‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच!

Reading Time: 3 minutes दीर्घकालीन गुंतवणुकींसाठी आपण जेवढा विचार करतो तेवढाच विचार आपण नजीकच्या भविष्याचा आणि त्यात उद्भवू शकणाऱ्या अनिश्चिततेचा केला पाहिजे. ज्यासाठी नियोजन शक्य आहे अशा नवीन घर, गाडी, परदेशभ्रमण इत्यादी गोष्टींसाठी २-३ वर्षं किंवा त्याही आधीपासून तयारी केली पाहिजे. त्याचबरोबर अनपेक्षित, आकस्मित खर्च काय उद्भवू शकतात त्यांच्या विचार करून त्यासाठी तजवीज करून ठेवणे गरजेचं आहे. अपघात, आजारपणं, सक्तीची सेवानिवृत्ती अशी संकटं कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्या समोर दत्त म्हणून उभी ठाकू शकतात. त्यातल्या काहींसाठी आपण विमासंरक्षण घेतलेले असले तरीही एक वेगळा समर्पित निधी त्यासाठी तयार केलेला असला पाहिजे.

कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

Reading Time: 4 minutes कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. १) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च ३) दैनंदिन खर्चांसाठी बचत ४) दीर्घकालीन स्वप्नांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे समजायचे. 

आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब

Reading Time: 3 minutes तुमच्या स्वतःचा पगार आणि इतर उत्पन्नाचे आर्थिक नियोजन तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. गरज वाटल्यास त्याचा एक लिखित आराखडा तुमच्या जवळ असेल तर उत्तमच. पण निदान तुम्ही कुठे खर्च करू इच्छिता? येत्या काळात कोणते संभाव्य खर्च आहेत? कोणती संभाव्य आवक आहे? अडचणीच्या काळी कुठून खर्च करणार? कर्ज घेणार का? किती घेणार? निवृत्तीनंतर काय? अशा प्रश्नाची उत्तरे खूप सुरवातीपासून तपासत राहावी म्हणजे आपल्याबरोबरच आपल्या परिवाराच्या आनंदाची हमी आपण देऊ शकतो.

संपत्ति निर्माणाचा राजमार्ग: एसआयपी

Reading Time: 4 minutes जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. आपण बँकांच्या मुदतठेवी, बँक व पोस्टल आरडी, विमा या पारंपरिक बचतीला आर्थिक ज्ञान नसल्याने गुंतवणूक समजतो. अशा प्रकारची गुंतवणूक महागाई निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देऊ शकत नाहीत. म्हणूनच या बचत गुंतवणुकीत परावर्तित केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल. आपण विमा पॉलिसीसाठी वीस वर्षे सहज देतो . मग असा कालावधी “म्युच्युअल फंड्स सही हैं..” साठी का देत नाही?

तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे बनवाल?

Reading Time: 3 minutes प्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असत. कुटुंबातील सदस्यांना आरामदायक आयुष्य मिळावं किंवा त्यांना कुठल्याही आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागू नये याचा प्रयत्न कुटुंबातील प्रमुख किवा प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. घरातील प्रत्येकाच्या आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण करणे इतकंच त्यात समाविष्ट नाही. त्याशिवायही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या परिवाराला आर्थिक सुरक्षा देतील.

आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

Reading Time: 3 minutes विमा ही गुंतवणूक नव्हे. खरेतर शालेय जीवनापासून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले जाणे आवश्यक आहे. आता कुठे नववी व दहावीत म्युच्युअल फंडाबद्दल पाठ समाविष्ट केला गेलाय. पोस्टल  व बँक आर. डी., पारंपरिक विमा, मुदत ठेवी, सोन्यातील गुंतवणूक महागाईला पार करू शकत नाही. बँकेत सात टक्के परतावा घेऊन सात टक्यांच्या महागाईला आपण सामोरे कसे जाणार?

गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास

Reading Time: 3 minutes प्रत्यक्षात बघायला गेलं तर गुंतवणूक करणं किंवा त्यातून श्रीमंत होणं ही एक संथ आणि त्यामुळे कंटाळवाणी प्रक्रिया आहे. आपण नियोजनाचा प्लान बनवताना, आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करताना कदाचित कोणी स्वप्नं बघू शकेल, आपण काय काय साध्य करू शकतो? याच्या शक्यता कोणाला रोमांचकारी वाटू शकतात. पण श्रीमंत होण्याच्या कल्पना आणि त्यासाठीची प्रक्रिया यात एक मोठा फरक असतो. तो प्लान प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया संथ व संयत असते.

उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

Reading Time: 3 minutes बहुसंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितके आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड यांचा मनस्वी तिटकारा किंवा अनामिक भीती (Phobia) असते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे समजूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष किंवा चालढकल करणे चालू राहते. त्यातून चुकीचे पर्याय गुंतवणूक म्हणून निवडले जातात.

‘आयपीएल’मधून शिका आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes एक नवीन उत्साहपूर्ण आर्थिक वर्ष सुरु झालंय आणि या वर्षाच्या सुरवातीलाच दोन अत्यंत महत्वाचे उत्सव देशात सुरु आहेत. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरं आयपीएल मॅचेस! खरंतर यातील एक घटना राजकीय आणि दुसरी संपूर्णपणे क्रीडा किंवा मनोरंजन विश्वातली आहे. मग याचा संबंध नवीन आर्थिक वर्षाशी कसा काय? जरा विचार करा, तुम्हाला लक्षात येईल की या दोन्ही घटनांमागे ही काही आर्थिक धागे आहेत. या घटना आपल्या आणि पर्यायाने देशाच्या नवीन आर्थिक वर्षाला एक दिशा देऊ शकतात. कसं? हे जरूर वाचा.

डेटिंग आणि क्रेडिट स्कोअर

Reading Time: 3 minutes मी जितका खोल व्यक्तिगत आर्थिक कुवतीचा विचार करते, तितकं मला जाणवतं की पश्चिमात्याचा दृष्टीकोन हा खूपच उपयुक्त आहे. यूएस मध्ये डेटींगचा एक प्रमुख निर्धारक म्हणजे व्यक्तीचा ‘क्रेडीट स्कोअर’! ज्याप्रमाणे एखादी बँक कर्ज देताना, “व्यक्ती परत फेड करण्या इतकी जबाबदार आहे का?” हे क्रेडीट स्कोअरने तपासते. त्याप्रमाणे, अमेरिकेमध्ये डेट करण्यापूर्वी आपल्या साथीदाराचा क्रेडीटस्कोर तपासतात.