Reading Time: 3 minutes

तुमचं सिम कार्ड (मोबाईलक्रमांक) तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं आहे. त्यामुळे सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना दुर्लक्षित करू नका. कारणयामध्ये कदाचित तुमचं बँक अकाउंट हॅक होण्याचीही शक्यता आहे. हे होऊ नये म्हणूनच सावध रहा.

सिम स्वॅप फ्रॅाड़चा बळी होऊ नये म्हणून काय करावे?

  • माहितीपर ब्लॉग, बातम्या किंवा वृत्तपत्रातील लेख वाचून या स्कॅमबद्दल वेळीच सावधान व्हा. आपण अश्या प्रकारच्या कोणत्या संकटात फसत तर नाही आहोत याची खात्री करा.
  • अपरिचित ईमेल किंवा एसएमएस आपल्या इनबॉक्समध्ये आल्यास ते बोगस असू शकतात हे डोक्यात ठेवा.
  • संशयास्पद ईमेलला कधीही प्रत्युत्तर देऊ नका. तुमची बँक तुम्हाला ईमेलद्वारे कोणतीही गोपनीय माहिती कधीही विचारणार नाही, हे लक्षात ठेवा.
  • ईमेलमध्ये दिलेल्या लिंक्सवर कधीही क्लिक करू नका. कारण असे मेल्स फिशिंग वेबसाइटवर नेतात – या वेबसाइट एखाद्या खऱ्या वेबसाइट सारख्याच दिसतात पण वास्तवात त्या फसव्या असतात. अशा वेबसाईट संगणकावर व्हायरस डाउनलोड करू शकतात. केवळ अश्या वेबसाईटवर क्लिक केल्याने देखील, हॅकर्स बँक खात्याचा पासवर्ड मिळवू शकतात.
  • आपल्या विवेकाचा वापर करा. आपल्या बँकेमार्फत मेल केल्याचा दावा करणारे ईमेल प्राप्त झाल्यास, ऑनलाइन बँकिंग खात्याशी जोडलेला आणि संबंधित मेलमध्ये असणारा ईमेल पत्ता (Email ID) सारखा आहे का ते तपासा.
  • बँकिंगसाठी सार्वजनिकपणे वापरला जाणारा ईमेल आयडी वापरू नका. एक सुरक्षित आणि वेगळा खाजगी ईमेल आयडी तयार करा आणि तो बँकेशिवाय कुठेही वापरू नका.
  • बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी नेहमी योग्य इमेल आयडी टाईप करा. बँकेच्या वेबसाइट बुकमार्क करून ठेवणे सुरक्षित नाही, कारण मालवेअरचे असे काही प्रकार आहेत जे या बुकमार्कसह छेडछाड करतात आणि ते आपल्याला फिशिंग वेबसाइटवर घेऊन जाऊ शकतात.
  • फक्त आधिकारिक(ऑफिशियाल) वेबसाइटद्वारेच आपल्या ऑनलाइन बँकिंग प्रोफाइलवर लॉग इन करा. ही अधिकृत वेबसाइट असल्याचे सुनिश्चित करण्याचा मार्ग आहे- केवळ URL पाहून नव्हे तर ब्राउझरमध्ये ‘पॅडलॉक’च्या रूपात अशी सुरक्षीत वेबसाईट प्रमाणीत केली आहे हे चेक करा. डेटाबेसवर ही वेबसाइट सुरक्षित आहे किंवा नाही हे सांगितले जाते.
  • तुमचे ऑनलाईन बँकिंग पासवर्ड वेळोवेळी बदला. दर 3 महिन्यांनी कमीतकमी एकदा पासवर्ड बदलण्याचे सुचवले जाते. तुमचा पासवर्ड नंबर अल्फाबेट आणि एखादं चिन्ह यांचं उत्तम कॉम्बिनेशन असायला हवा .
  • अनोळखी कॉलचे उत्तर शक्यतो देऊ नका तसेच परिचित नसलेल्या नंबरना एसएमएस प्रत्युत्तर देऊ नका.
  • मोबाईल फोन सोबत होणारी कोणतीही संशयित घटना दुर्लक्षित करू नका.
  • अपरिचित कॉल किंवा एसएमएस च्या नंबरची नोंद घ्या. या नंबरची माहिती smscodes.co.za वर पाहू शकता किंवा आपल्या मोबाइल नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधू शकत. पण आपल्याला संशयास्पद कॉल किंवा एसएमएस आल्यास त्याबद्दल अधिक माहितीसाठी तपास करा.
  • काही बँका आपल्या ग्राहकांना पूर्णपणे सुरक्षा देऊ शकत नाही. विशेषतः जेव्हा ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगचा वापर असेल तेव्हा अशा कमी सुरक्षा पुरविणाऱ्या बँका धोकादायक ठरू शकतात. तसेच आपल्या मोबाईल नेटवर्कची निवड करतानाही अशीच जागरूकता बाळगावी.  
  • जर बँक आपल्या ऑनलाईन बँकिंगसाठी  मोबाइल फोनवर टू फॅक्टर व्हेरिफिकेशनची सुरक्षा प्रदान करत असेल,  तर त्याचबरोबर बॅकअप नंबर किंवा ईमेल आयडी तिथे सेट करू शकता किंवा नाही ते तपासा.

आपण सिम स्वॅप घोटाळाचा बळी पडल्यास काय करावे?

  • आपल्याला सिम स्वॅप स्कॅमचा बळी पडत असल्याचा संशय असल्यास, मदतीसाठी आपल्या मोबाइल नेटवर्क ऑपरेटरला त्वरित कॉल करा. योग्य विभागाकडे कॉल जाईल याची खात्री करा. फसवणूकीची नोंद करण्यासाठी त्यांच्या वेबसाईट वर फॉर्म आहे का? हे तपासा. फॉर्म असल्यास तो भरून दिल्यास संबंधित प्रकरणाची तपासणी करण्यात मदत मिळेल.
  • आपली तक्रार योग्य विभागाकडे जाऊन आपल्या खात्याचे सगळे व्यवहार त्वरित थांबवता येतील अशी विनंती त्यांना करावी. थोडक्यात, बँक खाते त्वरित ब्लॉक करावे.
  • शक्य असल्यास बँक खाते लॉगईन करून पासवर्ड, इमेल आणि मोबईल नंबर तत्काळ बदला. म्हणजे गुन्हेगार सिम स्वॅप ऑपरेशनमध्ये यशस्वी  झाला तरी नवीन मोबाईल नंबर मुळे पुढील धोका टळेल. परंतु घाबरलेल्या परिस्थितीत आणि अपुऱ्या माहितीवर असे धाडस करू नये.
  • बँक खात्यातून पैसे कमी होत असल्यास ४८ तासांच्या आत तशी तक्रार सायबर पोलीस स्टेशन मध्ये जायला हवी.  
  • या सर्व प्रक्रियेतून तुम्हाला तुमचे पैसे कदाचित परत मिळतील किंवा मिळणार नाहीत. पैश्याची भरपाई करून द्यायची की नाही हे त्या त्या घटनेवरून बँक ठरवते. बरेचदा बँका या प्रकरणात खातेदाराच्या चुका दाखवून देतात त्यामुळे नुकसानाची जबाबदारी पूर्णपणे खातेदाराची असते. अश्या वेळी कायदेशीर सल्ला घेणे योग्य ठरते.

या धोक्याच्या सूचना आहेत!

  • अचानक कॉल किंवा प्राप्त करणे थांबवल्यास, आपल्या मोबाईल नेटवर्क कंपनीला तपासण्यासाठी विनंती करा.
  • फोन कॉंल किवा एसएमएस द्वारे बँक च्या नावाने माहितीची विचारणा केली असेल. बँक असे कधीही विचारात नाही.
  • कोणाला तरी आपला इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा वैयक्तिक ओळख क्रमांक (पिन) माहिती झाला आहे असा संशय निर्माण झाल्यास त्वरित खात्री करा.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2VPHJr9)

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड,  सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना,

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १,  इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग २,  इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग ३

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.