कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ईपीएफ” संदर्भात मोठा निर्णय
Reading Time: 2 minutesकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी दिलासा देणारे अनेक निर्णय जाहिर केले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (EPF) साठीही सवलतीच्या घोषणा केल्या आहेत.त्यातली दरमहा भरावी लागणारी भविष्य निधीची रक्कम पुढील तीन महिन्यासाठी केंद्र सरकार भरणार आहे. पण हा लाभ लघु, मध्यम स्वरूपाच्या उद्योग व्यवसायांना व्हावा असा सरकारचा उद्देश आहे. म्हणून भविष्य निर्वाह निधी लागु असलेल्या ज्या संस्थेत शंभर पर्यंत संख्या आहे आणि सदस्यांपैकी नव्वद टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन पंधरा हजार च्या मर्यादेत आहे त्या सर्व संस्थाना केंद्र सरकारचा हा लाभ मिळणार आहे..