गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट – आर्थिक नियोजनाची फरफट?

Reading Time: 3 minutes “दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…” आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. प्रत्येक परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानीही झाली, पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही आपण मात करण्यात आपल्याला यश मिळेल.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरवात होते. अनेकजण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. 

तरुणांसाठी गुढीपाडवा व नवीन आर्थिक वर्षाचे संकल्प

Reading Time: 3 minutes सर्वसाधारणपणे उच्च शिक्षण पूर्ण होऊन नोकरी व्यवसायास सुरुवात केल्यापाऊन त्यात स्थिरस्थावर होईपर्यंत ३० वे वर्ष चालू होते. तेव्हा या वयोगटातील व्यक्तीने येणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, खरं तर कोणताही मुहूर्त न पाहता लवकरात लवकर काही नवे संकल्प करावेत. 

आपल्या पाल्याच्या भवितव्याचं नियोजन कसे कराल ?

Reading Time: 3 minutes सध्याचा  पालक वर्ग मुलांना चांगले शिक्षण,  चांगली जीवनशैली मिळावी म्हणून झटत असतो. कधी मुलांचे हट्ट पुरवावे लागतात, तर कधी त्यांच्या शाळेच्या आणि क्लासेसच्या फीज  भराव्या लागतात. एकदा मुलं मोठी झाली की या ना त्या कारणाने पैसा लागतच असतो. मग अशा वेळी सगळा आर्थिक भार त्या पालकांवर पडलेला असतो. योग्य नियोजन केल्यास या गोष्टीसुद्धा कुठल्याही आर्थिक भाराशिवाय आनंदाने पेलता येऊ शकतात या लेखामध्ये आपण आपल्या पाल्याच्या भविष्याचं आर्थिक नियोजन कस करू शकतो, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. 

आर्थिक नियोजन – भाग ४

Reading Time: 3 minutes दरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे. आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते. 

पेन्शनचं टेन्शन!

Reading Time: 4 minutes गेल्या काही वर्षात भारताच्या सेवाक्षेत्रातील प्रगतीमुळे तिथले आर्थिक लाभ वाढले आणि सरकारी नोकरीचे महत्त्व काहीसे कमी झाले. मात्र रिटायरमेंट प्लानिंग म्हटलं की लोकांना अजूनही खात्रीशीर, वाढत जाणारं आणि गरजांना पुरून उरणारं ‘सरकारी पेन्शन’ हीच गोष्ट डोळ्यासमोर येते. बदलत्या काळामुळे अशा खात्रीशीर पेन्शनच्या स्वरूपात पडलेला बदल बहुतेकांच्या लक्षात येत नाही आणि मग ते एलआयसी (LIC) किंवा तत्सम कंपनीचा कुठलातरी ‘पेन्शन प्लान’ गळ्यात बांधून घेतात.

क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग २

Reading Time: 3 minutes मागच्या लेखात क्रिकेट मधून आर्थिक नियोजनात आत्मसात करण्यासारख्या काही धड्यांबद्दल आपण चर्चा केली. त्यात आपली उद्दिष्टे ओळखणे, सुरक्षा, लवकर चांगली सुरुवात, अधिक काळासाठी टिकून राहणे आणि योग्य निवड या बाबींचा समावेश होता. आता या संदर्भात आणखी काही मुद्दे पाहूया. 

आर्थिक नियोजन – भाग ३

Reading Time: 3 minutes भारतात विमा हा सुरक्षिततेपेक्षा गुंतवणूक म्हणूनच अधिक विकला जातो. आर्थिक जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर काही दुर्दैवी प्रसंग ओढावल्यास कुटुंबाची आर्थिकदृष्टया आबाळ होऊ नये म्हणून विमा कवच असणे गरजेचे आहे. त्यामुळे कमवित्या व्यक्तीने प्रथम मुदतीचा विमा “खर्च” म्हणून विकत घ्यावा व नंतर जोखीम स्विकारण्याची क्षमता नसलेल्यांनी स्थिर अथवा खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या विमा योजनांत गुंतवणूक करावी. 

Valentine’s day: असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण व्हॅलेंटाईन डे

Reading Time: 3 minutes प्रेमाचा गुलाबी रंग ओसरल्यावर वास्तवाचा पांढरा शुभ्र कोरा कॅनव्हास समोर दिसू लागतो. या शुभ्र कॅनव्हासवर रेखाटण्यासाठी तुमच्या नात्याचं सुंदर चित्र तयार असू द्या. तुमच्या नात्याला सुंदर बनविण्यासाठी यावर्षी एक वेगळा विचार करा. तो म्हणजे “इकॉनॉमी व्हॅलेंटाईन डे”!

तणावमुक्त गृह कर्जाने बनवा आपल्या मालकी हक्काचे घर

Reading Time: 3 minutes आपण नोकरीला लागलो की आपलं पहिलं स्वप्न असतं , ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही, प्रत्येकालाच  गृह कर्ज घेण्याची  गरज भासतेच. काही जण गृहकर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात. माझा स्वतःचा अनुभव आहे की आपण घर कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण ८.१५ ते ८.४० % इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०-२५ वर्षे मुदतीचे गृह कर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते. २०-२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो. 

आर्थिक नियोजन – भाग २

Reading Time: 3 minutes शनिवारी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला. अर्थसंकल्पाची सोप्या शब्दातील व्याख्या करताना सरकारला मिळणारा कररूपी महसूल म्हणजे उत्पन्नातून भविष्यकालीन होऊ घातलेल्या खर्चाचा आराखडा. येणारा रुपया व जाणारा रुपया यांचा ताळेबंद म्हणजेच “अर्थसंकल्प” होय. बहुतेकवेळा मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च मोठे असल्यामुळे वित्तीय तूट वाढते. परिणामी सरकारला कर्जे उचलून खर्चांची पूर्तता करावी लागते.