आर्थिक नियोजन आणि पानिपतचा (अर्थ)बोध……

Reading Time: 3 minutes पानिपतचा लढा मराठयांच्या शौर्याने व पराक्रमाने इतिहासात अजरामर असला, तरी तो एक शोकांतिका म्हणून मनात कायमच सलत राहतो. तीच अवस्था आर्थिक शिस्तीचा गुंतवणूकदार जेव्हा वित्तीय ध्येय विसरून परताव्याच्या वाटेने जातो, तेव्हा त्याच्या अर्थनिरक्षरतेची किव येते. 

वर्षअखेर विशेष – मी पुन्हा येईन…

Reading Time: 3 minutes २०१९ या वर्षात सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेले वाक्य! प्रत्येक मराठी जाणणाऱ्या व्यक्तीने एकदा का होईना समाज माध्यमावर हे वाक्य नक्कीच ट्रोल केले असेल. मी लिहितांना त्याचा अभिप्रेत आर्थिक बाबींशी जोडतोय. उगाच अर्थाचा अन्वयार्थ निघायला नको म्हणून आधीच नमूद केले. बाजारात चक्राकार पद्धतीने येणारी तेजी किंवा मंदी असेल, दुसऱ्याचा परतावा पाहून गुंतवणूक सुरु करणारे आणि थांबविणारे गुंतवणूकदार असतील तसेच कालचा भूतकाळ, आजचा वर्तमानकाळ आणि उदयाचा भविष्यकाळ सुद्धा हेच म्हणेल, मी पुन्हा येईन!

हीच ती वेळ आर्थिक नियोजनाची …

Reading Time: 3 minutes एक नवीन वर्ष नव्या स्वप्नांसह आणि नव्या आव्हानांसह तुमची वाट बघत आहे. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी, आपल्या गेल्या वर्षाच्या आर्थिक नियोजनाचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ द्या. हे फार मोठं काम नाही. आपलं भविष्य घडवायचं असेल, तर आपला वर्तमान समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नवीन आर्थिक नियोजनासाठी आपली चालू आर्थिक स्थिती व त्याचे मुल्याकंन करणे आवश्यक आहे. आपली आर्थिक स्थिती जाणून घ्यायची सर्वात योग्य वेळ म्हणजे वर्षअखेर! 

अर्थसाक्षर कथा: आर्थिक नियोजन – कौटुंबिक का वैयक्तिक?

Reading Time: 3 minutes आजकाल पती व पत्नी दोघेही उच्चशिक्षित असतात. स्वतंत्र विचारसरणीचे असतात. बहुतांश वेळा दोघेही कमावते असतात. पण तरीही काही साध्या चुका त्यांच्याकडून होतात की संपूर्ण आर्थिक नियोजनाचा पायाच डळमळीत होतो. काही कुटुंबांमध्ये आजही पतीचा पगारही पत्नीला माहिती नसतो, तर त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कुठून असणार?परिस्थिती कोणतीही असो आजही बहुतांश कुटुंबात पतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पत्नीला नसते ही वस्तुस्थिती आहे.

मुलांना अर्थसाक्षर कसे बनवाल?

Reading Time: 3 minutes आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा दोष नक्कीच आहे की वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा गुंतवणूक विश्वाची साधी तोंडओळख देखील त्यात करून दिली जात नाही. त्यामुळे अगदी कॉमर्स, फायनान्स, इकॉनॉमिक्स अशा ‘आर्थिक’ विषयांमधून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली मुलं देखील याविषयी अनभिज्ञ आणि काही प्रमाणात अनुत्सुक देखील दिसतात. इतर विषयाचे शिक्षण घेतलेल्यांची तर बातच सोडा. अर्थातच अशा परिस्थितीमुळे महागड्या घोडचुका होण्याची शक्यता वाढते. पालक म्हणून आपल्यातल्या प्रत्येकालाच असे वाटत असतं की आपल्या मुलांना जगात आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी सक्षम बनवलं पाहिजे. त्यासाठी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आपण उचलतो. त्याचबरोबर गुंतवणूक विषयाची देखील प्राथमिक प्रशिक्षण त्यांना मिळते आहे ना, हे बघणं गरजेचं आहे.

निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना

Reading Time: 3 minutes गुंतवणुक करताना आपल्यासाठी प्राधान्यक्रम हा मुद्दलाची सुरक्षितता, रोखता आणि नियमित उत्पन्न अशा प्रकारे असतो. त्याशिवाय चलनवाढीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदेखील करावी लागते आणि इन्कम टॅक्स देखील कमीत कमी बसेल हे पाहावे लागते. मात्र ‘आखूड शिंगी बहुदुधी’ अशी सर्वगुणसंपन्न गुंतवणूक योजना कुठलीच नसते. विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्यांची एकत्र मोट बांधून, पोर्टफोलिओ बनवून आपल्याला मार्ग काढावा लागतो. हे रिटायर्ड लोकांना माहिती असलेच पाहिजेत असे विविध गुंतवणूक पर्याय कुठले आणि त्यांचे गुणधर्म काय, हे आपण आज पाहू. मात्र प्रत्येक पर्यायात किती रक्कम गुंतवावी हा प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

कर्जमुक्त कसे व्हावे? – भाग ३

Reading Time: 4 minutes तुमची सगळ्यात जास्त काळजी घरातल्या सख्ख्या लोकांपेक्षा कर्ज देणाऱ्या सावकाराला असते. त्याचबरोबर कर्ज परतफेड करायची चिंता भरपूर कर्ज घेतलेल्यांना सुद्धा असते. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लवकरात लवकर कर्जमुक्त होणे आवश्यक आहे.  या कर्जमुक्तीच्या लेखमालेतील हा तिसरा लेख ! मागील भागापर्यंत आपण कर्जमुक्तीसाठी  एकूण ४ कृती बघीतल्या होत्या. आता या भागात कृती क्रमांक ५ व कृती क्रमांक ६ पाहूया.

रक्षाबंधन विशेष: “आर्थिक रक्षाबंधन” म्हणजे काय असते रे भाऊ ?

Reading Time: 3 minutes रक्षाबंधन म्हणजे बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सण. या दिवशी सर्वानाच आपल्या भावंडांसोबतची लहापणीची गट्टी- बट्टी, धमाल हमखास आठवत असेल. गेल्या काही वर्षात रक्षाबंधनला बहिणीला “सरप्राईज गिफ्ट” देण्याची एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. बहिणीला काय भेट देऊ? हा अनेक भावांसमोरचा यक्षप्रश्न “आर्थिक रक्षाबंधन”ने चुटकीसरशी सोडवला आहे. 

गुंतवणुकीच्या चुकीच्या कल्पना

Reading Time: 3 minutes समाज माध्यमं आणि वृत्तपत्र, टीव्ही अशी पारंपरिक माध्यमांमधून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अर्थसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजापर्यंत अनेक संकल्पना पोचल्या आहेत. खरेतर या सगळ्या माहितीचा भडीमार सातत्याने सुरु आहे. मात्र या एकमार्गी संभाषणामुळे गुंतवणूकदारांच्या सवयी कितपत बदलत आहेत? तर फारशा नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण आपण गेल्या आठवड्यात बघितले – गुंतवणूक क्षेत्रातील ग्राहकाभिमुख असणाऱ्या वितरक, एजन्ट किंवा रिलेशनशिप मॅनेजर अशांच्या गैरप्रथा आणि त्यातून गुंतवणूकदारात निर्माण होणारी अनास्था आणि उदासीनता. त्याचबरोबर दुसरे मला जाणवलेले एक कारण म्हणजे गुंतवणूकदारांच्या मनातल्या अनेक चुकीच्या कल्पना.