संपत्ति निर्माणाचा राजमार्ग: एसआयपी

Reading Time: 4 minutesजागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी, बँक व पोस्टल आरडी, विमा या पारंपरिक बचतीला आर्थिक ज्ञान नसल्याने गुंतवणूक समजतो. अशा प्रकारची गुंतवणूक महागाई निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाहीत. म्हणूनच या बचत गुंतवणुकीत परावर्तित केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो . मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?

तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?

Reading Time: 3 minutesप्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असत. कुटुंबातील सदस्यांना आरामदायक आयुष्य मिळावं किंवा त्यांना कुठल्याही आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू नये याचा प्रयत्न कुटुंबातील प्रमुख किवा प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. घरातील प्रत्येकाच्या आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण करणे इतकंच त्यात समाविष्ट नाही. त्याशिवायही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा देतील.

आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

Reading Time: 3 minutesविमा ही गुंतवणूक नव्हे. खरेतर शालेय जीवनापासून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले जाणे आवश्यक आहे. आता कुठे नववी व दहावीत म्युच्युअल फंडाबद्दल पाठ समाविष्ट केला गेलाय. पोस्टल  व बँक आर. डी., पारंपरिक विमा, मुदत ठेवी, सोन्यातील गुंतवणूक महागाईला पार करू शकत नाही. बँकेत सात टक्के परतावा घेऊन सात टक्यांच्या महागाईला आपण सामोरे कसे जाणार?

गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास

Reading Time: 3 minutesप्रत्यक्षात बघायला गेलं तर गुंतवणूक करणं किंवा त्यातून श्रीमंत होणं ही एक संथ आणि त्यामुळे कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आपण नियोजनाचा प्लान बनवताना, आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करताना कदाचित कोणी स्वप्नं बघू शकेल, आपण काय काय साध्य करू शकतो? याच्या शक्यता कोणाला रोमांचकारी वाटू शकतात. पण श्रीमंत होण्याच्या कल्पना आणि त्यासाठीची प्रक्रिया यात एक मोठा फरक असतो. तो प्लान प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया संथ व संयत असते.

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

Reading Time: 3 minutesबहुसंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितके आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड यांचा मनस्वी तिटकारा किंवा अनामिक भीती (Phobia) असते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे समजूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष किंवा चालढकल करणे चालू राहते. त्यातून चुकीचे पर्याय गुंतवणूक म्हणून निवडले जातात.

‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutesएक नवीन उत्साहपूर्ण आर्थिक वर्ष सुरु झालंय आणि या वर्षाच्या सुरवातीलाच दोन अत्यंत महत्वाचे उत्सव देशात सुरु आहेत. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरं आयपीएल मॅचेस! खरंतर यातील एक घटना राजकीय आणि दुसरी संपूर्णपणे क्रीडा किंवा मनोरंजन विश्वातली आहे. मग याचा संबंध नवीन आर्थिक वर्षाशी कसा काय? जरा विचार करा, तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही घटनांमागे ही काही आर्थिक धागे आहेत. या घटना आपल्या आणि पर्यायाने देशाच्या नवीन आर्थिक वर्षाला एक दिशा देऊ शकतात. कसं? हे जरूर वाचा.

डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

Reading Time: 3 minutesमी जितका खोल व्यक्तिगत आर्थिक कुवतीचा विचार करते, तितकं मला जाणवतं की पश्चिमात्याचा दृष्टीकोन हा खूपच उपयुक्त आहे. यूएस मध्ये डेटींगचा एक प्रमुख निर्धारक म्हणजे व्यक्तीचा ‘क्रेडीट स्कोअर’! ज्याप्रमाणे एखादी बँक कर्ज देताना, “व्यक्ती परत फेड करण्या इतकी जबाबदार आहे का?” हे क्रेडीट स्कोअरने तपासते. त्याप्रमाणे, अमेरिकेमध्ये डेट करण्यापूर्वी आपल्या साथीदाराचा क्रेडीटस्कोर तपासतात.

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?

Reading Time: 4 minutesनवीन (२०१९) वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्वांनी आपापल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवला असेल. आता ही गुंतवणूक कुठे, कशी करावी? त्याचा साकल्यानं कसा विचार करावा? हे आपण पाहू. नववर्षाची सुरुवात हा करदात्यांचा बहुतेकदा करसवलतींसाठी गुंतवणूक करण्याचा काळ असतो. तेव्हा आज आपण गुंतवणूक आणि करबचत या विषयाकडे वळू.

Retirement Planning : तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

Reading Time: 4 minutesआजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे. आजच्या तरुण पिढीने जास्त पगाराच्या नोकऱ्या बदलत असताना त्याच्या जोडीला व्यवस्थित आर्थिक नियोजन केले तर नक्कीच ते पन्नाशीला वेळेच्या अगोदर निवृत्ती स्वीकारून आपल्या आयुष्याचा जास्त आनंद घेऊ शकतात.

महिला दिन विशेष: महिलांसाठी आर्थिक नियोजनच्या ५ सोप्या स्टेप्स

Reading Time: 4 minutesआज जागतिक महिला दिनाच्या दिवशी वर्तमानपत्राची पानं बातम्यांपेक्षा जास्त जाहिरातींनीच भरलेली दिसतात. त्यात बहुतांश जाहिराती महिला दिनानिमित्त असणाऱ्या कपडे, ब्युटी प्रॉडक्ट आणि दागिन्यांच्या ऑफर्ससंदर्भात असतात. महिला म्हणजे शॉपिंग’ हे जणू एक समीकरणच पक्के झालं आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. स्त्रिया म्हणजे शॉपिंग नाही तर त्या उत्तम आर्थिक नियोजन करू शकतात. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत महिलांसाठी आर्थिक नियोजनाच्या ५ सोप्या स्टेप्स.