास नकार घेतला तर तुम्ही (cms.rbi.org.in) येथे तक्रार नोदंवू शकता. 

रिझर्व्ह बँकेने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय का घेतला ? 

वर्ष 2016 मध्ये 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाला.त्या ऐवजी रिझर्व्ह बँकेने 2000 च्या नोटा चलनामध्ये आणल्या.पुरेशा नोटा व्यवहारात वापरायला सुरुवात झाल्यावर वर्ष 2018 नंतर 2000 च्या नोटांची छपाई बंद करण्यात आली.

2016 च्या कालावधी मध्ये छपाई झालेल्या या नोटांचे आयुर्मान साधारण 4 ते 5 वर्ष असल्याने व्यवहारात वापरणे योग्य होणार नाही.

500 आणि 2000 च्या नोटाच्या तुलनेने 2000 ची नोट व्यवहारात जास्त वापरली जात नाही ही महत्वाची बाब समोर आली.छोट्या व्यवहारासाठी 100,200,500 या नोट वापरणे जास्त सोयीस्कर असल्याने 2000 ची नोट फार वापरात येत नव्हती.

कदाचित फार वापरात न येणारी गोष्ट कालांतराने नाहीशी होते या मनुष्याच्या शेपूट असण्याच्या गोष्टीची या निमित्ताने आठवण झाली. 

असो तर या सर्व बाजूने विचार करता 2000 ची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे.

 

हेही वाचा –तुमच्याकडे असणारी ५०० रुपयांची नोट खरी आहे का? फसवणूक टाळण्यासाठी वाचा या टीप्स

 

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार,

वर्ष 2018 च्या दरम्यान 6 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या 2000 चलनाच्या नोटा व्यवहारात उपलब्ध होत्या.

वर्ष 2023 मध्ये हे प्रमाण 3 लाख 62 हजार कोटी पर्यंत आले. त्यामुळे क्लीन नोट पॉलिसी च्या आधारे आता 

2000 नोट हद्दपार होणार ! इतर नोटा बाजारात पुरेशा उपलब्ध असल्या कारणाने आता 2000 च्या नोटा मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

व्यवहारातील काळ्या नोटांच्या साठेबाजीचा फटका आर्थिक व्यवस्थेला बसू नये यासाठी 2016 मध्ये घेतलेला निर्णय सर्वांना धक्कादायक वाटला होता. मात्र काळा पैसा ओळखू यावा यासाठी हा सर्व खटाटोप केला गेला. त्यावेळी 2000 नोट देखील कालांतराने व्यवहारातून बाद होतील अशी कुणकुण होती.त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा एकंदरीत काय परिणाम पाहायला मिळेल हे येणाऱ्या काही महिन्यात कळेलच!

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.