फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया – जरा चुकीचे, जरा बरोबर…

Reading Time: 3 minutes शुक्रवारी फ्रॅंकलिन टेम्पल्टन इंडिया म्युच्युअल फंड या आघाडीच्या घराण्याने त्यांच्या रोखे गटातील ६ योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आजवर पतसंस्था, बँका ठेवीदारांचे पैसे देत नाही, हे सर्वसामान्य लोक ऐकून होते. पण सर्वोत्तम तरलता देणारी गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड अशी बिरुदावली असलेल्या योजना जेव्हा लॉक डाऊन होऊ लागतात तेव्हा सामान्य गुंतवणूकदाराने काय करावे?

दिवस असे की कोणी माझा नाही….

Reading Time: 4 minutes कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंपदा टिकली पाहिजे याला प्राथमिकता देऊन सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. परंतु कोरोना नावाचा इंडिकेटर बाजारात गुंतवणूकदारांची धनसंपदा अस्थिर करत आहे. खरंतर समभाग गुंतवणूक म्हणजे अस्थिरता आलीच. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी धास्तावून जाण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी आपत्कालीन निधीची तरतूद न करता दीर्घ मुदतीची गुंतवणूक सुरु केली असेल, त्यांना दोनच पर्याय उपलब्ध होऊ शकतात. पहिला पैशांची तरलता हवी असल्यास भांडवली तोटा सहन करणे किंवा आहे ती गुंतवणूक थांबवून पैसे न काढणे.

गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास

Reading Time: 3 minutes मार्च महिन्यातल्या कोरोनाच्या आघाताने शेअर बाजार अगदी ३५% कोसळला तरी ही मार्च २०२० मधील समभाग योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत राहिला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील शेवटचे ९ दिवस टाळेबंदी मध्ये गेल्यानंतर ही हा गुंतवणुकीचा ओघ, त्यांचा म्युच्युअल फंड वरील प्रगल्भ विश्वास दर्शवितो. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील शेवटच्या ९ दिवसात ऑनलाईन गुंतवणूक पद्धती अवलंबून पडत्या बाजारात जास्त युनिट्स मिळवण्यासाठी समभाग योजनांमध्ये गुंतवणूक केली. 

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

Reading Time: 4 minutes गेले काही दिवस भांडवल बाजारात अस्थिरता आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक आपल्या ४२,२७४ वरून २५,६३९ तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १२,४३० वरून ७,५११ पर्यंत तळ गाठून आला. जवळपास ४०% घट ही एकदम अत्यल्प कालावधीत झाली. यापूर्वीही अनेकदा ही वेळ आली आहे त्यातून बाजार सावरला आणि त्यांने पुन्हा उभारी घेतली. यातील सन २००८ मधील मंदीमध्ये निर्देशांकात ६०% घट झाली होती. देशी आणि परदेशी वित्तसंस्थाचा कल बाजारास हेलकावे देत असतो. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर फक्त नफाच मिळवायचा असल्याने उपलब्ध सर्व मार्गांचा  वापर त्यांच्याकडून केला जातो. 

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

Reading Time: 3 minutes एस.आय.पी मार्फत गुंतवणूक केल्यास आपण जोखीम कमी करू शकतो. मात्र त्या जोडीला चांगला परतावा मिळविण्यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू. एस.आय.पी मार्फत म्युच्युअल फंडात जोडल्या गेलेल्या नवनवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाबद्दल विश्वास आणखी कसा वाढेल, हा या लेखामागचा उद्देश. 

कोरोना, शेअर बाजार आणि एसडब्लूपी गुंतवणूक

Reading Time: 4 minutes साधारण गेल्या ४-५ वर्षांपासून, जेव्हा बँकांचे व्याजदर घसरणीला लागल्यापासून, बऱ्याचशा जेष्ठ नागरिकांनी आपली सेवानिवृत्तीनंतरची मोठी रक्कम म्युच्युअल फंडाच्या इक्विटी हायब्रीड फंडात गुंतवण्यास सुरवात केली. ह्या कॅटेगरीचे त्या वेळचे आकर्षण म्हणजे दर महिन्याला नियमित दिला जाणारा करमुक्त लाभांश.  सध्या कोसळलेल्या शेअर बाजारामुळे आपल्या गुंतवणुकीतील घट पाहून आपल्याला चिंता किंवा भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र आपली ही भीती किंवा चिंता दूर करून  म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतला आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी काही माहिती देतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २० (अंतिम भाग)

Reading Time: 2 minutes ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदराच्या आजच्या अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाच्या फॅक्टशीट” विषयी. फॅक्टशीट म्हणजे एक रिपोर्ट असतो जो प्रत्येक म्युच्युअल फंड दर महिन्याला प्रकाशित करतात. यामध्ये आदल्या महिन्यात झालेल्या कर्जरोखे आणि समभागबाजारातील बदलाचा आढावा दिलेला असतो. जिथे फंड मॅनेजर आपल्याला विदेशी तसेच भारतातील घडामोडींचे विश्लेषण करून त्याचा नजीकच्या काळात म्युच्युअल फंडावर काय परिणाम होईल त्याबद्दल माहिती देतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १९

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, फंड मॅनेजमेंट शैली विषयी.  चांगला फंड कसा निवडायचा हे आपण बऱ्याच वेळा फंडाची पूर्वीची कामगिरी पाहून ठरवतो. परंतु तो पुढेही तितकाच चांगला परतावा देईल हे खात्रीने नाही सांगता येत, अशावेळी काहीवेळा आपण त्याची सातत्यता किंवा कॉन्सिस्टंसी पाहतो.  तसेच बाजाराच्या उताराच्या काळात फंड मॅनेजर ने कसा परतावा दिला आहे ते पाहतो. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १८

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, ‘सेबी’ची नवीन प्रॉडक्ट कॅटेगरी तिसरा भाग हायब्रीड फंड आणि स्पेशल फंड. ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे.  ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘सेबी’ने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला फंड निवड करणं सोपा होईल. हा फरक साधारण एप्रिल-मे २०१८ नंतर दिसून आला. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १७

Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, सेबी ची नवीन प्रोडक्ट कॅटेगरी दुसरा भाग डेट फंड.  ऑक्टोबर २०१७ पूर्वी म्युच्युअल फंडाच्या बऱ्याच कर्जरोखे संबंधित योजना असायच्या आणि त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळून जायचे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेबीने नवीन नियमावली आणली त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरी मध्ये एकच फंड चालवता येणार आहे.