Browsing Tag
लॉकडाऊन
13 posts
मी घर का व कसे खरेदी करू?
Reading Time: 6 minutesज्या व्यक्ती स्वतःचे घर शोधत आहेत, त्यांनी कोण काय म्हणतंय याचा विचार करण्याऐवजी जरा स्वतःचे डोकं वापरावं. तुमच्या गरजा जाणून घ्या, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये घर हे कधीही सर्वात महाग उत्पादन असणार आहे. त्यामुळेच तुमचा खिसा पाहून तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा काळजीपूर्वक विचार करा आणि तुमची खात्री झाली की लवकरात लवकर खरेदी करा.
स्वावलंबी भारत ! २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेजची पंतप्रधान मोदींची घोषणा
Reading Time: 2 minutesBe Vocal for Local : ‘लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा’, पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा. करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउन पुढे वाढवला जाणार असल्याची घोषणा केली.
जन धन, आधार कार्डची अपरिहार्यता ‘कोरोना’ संकटात सिद्ध
Reading Time: 4 minutesकोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत आरोग्य सेतू ॲपसबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आहे. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही करावेच लागणार आहेत. यापुढेही अशा तथाकथित वैयक्तिक स्वातंत्र्याला मागील बाकांवर बसविल्याशिवाय बहुजनांचे हित साधले जाऊ शकणार नाही.
लॉकडाऊनमध्ये जपा मानसिक आरोग्य
Reading Time: 3 minutesकोव्हिड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारला लॉकडाऊन सारखं कठोर पाऊल उचलणे भाग पडले. अशा परिस्थितीत, आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे कदाचित मानसिक तणावही वाढू शकतो. आजच्या लेखात आपण वाढलेलं लॉकडाऊन आणि त्याचे मानसिक आरोग्यावर होत असणाऱ्या परिणामांची आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय करावे, याबद्दल माहिती घेऊ.
संकटकाळातील आर्थिक नियोजन
Reading Time: 3 minutesवर्षांची सुरुवातच, बहुतेक सर्वच क्षेत्रात कमी झालेल्या मागणीने झाली. यानंतर जे आरोग्य संकट आले त्याचे रूपांतर आर्थिक संकटात कधी झाले ते समजलेच नाही. या संकटकाळातील आर्थिक नियोजन करताना अनेक गोष्टींचा पुनर्विचार आवश्यक आहे. यापुढे नव्याने आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करायला हवे, त्याची पूर्वतयारी लगेचच करायला हवी. यात काही चुकी झाल्यास त्याचा आणखी मोठा फटका आपल्याला बसू शकतो.
आमुलाग्र बदलांना रोखणारी दुर्मिळ संधी !
Reading Time: 5 minutesजेवढे संकट मोठे, तेवढे धोरणात्मक तसेच दिशाबदल करणारे निर्णय घेण्याची धोरणकर्त्यांना संधी अधिक. कोरोना साथीच्या अभूतपूर्व संकटाने भारतासमोर अनेक आव्हाने उभी केली असतानाच ही दुर्मिळ संधीही आणून ठेवली आहे. अनेक समस्यांचा गुंता सोडविताना देशाला अनेक दशकांची जी अडगळ सतत रोखत होती, ती अडगळ या संकटाने दूर केली असून अर्थक्रांतीने प्रस्तावित केलेल्या अशा आमुलाग्र बदलांचा मार्ग अधिकच प्रशस्त केला आहे.
लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम
Reading Time: 8 minutesरिअल इस्टेट उद्योग हा अनाथासारखा आहे (कुणी “माय बाप” नाही) व याच्याशी संबंधित बहुतेक घटकांसाठी घरून काम करणे शक्य नाही; म्हणजे जोपर्यंत आपण व्हर्च्युअल घरे बांधून त्यात लोकांना व्हर्च्युअली राहायला सांगून त्याचे बिट-कॉईनमध्ये पैसे घेई पर्यंत तरी नक्कीच नाही! कोरोना विषाणू ज्या वेगानं पसरतोय त्याचं गांभीर्य मला समजतंय पण त्याचवेळी लॉकडाऊनमुळे गरीबांचा मानसिक व आर्थिक ताण वाढतोय (रिअल इस्टेट तसंच इतर सर्व उद्योगांमधल्या) या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे.
कच्चे खनिज तेल खरेदी केल्याबद्दल खरेदीदाराला पैसे?
Reading Time: 2 minutesकोविड-१९ या महासंकटामुळे अनेक देश लॉकडाऊन झाल्याने वाहतूक मंदावली त्यामुळे मागणीत खूप मोठी घट झाली साहजिकच याचा परिणाम कच्या तेलाच्या (Crude Oil) मागणीवर होऊन जगाच्या इतिहासात प्रथमच कच्या तेलाची वायद्यातील किंमत प्रति बॅरल शून्य डॉलरच्या खाली गेली. याचा अर्थ आता पेट्रोलियम पदार्थ फुकट मिळतील असा नसून जगभरात मंदीमुळे मागणीत मोठी घट झाल्याने कच्चे तेल साठवून ठेवण्याची क्षमता संपली असून, आता हे उत्पादक ग्राहकांना कच्चे तेल नेण्याबद्धल पैसे देऊ करीत आहेत.